Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut : तर इंडिया आघाडी पुन्हा निर्माण होणार नाही; संजय राऊत यांचा काँग्रेसला गंभीर इशारा

Sanjay Raut on Congress : काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी पराभवाचा पंचनामा करताच आता महाविकास आघाडीत वादाची पुन्हा ठिणगी पडली. विधानसभा निवडणुकीपूर्वी जसा वाद उफळला, तसाच वाद पुन्हा पेटला.

Sanjay Raut : तर इंडिया आघाडी पुन्हा निर्माण होणार नाही; संजय राऊत यांचा काँग्रेसला गंभीर इशारा
sanjay rautImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jan 10, 2025 | 12:29 PM

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी पराभवाचा पंचनामा करताच महाविकास आघाडीत वादाची पुन्हा एकदा ठिणगी पडली. काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गटाने पराभवाचे खापर एकमेकांवर फोडत एकमेकांचे चांगलेच उट्टे काढले. कालपासून आघाडीतील बिघाडी ही सत्ताधाऱ्यांना आनंदाचा उकळ्या फुटण्याचा कार्यक्रम झाला आहे. आज उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसवर चांगलेच तोंडसूख घेतले. इतकेच नाही तर त्यांनी INDIA आघाडीवरून मोठा इशारा पण दिला.

कशावरून उफळला वाद?

विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेला जागा वाटपात जो घोळ घालण्यात आला, त्यावर नेमकं बोट ठेवलं. जागा वाटप दोन दिवसांत झाले असते तर निदान उर्वरीत दिवस प्रचारासाठी मिळाले असते. जागा वाटप ताणल्या गेल्यानेच विधानसभेसाठी कोणतेही नियोजन करता आले नसल्याचा ठपका त्यांनी ठेवला. त्यांनी या विलंबासाठी नाना पटोले आणि संजय राऊत यांच्यावर खापर फोडले. त्यांनी नियोजनाचा अभाव, बैठकीला उशीर आणि इतर कारणांचा पाढाच वाचला. त्यामुळे एकच खळबळ उडाली. त्यानंतर आता संजय राऊत यांनी त्यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला.

हे सुद्धा वाचा

काँग्रेसला सुनावले खडे बोल

लोकसभा निवडणुकीनंतर इंडिया अलायन्स जिवंत ठेवण्याची काँग्रेसची जबाबदारी होती. काँग्रेसने बैठक घ्यायला हवी होती. त्यांनी पुढचं मार्गदर्शन करायला हवं होतं. पण एकही बैठक घेतली नाही. इंडिया अलायन्सचं अस्तित्व राहिलं नाही, असं लोकांना वाटत असेल तर ही काँग्रेसची जबाबदारी आहे. इंडिया अलायन्समध्ये संवाद राहिलेला नाही, असे एकामागून एक घणाघात त्यांनी काँग्रेसवर घातले.

काँग्रेसला दिला मोठा इशारा

यावेळी संजय राऊत यांनी काँग्रेसवर जोरदार प्रहार केला. काँग्रेसने इंडिया अलायन्सची जबाबदारी घेणार नाही, असे जाहीर करावे, असे आवाहन त्यांनी केले. आम्ही आमचे मार्ग निवडून घेऊ. इंडिया आघाडी लोकसभेसाठी होती. आता तिचं अस्तित्व नाही, असं काँग्रेसला वाटत असेल तर त्यांनी तसं अधिकृतपणे जाहीर करावं. तुम्हाला सांगतो, जर इंडिया अलायन्स एकदा फुटला तर पुन्हा इंडिया अलायन्स बनणार नाही, असा थेट इशारा त्यांनी दिला. ही भूमिका एखाद्या पार्टीची असेल तर ती मोठी पार्टी आहे. तुम्ही असं विधान करण्यापूर्वी विचार करा, असे त्यांनी काँग्रेस नेत्यांचे कान टोचले.

'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी.
साडीवाली दीदी..शिंदेंनंतर भाजपच्या बड्या महिला नेत्यावर कामराचा निशाणा
साडीवाली दीदी..शिंदेंनंतर भाजपच्या बड्या महिला नेत्यावर कामराचा निशाणा.
पत्रकार परिषदेत उज्वल निकम यांचा मोठा दावा
पत्रकार परिषदेत उज्वल निकम यांचा मोठा दावा.
संभाजीराजे 'वाघ्या'बाबत म्हणाले, 'महाराजांना अग्नि दिला त्यावेळी...'
संभाजीराजे 'वाघ्या'बाबत म्हणाले, 'महाराजांना अग्नि दिला त्यावेळी...'.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढची सुनावणी 10 एप्रिलला
संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढची सुनावणी 10 एप्रिलला.
'तुम्ही मुसलमांनाना का डॉमिनेट करता?,'शिरसाट आणि आव्हाडांमध्ये खडाजंगी
'तुम्ही मुसलमांनाना का डॉमिनेट करता?,'शिरसाट आणि आव्हाडांमध्ये खडाजंगी.
संतोष देशमुख हत्या प्रकरण; काय आहे सुनावणीचे अपडेट्स? इनसाईड स्टोरी
संतोष देशमुख हत्या प्रकरण; काय आहे सुनावणीचे अपडेट्स? इनसाईड स्टोरी.
पवारच आता दादांसोबत जातील... बच्चू कडूंच्या वक्तव्यानंतर चर्चांना उधाण
पवारच आता दादांसोबत जातील... बच्चू कडूंच्या वक्तव्यानंतर चर्चांना उधाण.
माझ्यावरचा हल्ला रोहित पवारांनीच केला; पडळकरांचा खळबळजनक आरोप
माझ्यावरचा हल्ला रोहित पवारांनीच केला; पडळकरांचा खळबळजनक आरोप.
'रात्री एक्स्प्रेस हायवेवर बोलवलं अन्...' दादांनी सांगितला 'तो' किस्सा
'रात्री एक्स्प्रेस हायवेवर बोलवलं अन्...' दादांनी सांगितला 'तो' किस्सा.