Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फडणवीस यांची दिल्लीत मक्का मदिना, तुम्ही मुजरा करायला का जाता?; संजय राऊत यांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल

कुणाची ताकद काय आहे हे जनता दाखवेल. बोलून काय होईल? महापालिका निवडणुका होतील, तेव्हा कळेल कुणाची ताकद आहे. मुंबई महापालिकेत काही ठिकाणी काँग्रेसची ताकद आहे. हे मानावं लागेल. 

फडणवीस यांची दिल्लीत मक्का मदिना, तुम्ही मुजरा करायला का जाता?; संजय राऊत यांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल
sanjay rautImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 05, 2023 | 10:56 AM

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी शाह यांच्यासोबत राज्य मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा केली. त्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार अखेर होणार असल्याचं निश्चित मानलं जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या या दिल्लीवारीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे. देवेंद्र फडणवीस दिल्लीत गेले समजू शकतो. त्यांची मक्का मदिना दिल्लीत आहे. तुमचं दिल्लीत काय आहे? तुम्ही दिल्लीत मुजरा का करता? स्वत:ला असली शिवसेना म्हणताना मग दिल्लीत कशाला जाता? बाळासाहेब ठाकरे विस्तारासाठी कधी दिल्लीत जायचे काय? असा सवाल संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांना केला आहे.

एकनाथ शिंदे यांचं हायकमांड पूर्वी महाराष्ट्रात होतं. आता शिंदेंचं हायकमांड दिल्लीत आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाची चर्चा करतात. आमची शिवसेना म्हणतात. बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेतात आणि दिल्लीत जाऊन मुजरा करतात. असली शिवसेना कधी दिल्लीत झुकली नाही. विस्तारासाठी तिकडे जातात. महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आहे म्हणता तर दिल्लीत जाण्याची गरज नाही. इथले निर्णय इथेच झाले पाहिजे. आम्ही दिल्लीची गुलामी केली नाही. तुमची शिवसेना असली आहे तर झुकता कशाला? असा सवाल संजय राऊत यांनी केला.

हे सुद्धा वाचा

ही लाचारी आहे, मांडलिकत्व आहे

हिंमत असेल तर तुमच्या मंत्रिमंडळाचा विस्तार करायचं तर इथे बसून करा. एक वर्ष झालं विस्तार होत नाही याचा अर्थ सरकार जात आहे. म्हणून ते सरकारचा विस्तार करत नाहीत, असा दावाही राऊत यांनी केला. आम्हाला विस्तार करायचा आहे असं म्हणत उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे कधी अर्ज घेऊन दिल्लीत उभे राहिले नाही. फडणवीस दिल्लीत गेले किंवा इतर कुणी गेले तर समजू शकतो. त्यांचा मक्का मदिना दिल्लीत आहे. तुमचं काय आहे? तुम्ही दिल्लीत का धावता? फारच विचित्र प्रकार आहे? आमचे विस्तार आम्ही करायचो. हे महाराष्ट्र आहे. हे ऊठसूठ दिल्लीत जात आहेत. ही कसली शिवसेना? ही मांडलिक शिवसेना. हे मांडलिकत्व आहे. ही लाचारी आहे, असा घणाघाती हल्ला संजय राऊत यांनी चढवला.

शिंदे गटाला पंतप्रधानपद द्या

शिंदे गटाच्या खासदारांना मंत्रीपद मिळणार आहे. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. मला माहीत नाही. त्यांना पंतप्रधानपद मिळावं ही अपेक्षा आहे. त्यांनी प्रचंड क्रांतीकारक काम केलं आहे. उपपंतप्रधानपद, गृहमंत्रीदप, दोन चार राज्यपाल पदे त्यांना द्यायला हवीत. त्यांच्या काही लोकांना अमेरिकेत हायकमिश्नर करा. मी नाव देतो. कोण कोण हुशार लोक आहेत त्यांची नावे देतो. एवढं क्रांतीकारी काम केलं आहे. फक्त दोन चार मंत्रिपद काय देता? असा सवाल त्यांनी केला.

अजितदादा बरोबर बोलत आहेत

मुंबई महापालिका शिवसेनेसोबत लढण्याची इच्छा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी व्यक्त केली आहे. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. अजितदादा असतील किंवा काँग्रेस नेते असतील सर्वांची एकच भावना आहे, पालिका, विधानसभा आणि लोकसभेत एकत्र लढायचं हा आमचा सूर आहे. ही आमची वज्रमूठ आहे. त्यामुळे अजित पवार जे सांगत आहेत. ते बरोबर आहे. एकत्र बसून निर्णय घेऊ, असं राऊत म्हणाले.

लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.
दिक्षाभूमीला वंदन करून अभिप्राय वहीत पंतप्रधानांनी दिला विशेष संदेश
दिक्षाभूमीला वंदन करून अभिप्राय वहीत पंतप्रधानांनी दिला विशेष संदेश.
पंतप्रधान मोदींचा नागपूर दौरा; आरएसएसच्या मुख्यालयाला दिली भेट
पंतप्रधान मोदींचा नागपूर दौरा; आरएसएसच्या मुख्यालयाला दिली भेट.