Sanjay Raut | सहावी जागा मविआच जिंकणार, अपक्षांवर भाजपकडून ईडी, सीबीआयचा दबाव, संजय राऊतांनी काय दिला सल्ला?

राज्यसभेच्या सहा जागांसाठी यंदा सात उमेदवार रिंगणात आहेत. त्यापैकी पाच उमेदवारांची निवडणूक बिनविरोध होणार आहे. तर सहाव्या जागेसाठी दोन उमेदवारांमध्ये लढत होईल. यात शिवसेनेचे संजय पवार आणि भाजपचे धनंजय महाडिक यांच्यात लढत निवडणूक होईल.

Sanjay Raut | सहावी जागा मविआच जिंकणार, अपक्षांवर भाजपकडून ईडी, सीबीआयचा दबाव, संजय राऊतांनी काय दिला सल्ला?
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 04, 2022 | 10:45 AM

मुंबईः राज्यसभेची (Rajyasabha Election) सहावी जागा महाविकास आघाडीच जिंकणार असल्याचा विश्वास शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी व्यक्त केला. राज्यसभेच्या उमेदवारीसाठी भाजपकडे पुरेसं संख्याबळ नाही. त्यामुळे हा उमेदवार निवडून आणण्यासाठी भाजप अपक्षांवर दबाव आणतंय. ईडी, सीबीआय (CBI) सारख्या तपासयंत्रणांद्वारे अपक्ष आमदारांना भीती दाखवली जातेय, असा आरोप संजय राऊत यांनी केला. मात्र भाजपने कितीही घोडेबाजारी केली, कितीही पैसा ओतला तरीही सहावी जागा मविआ जिंकणार आहे. त्यामुळे भाजपने यात पैसा वाया घालवू नये, असा सल्ला संजय राऊत यांनी दिला आहे.

काय म्हणाले संजय राऊत?

आज पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, ‘ सहाव्या जागेसाठी भाजप इतर दबाव कशाप्रकारे आणतेय, याची माहिती रोज येतेय. ज्यांच्यावर दबाव आहे, ते आम्हाला सांगतायत. ईडी, केंद्राच्या अखत्यारीतून नवी प्रकरणं काढली जात आहेत. भाजपचं चरित्र उघडं होतंय. महाराष्ट्रात असा प्रकारे निवडणूक लढवली जात असेल तर जनता पाहतेय. भाजपने असे पैसे एखाद्या सामाजिक कार्यात वापरावेत. बाकी गोष्टीसाठी मुख्यमंत्री समर्थ आहेत. मागील 50 वर्षांपासून आम्ही निवडणुका लढवत आहोत. याचा अनुभव सर्वाधिक आम्हाला जास्त आहे. फक्त ईडी, सीबीआय तुमच्या हातात आहे असले तरी आमच्या हातात इतरही गोष्टी आहेत.. असा इशारा संजय राऊत यांनी दिला.

हे सुद्धा वाचा

कोण-कुणासोबत  10 तारखेला कळेल

दरम्यान, बहुजन विकास आघाडीतील तीन आमदारांनी भाजपसोबत जाण्याचं जाहीर केल्याची माहिती हाती आली आहे. यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले, आतापासूनच या चर्चा करून उपयोद नाही. कोण कोणासोबत आहे, हे 10 जूनला कळेल. बहुजन विकास आघाडी, एमआयएम, अबू आझमी, शेतकरी संघटना कोणासोबत असतील हे तेव्हाच कळेल, त्यामुळे आतापासूनच या चर्चा नकोत.

6 जागांसाठी 7 उमेदवार

राज्यसभेच्या सहा जागांसाठी यंदा सात उमेदवार रिंगणात आहेत. त्यापैकी पाच उमेदवारांची निवडणूक बिनविरोध होणार आहे. तर सहाव्या जागेसाठी दोन उमेदवारांमध्ये लढत होईल. यात शिवसेनेचे संजय पवार आणि भाजपचे धनंजय महाडिक यांच्यात लढत निवडणूक होईल. या निवडणुकीत अपक्ष आमदारांचा पाठींबा मिळेल, असा दावा भाजपने केला आहे. तर महाविकास आघाडीदेखील स्वतःच्या क्षमतांवर ठाम आहे. मविआ 4 उमेदवार निवडून आणेल, आमचाच विजय होईल, अपक्ष आमदार आमच्या संपर्कात आहेत, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.