शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच ‘ही’ गोष्ट घडणार; मातोश्री बाहेरच ठाकरे आणि शिंदे गटाची बॅनरबाजी

शिवसेनेचा आज 57 वा वर्धापन दिन आहे. या निमित्ताने शिंदे गट आणि ठाकरे गटाने मेळाव्याचं आयोजन केलं आहे. दोन्ही गटाचे मेळावे मुंबईतच होणार आहे. पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शक्तीप्रदर्शन करण्याचा दोन्ही गटाचा प्रयत्न आहे.

शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच 'ही' गोष्ट घडणार; मातोश्री बाहेरच ठाकरे आणि शिंदे गटाची बॅनरबाजी
banner warImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 19, 2023 | 8:09 AM

मुंबई : शिवसेनेचा आज 57 वा वर्धापन दिन आहे. या वर्धापन दिनाची दोन्ही गटांनी जय्यत तयारी केली आहे. दोन्ही गटाकडून जोरदार शक्तीप्रदर्शनही केलं जाणार आहे. त्यासाठी दोन्ही गटांनी कंबर कसली आहे. विशेष म्हणजे शिवसेनेच्या 57 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच शिवसेनेचे दोन वर्धापन दिन साजरे होणार आहेत. त्यामुळे या दोन्ही वर्धापन दिनाकडे केवळ महाराष्ट्राचेच नव्हे तर संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. खासकरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एकमेकांबद्दल काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

शिवसेनेच्या वर्धापन दिनामुळे मुंबईसह ठाण्यात जागोजागी बॅनर्स, होर्डिंग्ज लावण्यात आले आहेत. सर्वाधिक बॅनर्स आणि होर्डिंग वांद्रे येथील कलानगरातील मातोश्री परिसरात हे बॅनर्स आणि होर्डिंग्ज लागले आहेत. शिंदे गट आणि ठाकरे गटाने या परिसरात प्रचंड होर्डिंग्ज लावले आहेत. या होर्डिंग्ज आणि बॅनर्समधून एकमेकांना डिवचण्याचं काम करण्यात आलं आहे. सर्वाधिक होर्डिंग आणि बॅनर्स हे शिंदे गटाचे लागले आहेत. कलानगरातील रस्त्यावर जागोजागी होर्डिंग्ज आणि बॅनर्स लावले आहेत. कलानगरच्या ब्रीजवरही शिंदे गटाचे होर्डिंग्ज आणि बॅनर्स लागले आहेत.

हे सुद्धा वाचा

वाघ निघाले गोरेगावला

शिंदे गटाच्या बॅनर्सवर वाघ निघाले गोरेगावला… वाघांचा वारसा… असं लिहिलं आहे. या होर्डिंग्ज आणि बॅनर्सवर बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे फोटो आहेत. मातोश्रीतून बाहेर पडताच हे बॅनर्स दिसत आहेत. संपूर्ण परिसर बॅनर्स आणि होर्डिंग्जने भरून गेल्याने चर्चांनाही उधाण आलं आहे.

इतिहासात पहिल्यांदाच…

शिवसेनेचा आजपर्यंत एकच मेळावा व्हायचा. त्या मेळाव्याला पूर्वी एकटे बाळासाहेब ठाकरे संबोधित करायचे. नंतर शिवसेनेचे काही नेतेही संबोधित करू लागले. उद्धव ठाकरे यांचा राजकीय उदय झाल्यानंतर तेही मेळाव्याला संबोधित करायचे. पण मुख्य आकर्षण हे बाळासाहेब ठाकरे यांचंच असायचं. बाळासाहेबांच्या निधनानंतर उद्धव ठाकरे यांचं मेळाव्यात मुख्य भाषण होत होतं. आता पहिल्यांदाच शिवसेनेच्या इतिहासात वेगळी घटना घडणार आहे. पहिल्यांदाच शिवसेनेचे वर्धापन दिनाचे दोन मेळावे होणार आहेत.

कुणाचा मेळावा कुठे?

ठाकरे आणि शिंदे गटाचे वर्धापन दिनाचे मेळावे आज होत आहे. ठाकरे गटाचा मेळावा किंग्ज सर्कल येथील षण्मुखानंद हॉलमध्ये होणार आहे. संध्याकाळी 5 नंतर या मेळाव्याला सुरुवात होईल. संध्याकाळी 7 वाजता उद्धव ठाकरे यावेळी संबोधित करतील. काल वरळीच्या शिबीरातून भाजपवर हल्लाबोल केल्यानंतर आज उद्धव ठाकरे यांच्या रडारवर कोण असणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तर शिंदे गटाचा मेळावा गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये होणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काय बोलतात याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे.

दोन्ही गटाचं शक्तीप्रदर्शन

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही गटांचं मुंबईत शक्तीप्रदर्शन होणार आहे. नेस्को सेंटरच्या भव्य प्रांगणात होणाऱ्या या मेळाव्याला हजारो शिवसैनिक येणार असल्याचं सांगितलं जात आहे. या मेळाव्याला प्रत्येक जिल्ह्यातून 300 ते 400 शिवसैनिक आणण्याचं टार्गेट देण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. नेस्को सेंटरमध्ये बाळासाहेब ठाकरे यांचे पोस्टर्स लावले आहेत. त्यावर काँग्रेससोबत कधीच युती करणार नाही असं लिहिलंय.

जागा कमी पडल्या तर तुम्ही राष्ट्रवादीला सोबत घेणार का? असा सवाल बाळासाहेबांना विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनी नेव्हर… नेव्हर असं म्हटलं होतं. तो मजकूरही या पोस्टर्सवर लिहिण्यात आला आहे. तसेच स्टेजवर स्क्रीन लावण्यात आल्या आहेत. त्यामुळे या स्क्रीनवरून उद्धव ठाकरे यांची जुनी भाषणे दाखवून त्यांना तोंडघशी पाडण्याचा शिंदे गटाचा प्रयत्न असल्याचं सांगितलं जात आहे. शिंदे गटाच्या कार्यक्रमालाही संध्याकाळी 5 नंतर सुरुवात होणार आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.