दिल्लीतील हिंसाचारानंतरही मोदी-शहा गप्प का?; संजय राऊतांचा सवाल

दिल्लीतील शेतकरी आंदोलनावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण लागलं. (shivsena leader sanjay raut slams bjp over farmers protest)

दिल्लीतील हिंसाचारानंतरही मोदी-शहा गप्प का?; संजय राऊतांचा सवाल
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह
Follow us
| Updated on: Jan 31, 2021 | 8:00 AM

मुंबई: दिल्लीतील शेतकरी आंदोलनावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण लागलं. त्यानंतरशेतकऱ्यांचे आंदोलन कसे राष्ट्रदोही आहे यावर भाजपचा आयटी विभाग आता समाज माध्यमांवर प्रवचने झोडत आहे. पण शेवटी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची काही जवाबदारी आहे की नाही?, मोदी आणि शहा गप्प का आहेत? असा सवाल शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे. (shivsena leader sanjay raut slams bjp over farmers protest)

शिवसेना नेते संजय राऊत यांनी दैनिक ‘सामना’तील ‘रोखठोक’ सदरातून शेतकरी आंदोलनावरून मोदी-शहांना घेरले आहे. शेतकऱ्यांचा एक गट दिल्लीत घुसला व त्याने दंगल केली. राज्यकर्त्या पक्षाच्या प्रेरणेनेच जेव्हा दंगली होतात, तेव्हा अंहिसेवरील प्रवचने उपयोगी पडत नाहीत. शेतकऱ्यांचे आंदोलन कसे राष्ट्रदोही आहे यावर भाजपचा आयटी विभाग आता समाज माध्यमांवर प्रवचने झोडत आहे. पण शेवटी पंतप्रधान, गृहमंत्री यांची काही जवाबदारी आहे की नाही? पुन्हा मोदी व शहा हे इतर वेळी राहुल गांधीपासुन ममता बँनर्जीपर्यंत राजकीय विरोधंकावर बरसत असतात पण दिल्लीत 26 जानेवारी रोजी इतका मोठा हिंसाचार झाला त्यावर ना पंतप्रधान बोलले ना आपले गृहमंत्री, अशी टीकाही त्यांनी केली आहे.

राजकारण देशाला अस्थिरतेकडे नेणारं

मोदी व शहा हे आज प्रमुख घटनात्मक पदांवर बसुन देशाचे नेतृत्व करत आहेत. पंजाबच्या शेतकऱ्यांशी असे वागणे म्हणजे देशात अशांततेची नवी ठिणगी टाकणे आहे. दिल्लीत शेतकऱ्यांच्या आंदोलनात सरकारने फूट पाडली. लाल किल्ल्यातील घुसखोरी ही जणू फूट पाडण्यासाठीच होती. राजकारण देशाला अस्थिरतेकडे ढकलत आहे ते थांबायला हवं, असं आवाहनही त्यांनी केलं आहे.

राऊत काय म्हणाले?

>> शिखांमध्ये एकदा बंडाची ठिणगी पडली की, काय होते याचा अनुभव देशाने पूर्वी घेतला आहे. म्हणून दिल्लीतील आंदोलक शेतकऱयांचा विषय पंजाब समस्येशी निगडित आहे व पंजाब अशांत होईल असे काहीही घडू नये.

>> 26 जानेवारी रोजी दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून बसलेले शेतकरी सरळ दिल्लीत घुसले व त्यांनी काही काळासाठी लाल किल्ल्याचा ताबा घेतला. दिल्लीच्या रस्त्यांवर आणि लाल किल्ल्यावर काही काळासाठी ‘युद्ध’ परिस्थितीच निर्माण झाली. ‘हे धर्मयुद्ध आहे’ असा शेरा यावर कुणीतरी मारला. दिल्लीच्या सीमेवर 60 दिवसांपासून जे शेतकरी जमले आहेत, त्यांना कोणताही धर्म नाही व राजकीय पक्ष नाही. आपली शेती, पुढच्या पिढीचे भविष्य कॉर्पोरेट दलालांच्या हाती जाऊ नये यासाठी शेतकरी आंदोलन करीत आहेत.

>> प्रजासत्ताक दिनी आपापल्या ट्रक्टरसह ते दिल्ली शहरात घुसले तेव्हा अनेक भागांत लोकांनी त्यांच्यावर फुले उधळली. मग दिल्लीकरांनी खलिस्तानवाद्यांवर फुले उधळली असे कुणाला वाटत आहे काय? शेतकरी हिंसक झाले व त्यांना तशी चिथावणी देण्यात आली. हे चिथावणी देणारे व शेतकऱयांना लाल किल्ल्यात घेऊन जाणारे नेते शेवटी भाजप परिवारातील निघावेत यासारखा विनोद तो कसला?

>> दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा प्रश्न पंजाबातील गाडलेल्या समस्येशी जोडला जात आहे. पंजाब अशांत करू नका, असे शरद पवारांसारखे नेते वारंवार सांगत आहेत. त्यामागचे सत्य समजून घेण्याची राज्यकर्त्यांची मानसिकता नाही. (shivsena leader sanjay raut slams bjp over farmers protest)

>> शेतकऱ्यांचे नेते राष्ट्रपती भवनात जाऊन कैफियत मांडून आले, पण उपयोग काय? देशाच्या घटनात्मक प्रमुखांना 60 दिवस सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावर तोडगा काढण्याचा अधिकार नाही.

>> महाराष्ट्रातील शेतकरी पंजाबच्या शेतकऱयांना पाठिंबा देण्यासाठी मुंबईत आला. हजारो शेतकरी राजभवनाला धडक देण्यासाठी निघाले. त्यांना अडवून ठेवले. शेतकऱयांचे नेते राज्यपाल कोश्यारी यांना निवेदन देण्यास निघाले तेव्हा आपले महामहिम राज्यपाल हे गोव्याच्या दौऱयावर असल्याचे सांगण्यात आले. एरवी आपले राज्यपाल राज्याचे व लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी स्वतःच पुढाकार घेत असतात, पण हजारो शेतकरी स्वतःच आपले प्रश्न घेऊन राजभवनाकडे निघाले तेव्हा शेतकऱयांचे प्रश्न सोडविण्याची आयतीच संधी नाकारून राज्यपाल गोव्यास गेले. (shivsena leader sanjay raut slams bjp over farmers protest)

संबंधित बातम्या:

गेल्या सरकारच्या काळात मला प्रचंड त्रास झाला, तात्याराव लहानेंचा गौप्यस्फोट

Special Story : गडकरी! मोदींच्या काळातही ‘आवाज’ असणारा नेता, कामही एकदम कडक

Special Story: ‘ऑपरेशन ब्लू स्टार’ काय होतं?; वाचा विशेष रिपोर्ट!

(shivsena leader sanjay raut slams bjp over farmers protest)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.