Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO: हमाम में सब नंगे है, आमच्याही हातात दगड असू शकतात, संजय राऊत यांचा विरोधकांना इशारा

भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या अनुषंगाने काही आरोप केले आहेत. (sanjay raut)

VIDEO: हमाम में सब नंगे है, आमच्याही हातात दगड असू शकतात, संजय राऊत यांचा विरोधकांना इशारा
संजय राऊत, शिवसेना खासदार
Follow us
| Updated on: Nov 01, 2021 | 1:31 PM

मुंबई: भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या अनुषंगाने काही आरोप केले आहेत. त्यावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपवर तोफ डागली आहे. हमाम में सब नंगे है. काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांच्या घरावर दगड मारू नये. आमच्याही हातात दगड असू शकतात, असा टोला संजय राऊत यांनी लगावला

संजय राऊत मीडियाशी बोलताना ही टीका केली. ज्या पद्धतीने महाराष्ट्राचं राजकारण सुरू आहे. एकमेकांवर आरोप करणं सुरू आहे, एकमेकांना खोट्या आरोपात फसवणं सुरू आहे, केंद्रीय चौकशी समितीचा गैरवापर करणं सुरू आहे, पूर्वी असं कधी घडलं नाही. आता दोन वर्षात हे सुरू झालंय. हे महाराष्ट्राचं राजकारण नाही. आता यात शरद पवारांनाही घुसडले आहे. भाजपच्या नेत्यांना लाज वाटली पाहिजे. आपल्या राजकारणासाठी पवारांसारख्या मोठ्या नेत्यांवर टीका करत आहेत, असं राऊत म्हणाले.

कमरेखालचा वार केला नाही

राजकारण म्हटलं तर हमाम में सब नंगे होते है. मलिक यांनी काही पुरावे दिले आहेत. विरोधकांना सांगतो. ज्यांचे घर काचेचे असते त्यांनी इतरांवर दगडफेक करू नये. आमच्याही हातात एक दगड असू शकतो. आम्ही तुमच्या एवढे खाली येणार नाही. आम्ही कमरेखालचा वार केला नाही. पवारांनी संस्कार असलेलं राजकारण केलं आहे, असं राऊत म्हणाले.

फडणवीसांनी खुलासा करावा

भाजपने शरद पवारांवर घाणेरड्या पद्धतीने टीका केली आहे. ते त्यांचं अधिकृत मत आहे का याचा भाजपने खुलासा करावा. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यांनी त्यावर बोलावं शरद पवार गेल्या 50 वर्षापासून संसदीय राजकारणात आहेत. त्यांच्यावर असे आरोप करणं चुकीचं आहे, असं राऊत म्हणाले.

मलिकांची वेदना समजू शकतो

महाराष्ट्रात अफू, गांजाची शेती पिकते असं देशाला वाटत आहे. मलिकांच्या जावयांवर खोटा खटला दाखल केला होता. त्यांची वेदना समजू शकतो. त्यांचे मुलगी आणि नातवंडांनी काय भोगलं हे आम्ही समजू शकतो. आम्ही त्यांच्या पाठी आहोत. त्यांना ज्या प्रकारे त्रास दिला जातोय ही महाराष्ट्राची परंपरा नव्हती. राजकीय विरोधकांना खतम करण्याचं काम कधी झालं नव्हतं, असं ते म्हणाले.

मलिकांची माहिती धक्कादायक

दरम्यान, नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीसांवर केलेल्या आरोपांवर बोलण्यास त्यांनी नकार दिला. मलिकांची माहिती धक्कादायक आहे. ज्यांच्यावर आरोप झाले ते खुलासा करतील. मला माहीत नाही. एनसीबीने चौकशी करावी. पुरावे असतील तर द्यावेत. पण महाराष्ट्रात चिखलफेक करू नये, असं त्यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या:

‘फडणवीसांना या प्रकरणात ओढण्याचे परिणाम भोगावे लागणार’, चंद्रकांत पाटलांचा मलिकांना निर्वाणीचा इशारा

Anil Deshmukh: अखेर अनिल देशमुख ईडीच्या कार्यालयात दाखल, कसून चौकशी होणार?

VIDEO: अनिल देशमुखांचं ईडी कार्यालयात जाण्यापूर्वी ट्विट; थेट परमबीर सिंगांवर साधला निशाणा

जेव्हा इम्तियाज जलील अंबादास दानवेंना मिठी मारतात..
जेव्हा इम्तियाज जलील अंबादास दानवेंना मिठी मारतात...
सदावर्तेंवर बोलतना मनसे नेत्याची जीभ घसरली, 'पाळलेला कुत्रे....'
सदावर्तेंवर बोलतना मनसे नेत्याची जीभ घसरली, 'पाळलेला कुत्रे....'.
कुर्ल्याच्या फिनिक्स मॉलमध्ये आग; अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल
कुर्ल्याच्या फिनिक्स मॉलमध्ये आग; अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल.
..अन् गर्भवतीचा मृत्यू, दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाची मुजोरी, घडलं काय?
..अन् गर्भवतीचा मृत्यू, दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाची मुजोरी, घडलं काय?.
मराठीत बोला, मनसेची थेट बँकांमध्येच धडक; 15 दिवसांचा अल्टिमेटम
मराठीत बोला, मनसेची थेट बँकांमध्येच धडक; 15 दिवसांचा अल्टिमेटम.
कुठं मेघगर्जना कुठं गारपीट, अवकाळीनं झोडपलं; कोणत्या जिल्ह्यात हैदोस?
कुठं मेघगर्जना कुठं गारपीट, अवकाळीनं झोडपलं; कोणत्या जिल्ह्यात हैदोस?.
दमानिया आणि देशमुखांनी अंतरावालीत जरांगेंची भेट घेतली, काय झाली चर्चा?
दमानिया आणि देशमुखांनी अंतरावालीत जरांगेंची भेट घेतली, काय झाली चर्चा?.
सोनं एकाच वर्षात साठीतून नव्वदीपर्यंत, लवकरच गाठणार....
सोनं एकाच वर्षात साठीतून नव्वदीपर्यंत, लवकरच गाठणार.....
अवकाळीचा तडाखा; पिकं मातीमोल, शेतकरी हवालदिल
अवकाळीचा तडाखा; पिकं मातीमोल, शेतकरी हवालदिल.
शिंदेंच्या सभास्थळी टीव्ही 9च्या पत्रकाराला पोलिसांची धक्काबुक्की
शिंदेंच्या सभास्थळी टीव्ही 9च्या पत्रकाराला पोलिसांची धक्काबुक्की.