Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना कोरोना संसर्ग, उपचार घेत असल्याची ट्विटरवरुन माहिती

राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना कोरोना संसर्गाची (Corona) लागण झाली आहे. शरद पवार यांनी ट्विटरवरुन ही माहिती दिली आहे. कोरोना संसर्ग झाला असला तरी काळजी करण्याची गरज नाही, असं त्यांनी म्हटलं आहे.

Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना कोरोना संसर्ग, उपचार घेत असल्याची ट्विटरवरुन माहिती
शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस
Follow us
| Updated on: Jan 24, 2022 | 2:22 PM

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना कोरोना संसर्गाची (Corona) लागण झाली आहे. शरद पवार यांनी ट्विटरवरुन ही माहिती दिली आहे. कोरोना संसर्ग झाला असला तरी काळजी करण्याची गरज नाही, असं त्यांनी म्हटलं आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानं उपचार सुरु असल्याची माहिती शरद पवार यांनी दिली आहे. तर, गेल्या काही दिवसांमध्ये संपर्कात आलेल्या व्यक्तींनी कोरोना चाचणी करुन घ्यावी आणि काळजी घ्यावी, असं शरद पवार यांनी आवाहन केलं आहे. गेल्या काही दिवसामंध्ये महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांना कोरोना संसर्ग झाल्याचं दिसून आलं होतं. आता शरद पवार यांना देखील कोरोना संसर्ग झाला आहे. शरद पवार यांनी ट्विटरवरुन माहिती काळजी करण्याचं कारण नसल्याचं सांगितलं आहे.

शरद पवार यांचं ट्विट

काळजी करु नका, उपचार सुरु आहेत

माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आलेली आहे. पण काळजी करण्याचं कारण नाही, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. कोरोना काळात शरद पवार यांनी राज्यात विविध ठिकाणी सरकारच्या नियमांंचं पालन करत दौरे केले होते. गेले दोन दिवस शरद पवार पुणे आणि बारामतीमध्ये होते. मुंबईत आल्यानंतर त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली ती पॉझिटिव्ह आली असल्याची माहिती आहे.

शरद पवार यांच्यावर घरीच उपचार

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर घरीच उपचार सुरु असल्याची माहिती आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे,  सदानंद सुळे आणि रेवती सुळे यांना गेल्या काही दिवसांपूर्वी कोरोना संसर्ग झाला होता.

शरद पवार यांचे नियोजित कार्यक्रम रद्द?

राज्य महिला आयोगाच्या 29 व्या वर्धापन दिनानिमित्त 25 जानेवारीला मुंबईत शरद पवार यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र, आता त्यांना कोरोना संसर्ग झाल्यानं ते अनुपस्थित राहण्याची शक्यता आहे.

इतर बातम्या: 

Corona, Omicron Cases Maharashtra LIVE : देशात 3 लाख 6 हजार 64 कोरोनाचे नवे रुग्ण

बाळासाहेबांना अभिवादन करायला लाज वाटते त्यांच्यासोबत मांडीला मांडी लावून बसता? एवढी लाचारी? फडणवीसांचा हल्लाबोल!

Sharad Pawar tested corona positive NCP Chief gave information on twitter

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.