Mumbai: धक्कादायक, आजोबांच्या वयाच्या 2 आरोपींकडून 9 वर्षांच्या मुलीचे लैंगिक शोषण, 2 वर्षांपासून सुरु होता प्रकार.

धक्कादायक बाब म्हणजे हा बलात्कार एकदाच झालेला नाही. आरोपींपैकी दोघे हे साठीच्या वयाचे नराधम आहेत. हे दोघेही या लहानग्या 9 वर्षांच्या मुलीवर गेल्या दोन वर्षांपासून लैंगिक अत्याचार करीत असल्याचे समोर आले आहे. आता पोलिसांनी या प्रकरणात पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असून, तिसऱ्या आरोपीचा शोध घेण्यात येत आहे. आरोपींच्या वयाचा विचार केला तर या तीन आरोपींपैकी दोघांची वये ही साठी उलटलेली आहेत. तरीही हे आरोपी दोन वर्षे हे कृत्य करत होते.

Mumbai: धक्कादायक, आजोबांच्या वयाच्या 2 आरोपींकडून 9 वर्षांच्या मुलीचे लैंगिक शोषण, 2 वर्षांपासून सुरु होता प्रकार.
रिकव्हरी एजंटने गर्भवतीला ट्रॅक्टरखाली चिरडले !Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Sep 02, 2022 | 3:10 PM

मुंबई- लहानग्या मुली, महिला यांच्यावरील अत्याचारांचे प्रकार थांबताना दिसत नाहीत. कायदेशीरदृष्ट्या संरक्षण देऊनही मुलींवरील अत्यांचारांचे प्रमाण थांबताना दिसत नाहीये. अशीच एक घटना मुंबईच्या भांडुप (Bhandup)उपगनरात उघड झालेली आहे. या ठिकाणी पोलीस ठाण्यात एका 9  वर्षांच्या लहानगीवर (9 years old girl)बलात्कार केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. यात तीन आरोपींविरोधात (case against 3 )तक्रार दाखल करण्यात आली असून, यातील दोघांना अटक करण्यात आली आहे. या दोन्ही गुन्हेगारांची वये ऐकून तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. यातील एका आरोपी वय 62 आहे तर दसऱ्या आरोपीचे वय 65 असल्याचे नमूद करण्यात आले आहे. वयाने साठी पार केलेले हे नराधम या लहानग्या मुलीचे लैंगिक शोषण करीत होते.

गेल्या दोन वर्षांपासून सुरु होता प्रकार

याहून धक्कादायक बाब म्हणजे हा बलात्कार एकदाच झालेला नाही. आरोपींपैकी दोघे हे साठीच्या वयाचे नराधम आहेत. हे दोघेही या लहानग्या 9 वर्षांच्या मुलीवर गेल्या दोन वर्षांपासून लैंगिक अत्याचार करीत असल्याचे समोर आले आहे. आता पोलिसांनी या प्रकरणात पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असून, तिसऱ्या आरोपीचा शोध घेण्यात येत आहे. आरोपींच्या वयाचा विचार केला तर या तीन आरोपींपैकी दोघांची वये ही साठी उलटलेली आहेत. तरीही हे आरोपी दोन वर्षे हे कृत्य करत होते.

नेमका काय आहे प्रकार?

या लहानग्या मुलीला एका समाजिक संस्थेच्या महिला पदाधिकाऱ्याने पाहिले आणि तिला अनाथालयात दाखल केले. त्यानंतर तिथे 62 आणि 65वर्षांचे हे आरोपी पोहचले आणि त्यांनी या मुलीचे संगोपन करीत असल्याचा दावा केला आहे. मात्र या दोन्ही आरोपींची वागणूक संशयास्पद वाटल्याने तिथल्या अनाथालयातील अधिकाऱ्याने या लहान मुलीला विश्वासात घेऊन त्यांच्याबाबत विचारले. त्यावेळी त्या लहानगीने तिच्यासोबत काय होते आहे, हा सगळा प्रकार सांगितला. अवघ्या ९ वर्षांच्या लहानगीवर हे नराधम लैंगिक अत्याचार करत असल्याचे त्यावेळी स्पष्ट झाले.

मुलीने पुढे सांगितले की, तिचे आई-वडील एकमेकांपासून वेगळे झाले आहेत. तिच्या वडिलांनी दुसरे लग्न केले आहे. ही लहानगी तिच्या आईच्या एका नातेवाईक महिलेकडे राहत होती. मुलीच्या आजीकडे घर नव्हते, त्यावेळी आरोपींपैकी एकाने त्यांना मदत केली आणि त्यानंतर या लहानगीवर अत्याचार करण्यास सुरुवात केली. या आरोपीने त्यांना राहण्यासाठी जागा उपलब्ध करुन दिली होती. आरोपी नेहमी तिथे येत असे. ज्यावेळी आजी बाहेर जाई, त्यावेळी तो या मुलीचे शोषण करत असल्याची माहिती समोर आली आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.