AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sharad Pawar | सर्वात मोठी बातमी, शरद पवार यांच्याकडून अध्यक्षपदाचा राजीनामा मागे

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गेल्या दोन दिवसांपासून अनेक घडामोडी घडल्या. अखेर शरद पवार यांनी आज गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या पक्षातील विविध घडामोडींवर भूमिका मांडण्यासाठी सविस्तर पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी आपण अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेत असल्याची मोठी घोषणा केली.

Sharad Pawar | सर्वात मोठी बातमी, शरद पवार यांच्याकडून अध्यक्षपदाचा राजीनामा मागे
| Updated on: May 05, 2023 | 6:10 PM
Share

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharadn Pawar) यांनी आज अखेर पत्रकार परिषद घेऊन गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या विविध घडामोडींवर भाष्य केलं. शरद पवार यांनी दोन दिवसांपूर्वी ‘लोक माझ्या सांगाती’ या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या कार्यक्रमात शरद पवार यांनी आपल्या पक्षाध्यक्ष पदाच्या राजीनाम्याची घोषणा करुन खळबळ उडवून दिली होती. मुंबईतील वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये हा कार्यक्रम पार पडत होता. शरद पवार यांनी राजीनाम्याची घोषणा केल्यानंतर पक्षाच्या कार्यकर्ते आणि दिग्गज नेत्यांनी शरद पवार यांना राजीनामा मागे घेण्याची विनंती केली. पण पवारांनी ती विनंती मान्य केली नाही. त्यानंतर बऱ्याच घडामोडी घडल्या. या घडामोडींवर आज अखेर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन सविस्तर भूमिका मांडली.

शरद पवार नेमकं काय म्हणाले?

“लोक माझ्या सांगाती या माझ्या आत्मचरित्रपर पुस्तक प्रकाशन समारंभाच्यावेळी मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होण्याचा निर्णय जाहीर केला होता. सामाजिक जीवनातील प्रदीर्घ प्रवासानंतर मी सदर जबाबदारीतून मुक्त व्हावे अशी माझी भूमिका होती. पण मी घेतलेल्या निर्णयाने जनमानसात तीव्र भावना उसटली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे असंख्य कार्यकर्ते, पदाधिकारी आणि माझे सांगाती असलेले जनतेमध्ये अस्वस्थता निर्माण झाली”, असं शरद पवार म्हणाले.

“मी निर्णयाचा फेरविचार करावा याकरीता माझे हितचिंतक माझ्यावर विश्वास असणारे कार्यकर्ते, असंख्य चाहते यांनी संघटीत होवून एकमुखाने मला आवाहन केलं. त्याचबरोबर जनमनातून, विशेषत: महाराष्ट्रातून विविध पक्षाचे सहकारी आणि कार्यकर्ते मी अध्यक्ष होण्याची जबाबदारी घ्यावी अशी विनंती केली. लोक माझ्या सांगाती हे माझ्या सामाजिक जीवनाचे गमक आहे. माझ्याकडे जवभावनांचा अनादर होऊ शकत नाही”, अशी भावना शरद पवार यांनी व्यक्त केली.

“आपण दर्शवलेले प्रेम आणि विश्वास यामुळे मी भारावून गेलो. माझ्या निर्णयापासून परावृत्त होण्यासाठी आपण सर्वांनी केलेलं आवाहन तसेच राष्ट्रवादी पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांच्या बैठकीमुळे, या संदर्भात त्यांनी घेतलेला निर्णय माझ्यापर्यंत पोहोचवण्यात आला. या सर्वांचा विचार करुन मी पुन्हा अध्यक्षपदी राहावे, या निर्णयाचा मान राखून मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होण्याचा निर्णय मागे घेत आहे”,  अशी घोषणा शरद पवार यांनी केली.

“माझी जबाबदारी नैतिक अशी होती. मी सर्वांना विश्वासात घेतलं असतं तर त्यांनी परवानगी दिली नसती. पण मी त्यांना विश्वासात घ्यायला हवं होतं, हे मी मान्य करतो. राजीनाम्यानंतर प्रतिक्रिया उमेटल हे माहिती होती. पण इतकी तीव्र प्रतिक्रिया उमेटल असं वाटत नव्हतं”, असं शरद पवार म्हणाले.

उत्तराधिकारी कोण असणार?

“उत्तराधिकारी असणं हे माझं स्पष्ट मत आहे. पण उत्तराधिकारी राजकीय पक्ष ठरवत नसतात. लोक एकत्र काम करतात. सर्व सहकारी म्हणून काम करतात. हा कुणा एका व्यक्तीचा निर्णय असू शकत नाही”, असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं. “उत्तराधिकारी ही कन्सेप्ट त्यातली नाही. पण एक गोष्ट माझ्या मनात आहे. ती मी माझ्या सहकाऱ्यांना सांगेन आणि चर्चा करेल की, राजकारणात काही नव्या चेहऱ्यांना संधी दिली पाहिजे”, असं शरद पवार यांनी सांगितलं.

“उदाहरणार्थ जे जिल्हा पातळीवर दहा ते पंधरा वर्ष काम करतात त्यांच्याबद्दल आम्हाला खात्री आहे की राज्य पातळीवर काम करु शकतात. जे राज्य पातळीवर काम करतात ते राष्ट्रीय पातळीवर काम करु शकतात. त्यांना प्रोत्साहित करणं आणि संधी देणं ही जबाबदारी माझी आणि पक्षातील सहकाऱ्यांची आहे”, असं शरद पवार म्हणाले.

नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?.
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!.
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट.
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं.
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?.
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?.
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?.
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?.
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?.