AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुख्यमंत्र्यांसोबत पुण्यातील गुंडाचा फोटो, महाराष्ट्रात गुंडा राज…ट्विट करत संजय राऊत यांचा हल्लाबोल

Sanjay Raut and Eknath Shinde | पुणे शहरातील कुख्यात गुंड हेमंत दाभेकर याने श्रीकांत शिंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यावरुन वाद सुरु असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट पुणे शहरातील गुंड निलेश घायवळ याने भेट घेतली. तो फोटो संजय राऊत यांनी ट्विट करत टीका केली.

मुख्यमंत्र्यांसोबत पुण्यातील गुंडाचा फोटो, महाराष्ट्रात गुंडा राज...ट्विट करत संजय राऊत यांचा हल्लाबोल
| Updated on: Feb 06, 2024 | 9:15 AM
Share

मुंबई, दि. 6 फेब्रुवारी 2024 | आमदार गणपत गायकवाड यांच्या गोळीबार प्रकरणानंतर गुंड आणि राजकीय नेत्यांच्या संबंधावर चर्चा होऊ लागली आहे. या प्रकरणास दोन दिवस झाले असताना खासदार श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसाचा एक फोटो सोमवारी व्हायरल झाला आहे. त्यात पुणे शहरातील कुख्यात गुंड हेमंत दाभेकर याने श्रीकांत शिंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्या फोटोवरील चर्चा सुरु असताना अजित पवार यांची पिंपरी चिंचवडमधील गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असलेल्या असिफ महंमद इक्बाल शेख उर्फ असिफ दाढी याने भेट घेतली. सोमवारी या दोन फोटोंवरील चर्चा सुरु असताना मंगळवारी संजय राऊत यांनी पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. पुणे शहरातील गुंड निलेश घायवळ याच्यासोबतचा फोटो ट्विट केला आहे. निलेश घायवळ याच्या टोळीची कोथरुड परिसरात दहशत असून त्याच्यावर पोलीस रेकॉर्डवर २३ ते २४ गुन्हे दाखल आहे़.

सोमवारी आले होते दोन फोटो

पुणे शहरातील कुख्यात गुंड हेमंत दाभेकर याने श्रीकांत शिंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याचा फोटो व्हायरल झाला. त्यानंतर शिवसेनेकडून युवासेना पश्चिम महाराष्ट्र निरीक्षक अनिकेत जावळकर यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. कारण अनिकेत हा हेमंत दाभेकर याला घेऊन आला होता. त्यानंतर सोमवारीच अजित पवार यांची पुण्यातील गुंड असिफ महंमद इक्बाल शेख उर्फ असिफ दाढी याने भेट घेतल्याचा फोटो समोर आला. या सर्व प्रकरणावरुन राजकीय वादळ सुरु असताना मंगळवारी एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुंड निलेश घायवळ याचा फोटो आला. त्यावरुन संजय राऊत यांनी हल्ला केला आहे.

काय म्हणाले संजय राऊत

संजय राऊत यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, महाराष्ट्रात गुंडा राज: गुंड आणि दरोडेखोरांनी गुंडांसाठी चालविलेले राज्य! हे महाशय कोण आहेत? त्यांचे नेमके कर्तुत्व काय याचा खुलासा गृहमंत्री आणि पुणे पोलीस आयुक्तांनी करावा.कायद्याचे राज्य असे असते काय? पुणे संस्कृती आणि विद्येचे माहेरघर होते..आज ही काय अवस्था करुन ठेवली आहे मोदी शहा यांच्या राज्यकर्त्या टोळीने..

कोण आहेत निलेश घायवळ

निलेश घायवळ याच्या टोळीची कोथरुड परिसरात दहशत आहे. त्याच्यावर २३ ते २४ गुन्हे दाखल आहे़त. पुण्यातील गुंड गजानन मारणे आणि घायवळ टोळी या दोन्ही टोळ्यांमध्ये २०१० मध्ये वाद झाला होता. त्यावेळी निलेश घायवळ व त्याच्या टोळीने गोळीबार करीत सचिन कुडले याचा खून केला होता़. या खटल्यात फेब्रुवारी २०१९ मध्ये निलेश व त्याच्या साथीदारांची निर्दोष सुटका झाली होती़. आता संजय राऊत यांच्या नव्या आरोपानंतर शिवसेनेकडून काय उत्तर दिले जाणार? याकडे आता लक्ष लागले आहे.

हे ही वाचा

पुण्यातील गुंडाकडून खासदार श्रीकांत शिंदे यांना शुभेच्छा, फोटो व्हायरल होताच मोठी कारवाई

आधी पार्थ पवार अन् गुंड गजा मारणे भेट, आता अट्टल गुन्हेगार असिफ दाढी अजित पवार यांना भेटला

त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान.
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या...
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या....
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप.
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश.
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!.
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप.
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले.
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.