‘अजित दादा उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार की काय, असं वाटू लागलंय’, शिवसेना आमदाराचं वक्तव्य

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे मुख्यमंत्री होणार, अशा चर्चांना सातत्याने उधाण येताना दिसत आहे. याबाबत शिवसेना नेते संजय शिरसाट यांची भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न आम्ही केला. यावेळी त्यांनी आपली सविस्तर भूमिका मांडली.

'अजित दादा उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार की काय, असं वाटू लागलंय', शिवसेना आमदाराचं वक्तव्य
Follow us
| Updated on: Oct 05, 2023 | 9:30 PM

रवी खरात, Tv9 मराठी, मुंबई | 5 ऑक्टोबर 2023 : उपमुख्यमंत्री अजित पवार हे कधीना कधी एकदा नक्की मुख्यमंत्री बनतील, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. अजित पवार मुख्यमंत्री होणार, अशा चर्चा वारंवार सुरु असतात. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी देखील बोलताना चुकून अजित पवार यांचा मुख्यमंत्री म्हणून उल्लेख केला होता. त्यानंतर आता या सर्व घटनांवर शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिलीय. यावेळी त्यांनी “अजित दादा उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार की काय, असं वाटू लागलंय”, अशी उपरोधित प्रतिक्रिया दिली.

“तुम्ही सुधीर मुनगंटीवार यांच्या तोंडातून निघालेल्या शब्दाचा एवढा बाहू का केलाय? अजित दादा उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतात की काय? असं वाटू लागलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असताना त्यांनी एकदा देवेंद्र फडणवीस यांचा सुद्धा मुख्यमंत्री म्हणून उल्लेख केला होता”, असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

‘पुन्हा एकनाथ शिंदेंच मुख्यमंत्री होणार’

“मनामध्ये असं बोलून कोणी मुख्यमंत्री होत नसतो. त्यासाठी तुमचा असलेला एक स्टॅन्ड, तो राजकीय घटनेची संबंधित असला तर तुम्हाला ती संधी मिळते. पण येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभेमध्ये दादा हे मुख्यमंत्री होणार नाहीत. मुख्यमंत्री हे एकनाथ शिंदेच राहतील. त्यांच्याच नेतृत्वात विधानसभा आणि लोकसभेची निवडणूक लढवली जाणार आहे”, असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

‘राष्ट्रवादीत अजित पवार यांची गळचेपी झाली’

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज अजित पवार गटावर टीका केली. अजित पवार ईडीला घाबरुन सत्तेत सहभागी झाले, असा दावा शरद पवारांनी केला. यावर संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली. “तपास यंत्रणाला घाबरून कशाला जायला पाहिजे? शरद पवारांना ईडीची नोटीस आली नव्हती का? मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ईडीची नोटीस आली नव्हती का? ईडीची नोटीस अनेक लोकांना गेलेली आहे. ईडीची नोटीस आली म्हणून घाबरून पळायचं काहीच कारण नाही”, अशी प्रतिक्रिया संजय शिरसाट यांनी दिली.

“तुम्ही लोकांना त्रास देता, आम्ही उठाव का केलाय? उद्धव ठाकरे गटाच्या त्रासामुळे आम्ही उठाव केलेला ना? आम्हाला ईडीची नोटीस आली होती का? राष्ट्रवादीत अजित पवार यांची गळचेपी झाली होती. त्यामुळे त्यांनी हा उठाव केला आहे. ईडीच्या नोटीसीमुळे कोणी पक्षांतर करत नाही”, असं संजय शिरसाट म्हणाले.

‘राऊत जेलमध्ये दिसतील’

“ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे जामीनावर बाहेर आले आहेत. त्यांच्यावरचे आरोप अजून निघालेले नाहीत. बेल मिळणं हा भाग वेगळा आहे. बेल मिळाल्यामुळे काही दिवसापुरता तुम्ही रिलीफ कराल. पण तुम्ही केलेल्या चुका निश्चित तुम्हाला एका दिवशी भोगाव्या लागणार आहेत. माझ्या माहितीनुसार संजय राऊत सुद्धा काही दिवसांनंतर जेलमध्ये दिसतील”, असा धक्कादायक दावा संजय शिरसाट यांनी केला.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.