आदित्य ठाकरे प्रेमपत्र लिहिण्यापेक्षा… मिलिंद देवरा यांचा सल्ला काय?
milind deora on aditya thackeray: मुंबई मनपा आयुक्तांनी ही प्रेमपत्र लिहिण्यापेक्षा मुंबईच्या विकासाचा खरा अजेंडा सादर करा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मुंबईचा वेगाने विकास होत आहे.
milind deora aditya thackeray: शिवसेना आणि शिवसेना उबाठामध्ये मुंबईच्या मुद्यांवरुन आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. शिवसेना उबाठा नेते आदित्य ठाकरे यांनी मुंबई महानगर पालिका मोकळ्या जागांवर मोठ्या प्रमाणात होर्डिंग्ज उभारणार असल्याचा मुद्दा उपस्थित केला आहे. त्यासंदर्भात त्यांनी मुंबई मनपा आयुक्तांना पत्र लिहिले. त्यानंतर त्यांना उत्तर देण्यासाठी शिवसेना शिंदे गटाचे खासदार मिलिंद देवरा सरसावले आहेत. आदित्य ठाकरे यांनी अशी प्रेमपत्र लिहिण्यापेक्षा मुंबईच्या विकासाचा खरा अजेंडा सादर करा, असे सुनावले आहे. आदित्य ठाकरे यांनी X वर केलेल्या ट्विटला त्यांनी ट्विटच्या माध्यमातून उत्तर दिले आहे.
आदित्य ठाकरे यांनी काय म्हटले होते…
आदित्य ठाकरे यांनी मुंबई मनपाचे आयुक्त भूषण गगरानी यांना पत्र लिहिले आहे. ते पत्र त्यांनी ट्विट केले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, मुंबई महानगरपालिकेने हाजी अली आणि अमरसन्स पार्क / ब्रीच कँडी जवळील कोस्टल रोड गार्डन्सच्या मोकळ्या जागांवर मोठ्या प्रमाणात होर्डिंग्ज उभारण्याची योजना आखली आहे. कोस्टल रोडलगतच्या प्रस्तावित मोकळ्या जागांमध्ये किमान 4-5 होर्डिंगसाठी मोकळ्या जागा तयार केल्या आहेत. या जागा नागरिकांसाठी खुल्या होण्यापूर्वीच ठेकेदारांसाठी दिल्या जात आहेत. या होर्डिंगला आमचा तीव्र विरोध राहणार आहे. आमच्या मूळ ड्रीम प्रोजेक्टमध्ये कोस्टल रोडवर होर्डिंगसाठी जागा नाही. यामुळे मुंबईकरांना आमचा शब्द की, आम्ही या वर्षी सरकार स्थापन केल्यावर हे होर्डिंग उतरवू आणि आमचे शहर उद्ध्वस्त करणाऱ्या अधिकारी आणि कंत्राटदारांना शिक्षा करू.
Aaditya,
Instead of writing love letters to the @mybmc Commissioner on random issues, present a real agenda for #Mumbai's development. Under CM @mieknathshinde Ji & DCM @Dev_Fadnavis Ji’s leadership, we've seen substantial infrastructure progress in Mumbai. While you stalled… https://t.co/8oUW7TJdlL
— Milind Deora | मिलिंद देवरा ☮️ (@milinddeora) August 5, 2024
मिलिंद देवरा यांचे आदित्य ठाकरेंना उत्तर
खासदार मिलिंद देवरा यांनी आदित्य यांचे पत्र रिट्विट करत त्यांना जोरदार उत्तर दाखवले आहे. मुंबई मनपा आयुक्तांनी ही प्रेमपत्र लिहिण्यापेक्षा मुंबईच्या विकासाचा खरा अजेंडा सादर करा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मुंबईचा वेगाने विकास होत आहे. मुंबईच्या पायाभूत सुविधांमध्ये भरीव प्रगती आहे. तुमची सत्ता असताना मेट्रोसारखे मोठे प्रकल्प रखडले होते. त्यानंतर महायुतीने ते मुदतीपूर्वी पूर्ण करण्यासाठी अथक परिश्रम घेतले आहेत.
मुंबईला आता महालक्ष्मी रेसकोर्स येथे सर्वात मोठे सार्वजनिक उद्यान मिळणार आहे. ते तुमच्या 2013 च्या थीम पार्कच्या कल्पनेपेक्षा चांगले आहे. तुम्ही तुमच्या वरळीवर लक्ष केंद्रित करा. त्या ठिकाणी मी शनिवारी तुमची अलोकप्रियता पाहिली. या ठिकाणी लोकसभा निवडणुकीत तुमच्या उमेदवार केवळ 6,500 मतांनी आघाडीवर होता, असे खासदार देवरा यांनी म्हटले आहे.
We’ve got information that the bjp- mindhe regime has planned to prop up huge hoardings in the open spaces near Haji Ali and Amarsons Park/ Breach Candy open spaces of the coastal road gardens.
Think of it. • They’ve delayed the coastal road.• They’ve escalated the cost.•… pic.twitter.com/0I3hismfU3
— Aaditya Thackeray (@AUThackeray) August 4, 2024