‘भुजबळांचे लाड कशाला, मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा’, शिंदे गटाच्या दोन आमदारांची मागणी; सरकारमध्ये आलबेल नाही?

मराठा ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन महाराष्ट्र सरकारमध्ये सारं काही आलबेल नाही, असंच चित्र सध्या दिसत आहे. कारण मुख्यमंत्र्यांनी मनोज जरांगे पाटील यांना दिलेल्या अध्यादेशावर छगन भुजबळ यांनी आक्षेप घेतलाय. त्यानंतर आता शिवसेनेच्या दोन आमदारांनी भुजबळांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे.

'भुजबळांचे लाड कशाला, मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा', शिंदे गटाच्या दोन आमदारांची मागणी; सरकारमध्ये आलबेल नाही?
chhagan bhujbal Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jan 31, 2024 | 3:12 PM

गिरीश गायकवाड, टीव्ही9 प्रतिनिधी, मुंबई | 31 जानेवारी 2024 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांची सगेसोयरेबाबतची मागणी मान्य केली आहे. त्यामुळे मराठ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पण सरकारच्या या निर्णयावर मंत्री छगन भुजबळ यांनी आक्षेप घेतला आहे. त्यांनी हा कायदा कोर्टात टिकणार नाही यासाठी कायदेशीर बाजूंचा अभ्यास करायलाही सुरुवात केली आहे. मुख्यमंत्र्यांनी मनोज जरांगे यांना सगेसोयरेबाबतचा अध्यादेश दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी छगन भुजबळ यांनी ओबीसी नेत्यांची बैठक बोलावली. छगन भुजबळ यांच्या या भूमिकेमुळे सरकारवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. एकीकडे सरकार मनोज जरांगे यांची मागणी पूर्ण करताना दिसत आहे. तर दुसरीकडे छगन भुजबळ मनोज जरांगे यांच्यावर सडकून टीका करत आहेत. छगन भुजबळ यांच्या भूमिकेमुळे आता सरकारमध्ये सारं काही आलबेल नाही, असंच चित्र दिसत आहे. कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाच्या जोन आमदारांनी छगन भुजबळ यांची मंत्रिमंडळातून थेट हकालपट्टी करा, अशी मागणी केली आहे.

शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी छगन भुजबळांची थेट मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, अशी मागणी केली आहे. विशेष म्हणजे त्यांच्या मागणीवर संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया देताना त्यांनीदेखील भुजबळांवर टीका केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब भूजबळ यांची हकालपट्टी करा. कशाला लाड करता? याला आधी बाहेर काढा, असं आवाहन संजय गायकवाड यांनी केलं आहे. तर संजय शिरसाट यांनीदेखील भुजबळांना राजीनामा देण्याचा सल्ला दिला आहे.

संजय गायकवाड नेमकं काय म्हणाले?

“मंत्री छगन भूजबळ जो तिरस्कार करतात ते योग्य नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब भूजबळ यांची हकालपट्टी करा. कशाला लाड करता? याला आधी बाहेर काढा. मंत्रीपदाची शपथ घेताना सरकारच्या विरोधात काम करणार नाही याची शपथ भूजबळ यांनी घेतली आहे. भूजबळ यांच्या भूमिकेशी सरकार सहमत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतेही सहमत नाहीत. मुख्यमंत्र्यांनी छत्रपतींची शपथ घेतलीय. ज्या मराठ्यांनी हा देश वाचवला त्यांच्या विरोधात भूमिका घेणे योग्य नाही. एका मंत्र्याच्या विरोधाने सरकारला फरक पडत नाही, मी खुलेआम सांगतोय. त्यांच्या राजीनाम्याने ना सरकारला फरक पडणार आणि ना एनसीपीला”, अशी टीका संजय गायकवाड यांनी केली आहे.

“जो जीआर निघाला तो जरांगे पाटील यांच्या सांगण्यानुसार निघालाय. सगळ्या प्रक्रिया पूर्ण होतील. 57 लाख नोंदी सापडल्या आहेत. वेगळ्या आरक्षणाची त्यांना गरज नाही. ते ओबीसीच आहेत. त्यांना सर्टिफिकेट मिळायला हवं. सगेसोयरेबाबात अधिसुचना 16 फेब्रुवारीला निघेल. तोपर्यंत जरांगे पाटील यांनी दम धरावा आंदोलन करू नये , सरकार सकारात्मक आहे”, असंदेखील आवाहन संजय गायकवाड यांनी केलं.

संजय शिरसाट काय म्हणाले?

“संजय गायकवाड यांचं वक्तव्य वैयक्तिक असलं तरी, काही लोकांना राजकारण करायचं असेल तर त्यांनी सरकारमधून बाहेर पडलं पाहिजे. सरकारमधील मंत्र्यांना सरकार चुकलंय हे सांगायचं असेल तर मंत्रिमंडळ बैठकीत बोलले पाहिजे. बाहेर येऊन बोलायचे असेल तर मंत्रिमंडळातून बाहेर पडले पाहिजे. आता काही लोक आमचे सरकार आल्यास आम्ही असं केलं असतं तसं केलं असतं म्हणतात. मग पूर्वी तुमचं सरकार होतं ना तेव्हा का नाही केलं? राजकारण करताना कोणत्याही समाजाला वेठीस धरू नका”, अशा शब्दांत संजय शिरसाट यांनी सुनावलं.

“मनोज जरांगे पाटलांचा मुख्यमंत्र्यांवर विश्वास आहे. त्यामुळे जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांवर शंका घेऊ नये. तशी शंका घेतली तर मुख्यमंत्री अडचणीत येतात. मुख्यमंत्री यांनी शपथ घेतली आहे ते ती पूर्ण करणार, प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत जरांगे यांनी वाट पहावी”, असं आवाहन संजय शिरसाट यांनी केलं.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.