…आणि पवारांनी फेसबूकचा डीपी बदलला !

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या फेसबुक पेजवर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देणारी फेसबुक फ्रेम आपल्या डिस्प्ले पिक्चरला लावली आहे (Sharad Pawar appeal people to participate in Farmers protest)

...आणि पवारांनी फेसबूकचा डीपी बदलला !
Follow us
| Updated on: Jan 24, 2021 | 3:18 PM

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या फेसबुक पेजवर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देणारी फेसबुक फ्रेम आपल्या डिस्प्ले पिक्चरला लावली आहे. शेतकरी आंदोलनाला राज्यभरातील कार्यकर्त्यांनी आणि इतर नागरिकांनी या आंदोलनात सहभागी व्हावं यासाठी त्यांनी सोशल मीडियावर अभिनव पद्धतीने लोकसहभाग मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. सोशल मीडियावर लाखो नागरिक सक्रिय असतात. त्यामुळे सोशल मीडियाचा वापर करत जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे आंदोलन पोहचवण्याचा उद्देश शरद पवार यांचा असल्याची माहिती राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून देण्यात आली आहे (Sharad Pawar appeal people to participate in Farmers protest).

केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोध पंजाब आणि हरियाणाच्या शेकडो शेतकऱ्यांचं दिल्लीच्या सीमेवर आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रातील शेतकरीदेखील एकवटले आहेत. ‘संयुक्त शेतकरी कामगार मोर्चा’ या झेंड्याखाली राज्यातील 100 हून अधिक संघटना एकत्र आल्या आहेत. मुंबईत 24 ते 26 जानेवारी रोजी आंदोलन केले जाणार आहे. या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सहभागी होणार आहेत. येत्या 25 जानेवारीला आझाद मैदान येथे होणाऱ्या सभेला त्यांची उपस्थिती राहणार आहे.

दिल्ली येथील आंदोलनाला 50 हून अधिक दिवस लोटले आहेत. मात्र, अद्यापही या प्रकरणावर तोडगा निघालेला नाही. उत्तर भारतातील कडाक्याच्या थंडीतही हजारो शेतकरी आपल्या मागण्यांसाठी दिल्लीच्या वेशीवर ठाण मांडून बसले आहेत. कायदे रद्द केल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. शेतकऱ्यांच्या या भूमिकेला महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने देखील पाठिंबा दिलेला आहे. याचाच एक भाग म्हणून सत्तेतील तीनही पक्ष या आंदोलनाला आपला पाठिंबा देत आहेत.

शरद पवार उद्या (25 जानेवारी) मुंबईतील आझाद मैदान येथे होणाऱ्या सभेला शरद पवार संबोधित करणार आहेत. दिल्लीतील आंदोलनाला सोशल मीडियावरून सामान्य जनतेचा पाठिंबा लाभला आहे, तसाच पाठिंबा राज्यातूनही मिळावा यासाठी शरद पवार यांच्याकडून सोशल मीडियावरून आवाहन करण्यात आले आहे (Sharad Pawar appeal people to participate in Farmers protest).

हेही वाचा : मोठी बातमी: 27 जानेवारीला बेळगाव सीमाप्रश्नी सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांची महत्त्वाची बैठक 

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.