Uddhav Thackeray: अमित शाहा यांचे आव्हान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, म्हणाले ‘मुंबई महापालिका निवडणुकीत..

मातोश्रीवर शिवसेना नेते भास्कर जाधव, अरविंद सावंत यांच्या उपस्थितीत शिवसैनिकांची एक बैठक पार पडली. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी सगळ्या शिवसेना नेत्यांशी संवाद साधला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी अमित शाहा यांच्या आव्हानाला प्रत्युत्तर दिले आहे. शिवसेनेला जमीन दाखवणाऱ्यांना मुंबई महापालिका निवडणुकीत अस्मान दाखवून देऊ, असे प्रत्युत्तर उद्धव यांनी दिले आहे.

Uddhav Thackeray: अमित शाहा यांचे आव्हान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, म्हणाले 'मुंबई महापालिका निवडणुकीत..
उद्धव ठाकरेंनी आव्हान स्वीकारलेImage Credit source: social media
Follow us
| Updated on: Sep 06, 2022 | 5:15 PM

मुंबई – मुंबईत गणरायाच्या दर्शनाला आलेल्या अमित शाहा (Amit Shah)यांनी मुंबई महापालिकेवर भाजपा आणि एकनाथ शिंदे गटाचा भगवा फडकवा, असे आदेश भाजपा नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना दिला आहे. शिवसेनेने भाजपाची फसवणूक केलेली आहे, आणि ही फसवणूक सहन करु नका, असा सल्लाही अमित शाहा यांनी भाजपा नेत्यांना दिला. त्यानंतर आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांनी अमित शाहा यांचे हे आव्हान स्वीकारले आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत (BMC Election)भाजपाला अस्मान दाखवून देऊ, असे प्रत्युत्तर उद्धव ठाकरे यांनी दिले आहे. एकनाथ शिंदे गट आणि भाजपा एक६ निवडणुका लढवणार असून, त्यांना 150 जागांचे टार्गेट अमित शाहा यांनी दिले आहे. तर शिवसेनेनेही 150 जागांचेच टार्गेट ठेवलेले आहे. त्यामुळे येत्या काळात हा वाद आणखी रंगण्याची शक्यता आहे.

भाजपाला अस्मान दाखवू

मातोश्रीवर शिवसेना नेते भास्कर जाधव, अरविंद सावंत यांच्या उपस्थितीत शिवसैनिकांची एक बैठक पार पडली. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी सगळ्या शिवसेना नेत्यांशी संवाद साधला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी अमित शाहा यांच्या आव्हानाला प्रत्युत्तर दिले आहे. शिवसेनेला जमीन दाखवणाऱ्यांना मुंबई महापालिका निवडणुकीत अस्मान दाखवून देऊ, असे प्रत्युत्तर उद्धव यांनी दिले आहे. मुख्यमंत्रीपद हवे असते तर त्यांना डांबून ठेवू शकलो असतो, त्यांना कोलकात्याला नेता आले असते, असेही ते म्हणाले.

मूठभर चालतील पण निष्ठावंत हवेत

आता जे आहेत ते मूठभर असलेत तरी चालतील पण ते निष्ठावंत हवेत असेही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. शिवसेना ही काही आपली खासजी मालमत्ता नाही, असेही ते म्हणाले. मुख्यमंत्रीपदाची हाव असतीतर क्षणात पद सोडले नसते असेही त्यांनी सांगितले. आता जे सोबत आहेत ते कट्टर, कडवट शिवसैनिक उरले आहेत, असेही ते म्हणाले.

हे सुद्धा वाचा

दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच होणार

दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच होणार, असेही उद्धव ठाकरे यांनी यावेळी ठासून सांगितले. दसरा मेळाव्यात सगळ्यांचा समाचार घेणार असल्याचेही उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केले आहे. यावेळी मुख्यमंत्री नसण्यानं बोलण्यावर मर्यादा नसेल, मुख्यमंत्रीपदाचा मास्क तोंडावर नसेल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. शिवसेनेची एकूण टीम वाढवायची आहे, असेही त्यांनी सांगितले आहे.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.