AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पेट्रोल-डिझेलची दरवाढ रामराज्यात वावणाऱ्यांना शोभत नाही; संजय राऊतांचा खोचक टोला

शिवसेना नेते संजय राऊत यांनी इंधन दरवाढीवरून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलेल्या व्यक्तव्याचा समाचार घेतला आहे. (Sanjay Raut slams nirmala sitharaman over petrol diesel price hike)

पेट्रोल-डिझेलची दरवाढ रामराज्यात वावणाऱ्यांना शोभत नाही; संजय राऊतांचा खोचक टोला
शिवसेना नेते संजय राऊत
| Updated on: Feb 26, 2021 | 11:59 AM
Share

मुंबई: शिवसेना नेते संजय राऊत यांनी इंधन दरवाढीवरून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलेल्या व्यक्तव्याचा समाचार घेतला आहे. पेट्रोल-डिझेलची दरवाढ तुम्हाला धर्मसंकट वाटत असेल तर धर्माचे राजकारण करू नका, असं सांगतानाच पेट्रोल-डिझेलची दरवाढ रामराज्यात वावणाऱ्यांना शोभत नाही, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे. (Sanjay Raut slams nirmala sitharaman over petrol diesel price hike)

मनमोहन सिंग नेहमी संकटाचा सामना करायचे

पेट्रोल-डिझेल धर्मसंकट वाटत असेल तर धर्माचे राजकारण करू नका. सत्ताही भाजपला श्रीरामाच्या नावावर म्हणजे धर्माच्या नावावर मिळाली आहे. राजकारणात धर्माला जास्त महत्त्व दिलं जात आहे, असं सांगतानाच लोकांची सगळ्यात मोठी समस्या म्हणजे पेट्रोल- डिझेल दरवाढ करणं. या दरवाढीसंदर्भातील धर्मसंकट यूपीए सरकारवरही होतं. पण माजी पंतप्रधान मनमोहन सिंग नेहमी संकटाचा सामना करायचे. तुम्ही तर पळ काढत आहात, असा खोचक टोलाही संजय राऊत यांनी लगावला आहे. राऊत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

रावणाच्या श्रीलंकेतही इंधन स्वस्त

देशातील जनतेचे महागाईपासून रक्षण करणं हे कुठल्याही सरकारचं काम आहे. व्यापारात फायदा होतो की तोटा हे बघायला सरकार बसलेलं नाही. आपण रामराज्यात राहतो. पण बाजूला असलेल्या सीता आणि रावण यांचा जन्म झालेल्या देशात म्हणजे नेपाळ आणि श्रीलंकेत पेट्रोल डिझेल स्वस्त आहे. त्यामुळे पेट्रोल-डिझेलची दरवाढ रामराज्यात वावरणाऱ्यांना शोभत नाही, अशी टीकाही त्यांनी केली.

पेट्रोलच्या किंमतीत राम-रावण

दरम्यान, काही दिवसांपूर्वी भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामींनी राम, रावण आणि सीतेच्या जन्मस्थळांचा उल्लेख करून ट्विट करत ही टीका केली आहे. प्रभू रामाच्या भारतात पेट्रोलचे भाव सर्वाधिक आहेत. तर शेजारीच असलेल्या नेपाळ आणि श्रीलंकेत हे दर कमी आहेत, असं स्वामींनी म्हटलं होतं. प्रभू रामाच्या भारतात पेट्रोलची किंमत प्रति लिटर 93 रुपये आहे. सीतेच्या नेपाळमध्ये पेट्रोलची 53 रुपये आहे. तर रावणाच्या लंकेत पेट्रोलचे भाव 51 रुपये आहेत, असा टोला सुब्रमण्यम स्वामींनी लगावला होता.

पेट्रोल प्रति लिटर 40 रुपये हवं

डिसेंबरमध्येही स्वामींनी पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवरून भाजपला घेरले होते. त्यांनी ट्विट करून भाजपवर टीका केली होती. यावेळी पेट्रोलची किंमत प्रति लिटर 90 रुपये आहे. पेट्रोलची एक्स रिफायनरी किंमत 30 रुपये प्रति लिटर आहे. त्यावर तेलावर 60 रुपयांचा टॅक्स जोडण्यात आला. खरं तर पेट्रोलचे दर जास्तीत जास्त 40 रुपये प्रति लिटर असायला हवेत, असं स्वामींनी म्हटलं होतं.

पेट्रोल-डिझेलचे भाव तिसऱ्या दिवशीही स्थिर

दरम्यान, देशातल्या अनेक शहरांमध्ये पेट्रोलची किंमत 100 रुपयांच्या पार गेली आहे. मात्र, आज देशात सलग तिसऱ्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत कुठल्याही प्रकारचे बदल झालेले नाहीत. तरीही पेट्रोल-डिझेलच्या दर रेकॉर्ड लेव्हलवर आहेत. मंगळवारी इंधनाच्या दरांमध्ये वाढ झाली पण बुधवारी आणि आज गुरुवारीही दरांमध्ये फारसे बदल झालेले दिसले नाहीत. तसेच, आज शुक्रवारीही पेट्रोल डिझेलचे दर स्थिरावलेले आहेत. दिल्लीत आज पेट्रोलची किंमत 90.93 वर पोहोचली आहे. मुंबईतील पेट्रोलची किंमत प्रतिलिटर 97.34 रुपये आहे. एकंदरीतच मेट्रो शहरांमध्ये इंधनाचे दर सर्वाधिक आहे. दिल्ली आणि मुंबईमध्ये पेट्रोलची किंमत आत्तापर्यंतच्या उच्चांकी पातळीवर गेली आहे. (Sanjay Raut slams nirmala sitharaman over petrol diesel price hike)

पेट्रोल-डिझेलचे दर अशा प्रकारे तपासा

एसएमएसद्वारे आपण पेट्रोल डिझेलची किंमत शोधू शकता. दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल डिझेलचे दर अद्ययावत केले जातात. इंडियन ऑईलच्या वेबसाइटनुसार, आपल्याला आरएसपीसह आपला शहर कोड टाइप करावा लागेल आणि 9224992249 या क्रमांकावर एसएमएस पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा कोड वेगळा आहे. आपण हे आयओसीएल वेबसाईटवरून पाहू शकता. त्याच वेळी, आपल्या शहरातील पेट्रोल डिझेलची किंमत आपण बीपीसीएल ग्राहक RSP 9223112222 आणि एचपीसीएल ग्राहक यांना 9222201122 संदेश पाठवून जाणून घेऊ शकता. (Sanjay Raut slams nirmala sitharaman over petrol diesel price hike)

संबंधित बातम्या:

दिलासा… सलग तिसऱ्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर, जाणून घ्या आजचे दर

पेट्रोलच्या किंमतीत राम-रावण; मोदींच्या खासदाराचा घरचा आहेर

Share Market: भांडवली बाजार पुन्हा गडगडला; सेन्सेक्स 1000 अंकांनी घसरला

(Sanjay Raut slams nirmala sitharaman over petrol diesel price hike)

हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश.
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!.
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप.
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले.
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?.
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!.
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट.