संजय राठोडांनी मंत्रिपद सोडलं, आमदारकीचं काय?; भाजपचा सवाल

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात शिवसेना नेते संजय राठोड यांचा राजीनामा घेण्यात आला. (shivsena should take sanjay rathod's resigns from Assembly, bjp demand)

संजय राठोडांनी मंत्रिपद सोडलं, आमदारकीचं काय?; भाजपचा सवाल
उद्धव ठाकरे-संजय राठोड
Follow us
| Updated on: Mar 01, 2021 | 5:02 PM

मुंबई: पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात शिवसेना नेते संजय राठोड यांचा राजीनामा घेण्यात आला. पण त्यांच्या आमदारकीचं काय? शिवसेना त्यांच्या आमदारकीचाही राजीनामा घेणार का? असा सवाल भाजपने केला आहे. भाजपने त्यांच्या ट्विटर हँडलवरून राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी उचलून धरल्याने पूजा चव्हाण प्रकरण राठोड आणि शिवसेनेला आणखीनच भोवणार असल्याचं दिसत आहे. (shivsena should take sanjay rathod’s resigns from Assembly, bjp demand)

भाजपने त्यांच्या ट्विटर हँडलवरून संजय राठोड यांच्याविरोधात कँम्पेन सुरू केलं आहे. या पोस्टमध्ये भाजपने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राठोड यांचे फोटो छापले आहेत. त्यावर पूजा चव्हाण प्रकरणी भाजपने मुख्यमंत्र्यांना काही प्रश्न विचारून या प्रकरणातील मुख्यमंत्र्यांच्या बेपर्वाईवरच बोट ठेवलं आहे. बराच गदारोळ माजल्यानंतर शिवसेनेने संजय राठोड यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यायला लावला. पण आता आमदारकीचाही राजीनामा देऊन राठोड चौकशीला सामोरे जातील का?, पूजा चव्हाण यांची हत्या, आत्महत्या की घातपात याचा तपास कधी पूर्ण होणार? सत्य जनतेला कधी कळणार?, असा सवाल भाजपने केला आहे.

फिर्याद का दाखल केली नाही?

मुख्यमंत्र्यांनी काल पत्रकार परिषद घेऊन पूजा चव्हाण प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिल्याचं म्हटलं आहे. चौकशीचे आदेश दिले तर इतके दिवस उलटूनही या प्रकरणाची साधी फिर्याद दाखल का करण्यात आली नाही? फिर्याद दाखल न करणे हा राठोडांना वाचवण्याचा प्रयत्न होता का? असा सवालही भाजपने केला आहे.

दोषी आढळले तर कारवाई होणार का?

काल राठोड यांनी राजीनामा दिला खरा पण आता ठाकरे सरकार त्यांच्यावर कारवाई करणार का? ठाकरे सरकार त्यांची चौकशी कधी करणार? आणि चौकशीत राठोड हे दोषी आढळले तर त्यांच्यावर निष्पक्षपातीपणाने कारवाई होणार का? हे खरे प्रश्न आहेत, असंही भाजपने म्हटलं आहे.

राठोड उद्यापासून अधिवेशनाला येणार

राजीनामा दिल्यानंतर संजय राठोड हे थेट यवतमाळला जाणार असल्याचं सांगितलं जात होतं. पण राठोड हे यवतमाळला जाणार नसून ते उद्यापासून अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार म्हणून भाग घेणार असल्याचं राठोड यांनीच सांगितलं. शिवसेना नेते अॅड. अनिल परब यांना भेटून बाहेर पडल्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. मला मोकळं सोडा. आता झाला ना राजीनामा. मी अधिवेशनातच राहणार आहे, असंही ते म्हणाले. (shivsena should take sanjay rathod’s resigns from Assembly, bjp demand)

संबंधित बातम्या:

वरळीत आदित्य ठाकरेंचंच चालतं, त्यांनी सांगितल्यानेच पब-बार बिनधास्त सुरु : देवेंद्र फडणवीस

‘चित मैं जिता पट तू हारा’ ही भाजपची भूमिका; विरोधकांच्या ‘त्या’ आरोपानंतर काँग्रेसचा पलटवार

वनमंत्री पदासाठी आता काँग्रेसचं लॉबिंग, मदत आणि पुनर्वसन खातं शिवसेनेला देण्याची तयारी!

(shivsena should take sanjay rathod’s resigns from Assembly, bjp demand)

Walmik Karad :वाल्मिक कराडची कसून चौकशी अन् CID कडून 14 दिवसांची कोठडी
Walmik Karad :वाल्मिक कराडची कसून चौकशी अन् CID कडून 14 दिवसांची कोठडी.
'...अन् सर्व जेलमध्ये जाणार', संतोष देशमुख हत्येवर जरांगेंचं भाष्य
'...अन् सर्व जेलमध्ये जाणार', संतोष देशमुख हत्येवर जरांगेंचं भाष्य.
'तुम्हारा तो वक्त है, हमारा दौर...', अब्दुल सत्तारांची शेरो शायरी
'तुम्हारा तो वक्त है, हमारा दौर...', अब्दुल सत्तारांची शेरो शायरी.
पवार कुटुंब एकत्र येणार? दादांच्या आईचं विठोबाकडे साकडं म्हणाल्या...
पवार कुटुंब एकत्र येणार? दादांच्या आईचं विठोबाकडे साकडं म्हणाल्या....
2025ला राज्यात कोणते प्रकल्प सुरू होणार?सरकारकडून या प्रकल्पाची घोषणा
2025ला राज्यात कोणते प्रकल्प सुरू होणार?सरकारकडून या प्रकल्पाची घोषणा.
ठाकरे गटाला मोठा धक्का? बडा नेता पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत
ठाकरे गटाला मोठा धक्का? बडा नेता पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत.
महायुतीच्या 9 मंत्र्यांनी अद्याप पदभार स्वीकरलाच नाही, कारण नेमकं काय?
महायुतीच्या 9 मंत्र्यांनी अद्याप पदभार स्वीकरलाच नाही, कारण नेमकं काय?.
'बजरंगाच्या छातीत राम तर माझ्या छातीत शरद पवार', झिरवाळ काय म्हणाले?
'बजरंगाच्या छातीत राम तर माझ्या छातीत शरद पवार', झिरवाळ काय म्हणाले?.
'केरळ मिनी पाक', नितेश राणेंच्या त्या वक्तव्याचा केरळच्या CMकडून निषेध
'केरळ मिनी पाक', नितेश राणेंच्या त्या वक्तव्याचा केरळच्या CMकडून निषेध.
नववर्षाच्या पहिल्या दिवशी राज ठाकरेंकडून आदेश,'माझ्या मनसैनिकांनो...'
नववर्षाच्या पहिल्या दिवशी राज ठाकरेंकडून आदेश,'माझ्या मनसैनिकांनो...'.