शिवसेना ठाकरे गटाच्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत काय ठरले? उद्धव ठाकरे यांनी काय दिला संदेश

uddhav thackeray meeting : राज्यातील सत्तासंघर्षाच्या निकालानंतर शिवसेना ठाकरे गटाची बैठक बुधवारी झाली. बैठकीत राज्यातील सर्व जिल्हाप्रमुख आणि संपर्कप्रमुख उपस्थित होते. आगामी वर्धापन दिन आणि मेळावा यासंदर्भात चर्चा झाली.

शिवसेना ठाकरे गटाच्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत काय ठरले? उद्धव ठाकरे यांनी काय दिला संदेश
Follow us
| Updated on: May 17, 2023 | 2:41 PM

दिनेश दुखंडे, मुंबई : शिवसेना ठाकरे गटाची बैठक बुधवारी झाली. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना भवनात ही बैठक झाली. बैठकीत राज्यातील सर्व जिल्हा संपर्क प्रमुख आणि जिल्हा प्रमुखांची उपस्थिती होती. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली. त्यात आगामी मेळावा, शिवसेना वर्धपान दिन यानिमित्ताने चर्चा झाली. बैठकीनंतर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास यांनी निर्णयांची माहिती दिला. परंतु यावेळी निवडणुकीबांबत काहीच चर्चा झाली नसल्याचे त्यांनी सांगितले.

काय ठरले बैठकीत

शिवसेना पदाधिकाऱ्यांचा 18 जून रोजी भव्य मेळावा मुंबईत होणार आहे. तसेच 19 जून रोजी शिवसेनेचा वर्धापन दिन हा आनंदोत्सवात साजरा केला जाणार आहे. जिल्हा प्रमुखांच्या शंकांचं निरसन आणि प्रश्नांची उत्तर सुद्धा या बैठकीत देण्यात आली. या बैठकीत आगामी निवडणुकांबाबत काहीच चर्चा झाली नसल्याचे अंबादास दानवे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

हे सुद्धा वाचा

न्यायालयाचा निकालाची माहिती

सत्ता संघर्षाच्या निकालानंतर शिवसेना शिंदे गट आणि भाजप हे निकालावरून संभ्रम निर्माण करत असल्याचं ठाकरे गटाच्या बैठकीत सांगण्यात आले. त्यामुळे बैठकीमध्ये जमलेल्या सर्व जिल्हाप्रमुखांना संपर्कप्रमुखांना सत्ता संघर्षाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची प्रत देऊन त्यातील महत्त्वाचे ठळक मुद्दे तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचण्याचे सूचना केल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल सरकारविरोधात लागला आहे. परंतु काही जण पेढे वाटप करीत आहेत. त्यामुळे तळागळापर्यंत हा निकाल पोहचण्याची जबाबदारी जिल्हाप्रमुखांवर दिली असल्याचे अंबादास दानवे यांनी सांगितले.

जिल्हाप्रमुखांना दिली जबाबदारी

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे वास्तव तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत आणि जनतेपर्यत पोहोचण्यासाठी निकालाची प्रत आणि त्यातील ठळक मुद्दे कार्यकर्त्यांना आता सर्व जिल्हाप्रमुखांनी समजून सांगायचे आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालातील आपल्या बाजूने असलेले सकारात्मक मुद्दे जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याच्या कामाची जबाबदारी या जिल्हाप्रमुखांकडे असणार आहे.

शिवसेना ठाकरे गटाच्या या बैठकीकडे राज्यातील शिवसैनिकांचे लक्ष होते. सत्तासंघर्षाचा निकालनंतर प्रथमच सर्व जिल्हाप्रमुखांना मुंबईत बोलवण्यात आले.यामुळे या बैठकीला महत्व प्राप्त झाले होते.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.