‘गुणरत्न सदावर्तेंना सरकारचाच वरदहस्त’, सत्ताधारी पक्षाच्याच बड्या नेत्याचा मोठा दावा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या बड्या नेत्याने वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यावर टीका केलीय. यावेळी त्यांनी आपल्याच सरकारला घरचा आहेर दिला आहे. "सरकारचा मी घटक आहे . तरीही सरकार निकामी ठरतंय आणि ब्युरोक्रसी वरचढ ठरतंय. सरकारमधील कुणाचा तरी वरदहस्त असल्याशिवाय सदावर्ते एवढी मस्ती करणार नाही", अशी टीका त्यांनी केली.

'गुणरत्न सदावर्तेंना सरकारचाच वरदहस्त', सत्ताधारी पक्षाच्याच बड्या नेत्याचा मोठा दावा
Gunratna Sadavarte
Follow us
| Updated on: Dec 28, 2023 | 8:13 PM

मुंबई | 28 डिसेंबर 2023 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी वकील गुणरत्न सदावर्ते यांच्याबाबत मोठा दावा केला आहे. ‘गुणरत्न सदावर्तेंना सरकारमधीलच काही जणांचा वरदहस्त आहे’, असा दावा आनंदराव अडसूळ यांनी केला. यावेळी त्यांनी गुणरत्न सदावर्ते यांच्यावर सडकून टीका केली. एसटी बँकेत गुणरत्न सदावर्ते यांच्या पॅनलच्या 12 संचालकांनी बंड पुकारुन वेगळा गट स्थापन केला आहे. त्यामुळे सदावर्तेंचं बँकेतील वर्चस्व संपुष्टात आल्यासारखंच आहे. बंड पुकारणाऱ्या संचालकांनी सदावर्तेंवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत. या सर्व घडामोडींवर आनंदराव अडसूळ यांनी सडकून टीका केलीय.

“सरकारचा मी घटक आहे . तरीही सरकार निकामी ठरतंय आणि ब्युरोक्रसी वरचढ ठरतंय. सरकारमधील कुणाचा तरी वरदहस्त असल्याशिवाय सदावर्ते एवढी मस्ती करणार नाही. त्याला पाठिंबा देणाऱ्यांचाही निषेध करतो. सरकार दखल घेणार नसेल तर मग आम्ही युनियन काय करतोय ते बघा”, असं आनंदराव अडसूळ म्हणाले.

एसटी बँकेत निर्णय चुकीचे घेतले गेले. बँकिंगची समज नसतानाही पत्नीच्या भावाला एमडी केले. बँकेची कणभरही माहिती नाही. कुठलेही निकष नियम न पाळता त्याची निवड केली. २१ वर्षाचा हा मुलगा, ज्याला अनुभव नसताना बसवले. बँकेत पत्नीचा फोटो लावला. गोडसेंचा फोटो लावला. मंत्री उदय सामंत यांना ये उदय अशी हाक मारतो, असं आनंदराव अडसूळ म्हणाले

“निर्णय एवढया उशिरा का? तीन महिन्यांत एकही मिटींग झालेली नाही. रिझर्व्ह बँकेनेही निर्णय घेतला नाही. बँकेत भ्रष्टाचार झाला आहे. दोषींवर कारवाई व्हायला हवी”, अशी मागणी आनंदराव अडसूळ यांनी केली आहे.

गुणरत्न सदावर्ते यांना मोठा धक्का

दरम्यान, गुणरत्न सदावर्ते यांना एसटी बँकेत मोठा धक्का बसला आहे. कारण एसटी बँकेतील 18 संचालकांपैकी 12 संचालकांनी त्यांचा वेगळा गट स्थापन केला आहे. हे संचालक आपल्या मागण्यांसाठी राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाप्रमाणेच आपण वेगळा गट बँकेत स्थापन केल्याचा दावा त्यांनी केला. याबाबत कायदेशीर गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी आम्ही इतके दिवस समोर आलो नाहीत, अशी भूमिका त्यांनी मुंबईत आल्यावर मांडली होती. संचालकांच्या या भूमिकेमुळे सदावर्तेंच्या एसटी बँकेतील वर्चवस्व संपुष्टात येण्याची चिन्हं आहेत.

शरणागतीपेक्षा अटक व्हायला हवी होती, कराड प्रकरणात काय म्हणाल्या सुळे
शरणागतीपेक्षा अटक व्हायला हवी होती, कराड प्रकरणात काय म्हणाल्या सुळे.
'आका' गुन्ह्याच्या बाहेर राहतील असे वाटत नाही, काय म्हणाले सुरेश धस?
'आका' गुन्ह्याच्या बाहेर राहतील असे वाटत नाही, काय म्हणाले सुरेश धस?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निषेध, राज्यातील २,२३९ ग्रामपंचायती बंद
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निषेध, राज्यातील २,२३९ ग्रामपंचायती बंद.
सरकारी दबावाशिवाय वाल्मिक कराडची चौकशी करा, अनिल देशमुख यांची मागणी
सरकारी दबावाशिवाय वाल्मिक कराडची चौकशी करा, अनिल देशमुख यांची मागणी.
'... त्याशिवाय या आकाचे अन्य गु्न्हे...,' काय म्हणाले सुरेश धस
'... त्याशिवाय या आकाचे अन्य गु्न्हे...,' काय म्हणाले सुरेश धस.
कराड जर निर्दोष आहेत, तर मग पळाले का होते ? - खासदार बजरंग सोनवणे
कराड जर निर्दोष आहेत, तर मग पळाले का होते ? - खासदार बजरंग सोनवणे.
राजकीय द्वेषापोटी माझे नाव गोवले जातेय, वाल्मिकी कराड याचे वक्तव्य
राजकीय द्वेषापोटी माझे नाव गोवले जातेय, वाल्मिकी कराड याचे वक्तव्य.
Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू
Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू.
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा.
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी.