पूत्र अमोल किर्तीकर यांच्या विरोधात गजानन किर्तीकर यांनी फुंकलं रणशिंग
मुंबई उत्तर पश्चिममध्ये पूत्र अमोल किर्तीकरांच्या विरोधात गजानन किर्तीकर प्रचार करणार आहेत. महायुतीच्या उमेदवाराला विजयी करण्याचा निश्चय गजानन किर्तीकरांनी केला आहे.
Kirtikar vs kirtikar : ठाकरे गटाचे मुंबई उत्तर पश्चिमचे उमेदवार अमोल किर्तीकर यांच्या विरोधात त्यांचे पिता गजानन किर्तीकरांनी मोर्चा उघडला आहे. मुंबई उत्तर पश्चिमधून अमोल किर्तीकरांच्या विरोधात प्रचार करणार असल्याचं गजानन किर्तीकरांनी म्हटलं आहे. तसंच ईडी कारवायांवरून गजानन किर्तीकरांनी भाजपला घरचा आहेरही दिला आहे. मुंबई उत्तर पश्चिमधून महायुतीच्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी ताकद लावणार असल्याचं किर्तीकर म्हणाले आहेत. मुंबईत उत्तर पश्चिममधून ठाकरे गटाकडून अमोल किर्तीकर निवडणुकीच्या मैदानात आहेत. तर दुसरीकडे शिंदे गटाकडून रवींद्र वायकरांच्या नावाची चर्चा आहे.
एकीकडे गजानन किर्तीकर पूत्र अमोल किर्तीकरांच्या विरोधात मैदानात आहे. तर दुसरीकडे अमोल किर्तीकरांवरच्या ईडी कारवाईवरून त्यांनी थेट भाजपलाच सवाल केले आहेत. काही दिवसांपूर्वी अमोल किर्तीकरांची कथित खिचडी घोटाळा प्रकरणात चौकशी करण्यात आली होती. दरम्यान हे प्रकरण काय आहे.
काय आहे खिचडी घोटाळा?
कोविड काळात स्वत:चे मुंबईत घर नाही अशा गरीब स्थलांतरीत कामगारांसाठी लॉकडाऊन काळात जेवणाची व्यवस्था करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. कामगारांना खिचडी देण्याचं कॉन्ट्रॅक्ट महानगरपालिकेनं 52 कंपन्यांना मुंबई दिलं होतं होतं. दरम्यान, यामध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला असून त्याची चौकशी सुरू आहे.
अमोल किर्तीकरांवर कोणते आरोप?
अमोल किर्तीकरांना उमेदवारी जाहीर झाल्याच्या काही तासानंतर अमोल किर्तीकरांना ईडीचं समन्स आलं होतं. 8 एप्रिलला अमोल किर्तीकरांची ईडीकडून चौकशी झाली. कथित खिचडी घोटाळ्यात दाखल गुन्ह्यात,लाभार्थी असल्याचा ईडीचा अमोल किर्तीकरांवर संशय आहे. खिचडी घोटाळ्यात आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय सूरज चव्हाण हे देखील अटकेत आहेत.
गजानन किर्तीकर अमोल किर्तीकरांच्या विरोधात प्रचाराच्या मैदानात उतरणार आहेत. तर दुसरीकडे त्यांच्यावर होणाऱ्या ईडी कारवायांवरूनही त्यांनी संताप व्यक्त केला आहे.