83 वर्षाचा तरुण पुन्हा भिडणार; शरद पवार गट ‘हे’ चिन्ह घेऊन मैदानात उतरणार

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना मोठा धक्का बसला आहे. तर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा दिलासा मिळाला आहे. निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्षाचं नाव आणि चिन्ह हे शरद पवार गटाऐवजी अजितदादा गटाला दिलं आहे. त्यामुळे शरद पवार गटाला धक्का बसला आहे. शरद पवार गटाने आता सर्वोच्च न्यायालयात जाण्याची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी दिल्लीत खलबतं सुरू झाली आहेत.

83 वर्षाचा तरुण पुन्हा भिडणार; शरद पवार गट 'हे' चिन्ह घेऊन मैदानात उतरणार
sharad pawarImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Feb 06, 2024 | 10:00 PM

मुंबई | 6 फेब्रुवारी 2024 : सर्वात कमी वयाचा मुख्यमंत्री होण्याचा त्यांनी मान मिळवला. तारुण्यातच त्यांनी पुलोदची स्थापना केली. मुंबईतील दंगल थोपवली, किल्लारीच्या भूकंपानंतर तिथल्या ग्रामस्थांचं योग्य प्रकारे पुनर्वसन केलं. नंतर त्यांनी सोनिया गांधींच्या विदेशी मुद्द्यावरून पक्ष सोडला. राष्ट्रवादीची स्थापना केली. वय वाढत गेलं, पण त्यांचा संघर्ष कायम राहिला. ऐंशी गाठल्यानंतरही त्यांनी साताऱ्यात भरपावसात सभा केली. आता निवडणूक आयोगाने त्यांचा पक्ष आणि चिन्ह अजित पवार यांच्याकडे दिला. तरीही ते डगमगले नाही. आता नवं नाव आणि नवं चिन्ह घेऊन हा 83 वर्षाचा तरुण पुन्हा भिडणार आहे. पुन्हा राजकारणाच्या आखाड्यात उतरणार आहे. हा संघर्षशील तरुण दुसरे तिसरे कोणी नसून शरद पवार आहेत.

शरद पवार यांच्या हातून निवडणूक आयोगाने पक्ष काढून घेतला आहे. चिन्हही काढून घेतलं आहे. ज्याने पक्षाला जन्म दिला, पक्ष वाढवला, त्यांच्या हातूनच त्यांचा पक्ष काढून घेण्यात आला आहे. त्यामुळे शरद पवार गटाने पुन्हा एकदा कंबर कसली आहे. दिल्लीत वकिलांशी चर्चा सुरू केली आहे. सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यासाठी हे खलबतं सुरू आहेत. कोर्टात काय मुद्दे मांडायचे, पुरावे काय द्यायचे आणि निवडणूक आयोगाने काय म्हटलंय यावर दिल्लीत खल सुरू आहे.

उगवता सूर्य घेणार

दरम्यान, निवडणूक आयोगाने उद्या दुपारी 4 वाजेपर्यंत शरद पवार गटाला पक्षाची तीन नवीन नावे सूचवण्यास सांगितलं आहे. तसेच तीन नवी चिन्हही द्यायला सांगितली आहेत. त्यामुळे पवार गटाकडून उद्या पक्षाचं नवं नाव आणि चिन्ह सूचवलं जाणार आहे. शरद पवार गट उगवता सूर्य हे चिन्ह घेण्याची शक्यता आहे. हे चिन्ह घेऊन पवार गट राज्यात पुन्हा नव्याने आपला श्रीगणेशा करण्याची शक्यता आहे. तर, शरद पवार गट पक्षाचे काय नाव निवडणूक आयोगाला देतोय याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

जल्लोष… जल्लोष…

दरम्यान, पक्षाचं नाव आणि चिन्ह अजितदादा गटाला मिळाल्यानंतर धुळ्यात अजितदादा गटाकडून जल्लोष करण्यात आला. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून हा जल्लोष केला आहे. तसेच एकमेकांना पेढे भरवतही आनंद व्यक्त केला आहे. शहरातील झाशी राणी चौकात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आनंद व्यक्त केला आहे. यावेळी एकच वादा अजितदादाच्या घोषणा देण्यात आल्या आहेत. तसेच महाराष्ट्राचा बुलंद आवाज अजित पवार, अजित पवार आदी घोषणाही यावेळी देण्यात आल्या आहेत.

सत्याचा विजय झाला

निवडणूक आयोगाचा निकाल येताच ठाण्यातही जोरदार जल्लोष करण्यात आला. ठाणे येथील मध्यवर्ती कार्यालयामध्ये कार्यकर्त्यांनी फटाके फोडत निवडणूक आयोगाच्या निर्णयाचे स्वागत केले. राष्ट्रवादीचे ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी सत्याचा विजय झाल्याची प्रतिक्रिया यावेळी व्यक्त केली. यावेळी एकमेकांना पेढे भरवण्यात आले.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.