Sanjay Raut Video: राज्याचे गृहमंत्री होणार का? राऊत हसले अन् म्हणाले, मी राज्याच्याच…
आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) राष्ट्रवादीवर नाराज असल्याच्या चर्चा उठल्या. त्याचं झालं असं महाविकास आघाडीत गृहमंत्रिपद राष्ट्रवादीकडे आहे. सध्या राज्यात ईडीच्या धाडीवर धाडी पडत आहेत. अशात राज्यातलं गृहखातं भाजपच्या बाबतीत मवाळ भूमिका घेत आहे, अशा चर्चा सुरू झाल्या.
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) चांगलीच धुसफूस सुरू झाल्याचे दिसून आले आहे. दोन-चार दिवसांपासूर्वी काँग्रेस नाराज असल्याच्या चर्चा उठल्या आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) राष्ट्रवादीवर नाराज असल्याच्या चर्चा उठल्या. त्याचं झालं असं महाविकास आघाडीत गृहमंत्रिपद राष्ट्रवादीकडे आहे. सध्या राज्यात ईडीच्या धाडीवर धाडी पडत आहेत. अशात राज्यातलं गृहखातं भाजपच्या बाबतीत मवाळ भूमिका घेत आहे, अशा चर्चा सुरू झाल्या. त्यानंतर सहाजिकच थेट दिलीप वळसे-पाटलांना याबाबत बोलवं लागलं. आता गृहमंत्रिपद शिवसेनेला हवं आहे का? अशा चर्चा सुरू झाल्या. समजा गृहमंत्रिपद शिवसेनेला मिळालेच, तर गृहमंत्री कोण होणार? याबबाबत संजय राऊतांना (Sanjay Raut) तुम्ही राज्याचे गृहमंत्री होणार का? असे त्यांना विचारले असता, त्यांनी मिश्कील उत्तर दिलंय.
संजय राऊत हसले आणि म्हणाले…
गेल्या दोन दिवसांपासून राज्याच्या राजकारणात गृह खात्याचीच आणि गृहमंत्रिपदाचीच चर्चा आहे. संजय राऊतही यावर भरभरून बोलले आहेत. मात्र त्यांना तुम्ही गृहमंत्री होऊन राज्याच्या राजकारणात येणार आहात का? असे विचारले असता, संजय राऊत फक्त हसले आणि म्हणाले मी राज्याच्या राजकारणात आहे. असे म्हणत संजय राऊतांनी या प्रश्नला बगल दिली. तसेच भाजपने जास्त ताण घेऊन नये आमच्यात चांगला संवाद आहे. गृहमंत्री आणि महसूल मंत्रीही वेळोवेळी मुख्यमंत्र्यांशी संवाद साधत आहेत. त्यामुळे भाजपने सुखाने जगावं आणि आम्हालाही जगू द्यावं, अशी खोचक प्रतिक्रिया संजय राऊतांनी दिली आहे.
राऊतांच्या गृहखाल्याला कानपिचक्या
सकाळी मीडियाशी संवाद साधताना संजय राऊत गृहखात्याला सल्ले देताना दिसून आले. गृहखात्याने अधिक सक्षम झालं पाहिजे. काल या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाली आहे. तपास यंत्रणा राज्यात येऊन कारवाया करत आहेत हे गृहखात्यावर आक्रमण आहे. या प्रकाराकडे गंभीरपणे पाहिलं पाहिजे. आस्ते कदम भूमिका कोणी घेत असेल तर ते स्वत:साठी फाशीचा दोर वळत आहेत. आता गृहखात्यालाच दमदार पावलं टाकावी लागेल. नाही तर तुम्ही तुमच्यासाठी रोज नवा खड्डा खोदाल, असा इशारा शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिला आहे. त्यानंतर राऊतांना आता गृहमंत्री व्हायचंय का? अशा चर्चा सुरू झाल्या.
Congress: काँग्रेस आमदार नाराज नाहीत? काय सांगता, कैलास गोरंट्याल म्हणतात, अडीच वर्षे होऊन गेली….