तू लढला नाहीस तरी चालेल परंतु तू विकला जाऊ नकोस…ठाकरे गटाकडून शिंदे गटावर बॅनरच्या माध्यमातून खोचक टीका

balasaheb thackeray smrutidin | शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा 17 नोव्हेंबर रोजी स्मृती दिन आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेतील दोन्ही गटाचा वाद पुन्हा उफळून आला. मुंबईत गुरुवारी झालेला हा वाद शुक्रवारी ठाण्यात दिसून आला. बॅनरच्या माध्यमातून शिवसेनेच्या ठाकरे गटाने शिंदे गटाला लक्ष केले आहे.

तू लढला नाहीस तरी चालेल परंतु तू विकला जाऊ नकोस...ठाकरे गटाकडून शिंदे गटावर बॅनरच्या माध्यमातून खोचक टीका
balasaheb thackeray Image Credit source: tv9 Marathi
Follow us
| Updated on: Nov 17, 2023 | 9:45 AM

गणेश थोरात, ठाणे | 17 नोव्हेंबर 2023 : शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज स्मृती दिन आहे. बाळासाहेबांच्या स्मृतीदिनाच्या पूर्वसंध्येला दोन शिवसेनेतील वाद उफळून आला. दोन गटाचे शिवसैनिक गुरुवारी रात्री एकमेकांच्या विरोधात भिडले. ज्या ठिकाणी बाळासाहेबांवर अंतिम संस्कार झाले त्याच ठिकाणी शिवसैनिक एकमेकांविरोधात भिडले. एकमेकांच्या विरोधात घोषणाबाजी करत धक्काबुक्की करण्यात आली. यामुळे स्मृती स्थळाजवळ लावले रॉड पडले, बॅरिकेड्सही पडले. गुरुवारच्या या वादानंतर आता ठाणे बॅनरबाजीमधून वाद निर्माण केला जात आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शिंदे आणि ठाकरे गटाकडून मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात आली आहे. ठाकरे गटाकडून शिंदे गटाला बॅनरच्या माध्यमातून खोचक टोला लगावला आहे.

ठाकरे गटाने केले शिंदे गटाला टार्गेट

17 नोव्हेंबर रोजी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त ठाण्यात शिंदे गट आणि ठाकरे गटाकडून मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात आली आहे. ठाण्यातील तीन हात नाका परिसरात शिंदे गटाकडून बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यासाठी बॅनर लावले. दुसरीकडे ठाकरे गटाकडून देखील बॅनर लावले गेले आहे. त्या बॅनरच्या माध्यमातून शिंदे गटला टार्गेट केले गेले आहे.

हे सुद्धा वाचा

काय म्हटले आहे बॅनरमध्ये

तू लढला नाहीस तरी चालेल परंतु तू विकला जाऊ नकोस तू विकला गेलास तर समाज कमजोर होईल, असा आशय असलेला मजकूर लिहिला आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला खोचक टोला लगवणारा हा मजकूर या बॅनरच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. त्यामुळे मुंबईतून सुरु झालेला हा वाद ठाण्यात पोहचणार आहे. आता ठाण्यात येणाऱ्या काळात शिंदे आणि ठाकरे गट हा सामना आपल्याला रंगताना पाहायला मिळणार आहे. दोन्ही गटातील वाद लक्षात घेऊन ठाण्यात मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. ठाण्यात दोन्ही गटाकडून देखील मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे पोलिसांनी बंदोबस्त ठेवला आहे. आता ठाण्यात पोलिसांची कसोटी लागणार आहे.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.