AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘उद्धव ठाकरेंमुळे मला काँग्रेस पक्ष सोडावा लागला’, मिलिंद देवरा यांचं सर्वात मोठं वक्तव्य

"एक प्रकारची ही सगळी विचित्र अवस्था होती. गेल्या 45 वर्षात कायम देवरा कुटुंबीयांचेच नाव बॅलेट पेपरवर होतं आणि मला गर्व आहे की मी फॅमिली मेंबरसाठी मतदान केलं नाही तर मी शिवसेनेच्या धनुष्यबाणाला मत दिलं", असं मिलिंद देवरा म्हणाले.

'उद्धव ठाकरेंमुळे मला काँग्रेस पक्ष सोडावा लागला', मिलिंद देवरा यांचं सर्वात मोठं वक्तव्य
मिलिंद देवरा यांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप
| Updated on: May 21, 2024 | 4:32 PM
Share

काँग्रेसमधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षात गेलेले राज्यसभेचे खासदार मिलिंद देवरा यांनी आज पुन्हा एकदा ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे यांच्यामुळेच आपल्याला काँग्रेस पक्ष सोडावा लागला, असा गंभीर आरोप मिलिंद देवरा यांनी केला आहे. “काँग्रेस माझ्यासाठी आता भूतकाळ आहे. मला आता भविष्यात बघायचे आहे. साऊथ मुंबई देशातील सगळ्यात बेस्ट मतदारसंघ आहे आणि त्यामुळे जेव्हा मी काँग्रेसमध्ये होतो तेव्हा काँग्रेस नेतृत्वाला स्पष्ट सांगितलं की आपण ही जागा गमवायला नको. पण उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसला खूप जास्त दबाव टाकला आणि त्यामुळे मला बाहेर पडावं लागलं. काँग्रेसला माझ्या शुभेच्छा”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

“कुठेही घालमेल नाही. काही संदेश नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला संधी दिलेली आहे. मला राज्यसभेवर खासदार म्हणून पाठवलं. त्यामुळे मी फार आनंदी आहे. शिवसेनेच्या दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार यामिनीताई जाधव या फायटर आहेत आणि यामिनीताई नक्कीच निवडून येतील. याबद्दल माझ्या मनात कुठलीही शंका नाही”, असा विश्वास शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार मिलिंद देवरा यांनी व्यक्त केला.

‘ही सगळी विचित्र अवस्था होती’

“एक प्रकारची ही सगळी विचित्र अवस्था होती. गेल्या 45 वर्षात कायम देवरा कुटुंबीयांचेच नाव बॅलेट पेपरवर होतं आणि मला गर्व आहे की मी फॅमिली मेंबरसाठी मतदान केलं नाही तर मी शिवसेनेच्या धनुष्यबाणाला मत दिलं. मोदींचे हात बळकट करण्यासाठी मी मत दिलं”, असं मिलिंद देवरा म्हणाले. “महायुतीकडे पाच पांडव होते आणि या पाच पांडवांनी या ठिकाणी काम केलेलं आहे. मी स्वतः एक पांडव आहे त्यातलाच. गिरणी कामगारांचा फार जटील प्रश्न आहे. विकासाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी, त्यांना न्याय देण्यासाठी काम करायचं आहे”, असंही मिलिंद देवरा म्हणाले.

मिलिंद देवरा यांचा अरविंद सावंत यांच्यावर निशाणा

“ठाकरे गटाचे उमेदवार अरविंद सावंत निवडून येणार नाहीत. 2014, 2019 नंतर त्यांनी काही कामे केली नाहीत. ते मोदी लाटेत निवडून आले. त्यांचा कुठलाही जनसंपर्क नाही. त्या भागात कधी फिरत नाहीत. लोकांच्या समस्या दूर करण्यासाठी ते कुठलंही काम करत नाहीत. त्यांनी नागरिकांसाठी कोणतीही बैठक बोलावली नाही. त्यांनी ना बीएमसीसोबत ना म्हाडासोबत बैठक बोलावली नाही. त्यांनी गृहनिर्माण मंत्री, उपमुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्री यांच्यासोबत नागरिकांच्या घरांच्या समस्येवर बैठक आयोजित केली नाही. त्यासाठी सकारात्मक पाऊल उचललं नाही. मग जनतेला न्याय मिळणार कसा?”, असा सवाल मिलिंद देवरा यांनी केला.

“मतदान धीम्या गतीने झालं असा आरोप करणं हे विरोधकांचं षडयंत्र आहे. आपली हार झाकण्यासाठी त्या पद्धतीचं वक्तव्य करत आहेत. दक्षिण मुंबईमध्ये यामिनी ताई निवडून येतील आणि मोठ्या मताधिक्याने त्यांचा विजय होईल”, असा दावा मिलिंद देवरा यांनी केला.

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.