AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईतील कोळीवाडे, गावठाणातील घरांना सरसकट मालमत्ता कर माफ करा, शेलारांची स्वाक्षरी मोहीम

मुंबईकरांचा अत्यंत संवेदनशीलपणे सरकारने विचार करण्याची गरज असल्याचे सांगत आमदार आशिष शेलार यांनी कोळीबांधवांच्या घरांना सरसकट मालमत्ता कर माफ करावा अशी मागणी पत्राव्दारे केली आहे.

मुंबईतील कोळीवाडे, गावठाणातील घरांना सरसकट मालमत्ता कर माफ करा, शेलारांची स्वाक्षरी मोहीम
भाजपची स्वाक्षरी मोहीम
| Edited By: | Updated on: Jan 14, 2022 | 6:35 PM
Share

मुंबई : मूळचे मुंबईकर असलेल्या मुंबईतील गावठाण, कोळीवाड्यातील घरांना सरसकट मालमत्ता कर माफ करा अशी मागणी भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी आघाडी सरकारकडे केली असून त्याच्या समर्थनासाठी वांद्रे येथे भाजपातर्फे दोन दिवसांची स्वाक्षरी अभियान हाती घेण्यात आले आहे. मुंबईचे मुळ रहिवासी असलेल्या आगरी, कोळी बांधवांची मुंबईत 84 हून अधिक गावठाण आणि कोळीवाडे आहेत. यासाठी स्वतंत्र डिसीआर नसल्याने त्यांचा पुनर्विकास होऊ शकलेला नाही. या मुळ मुंबईकरांची जुनी बैठी घरे असून त्यांचे क्षेत्रफळ 500 फुटांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे सरकारने मुंबईतील 500 चौरस फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ करण्याचा जो निर्णय घोषित केला त्या निर्णयाचा फायदा या गावठाण व कोळीवाड्यांतील घरांना होणार नाही.

कोस्टल रोडच्या कामामुळे कोळी बांधवांचे नुकसान

एकिकडे कोस्टल रोड, समुद्राचे पाणी गोडे करणे यासारख्या प्रकल्पांमुळे या कोळी बांधवांच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे. मोठी चक्रीवादळे आली त्यामध्ये त्यांचे अतोनात नुकसान झाले त्याला मदत सरकार करु शकले नाही. तर निसर्गातील बदलांमुळे त्यांचा एकुण मासेमारी व्यवसाय अडचणीत असताना सरकारकडून डिझेल परतावा ही त्यांना वेळेत मिळत नाही. त्यामुळे मच्छीमार बांधव प्रचंड अडचणीत आहे. शिवाय त्यांना इतरांन प्रमाणे कोरोना आणि लॉकडाऊनचा फटकाही बसलाच. त्यामुळे या मुळ मुंबईकरांचा अत्यंत संवेदनशीलपणे सरकारने विचार करण्याची गरज असल्याचे सांगत आमदार आशिष शेलार यांनी कोळीबांधवांच्या घरांना सरसकट मालमत्ता कर माफ करावा अशी मागणी पत्राव्दारे केली आहे.

या मागणीच्या समर्थनासाठी आज आणि उद्या दोन दिवसांचे स्वाक्षरी अभियान खार दांडा कोळीवाड्यांत राबविण्यात येत आहे. आज वांद्रे पश्चिम विधानसभेचे भाजपा अध्यक्ष किशोर पुनवत, .वॉर्ड अध्यक्ष देवयानी वैद्य यांच्यासह भाजपा पदाधिकाऱ्यांनी हे स्वाक्षरी अभियान राबवले. उद्या सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत खारदांडा येथे हे अभिमान राबविण्यात येणार आहे. आजच्या अभियानाला कोळी बांधवांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला अशी माहिती किशोर पुनवत यांनी दिली आहे.

बृहन्मुंबई महापालिकेच्या ‘व्हॉट्सअ‍ॅप चॅट-बॉट’ सुविधेचे लोकार्पण, मोबाईलवर मिळणार 80 पेक्षा अधिक सुविधा; जाणून घ्या ठळक वैशिष्ट्ये

VIDEO: पंतप्रधानांसोबतच्या बैठकीला दांडी, पालिकेच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?

ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप.
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले.
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?.
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!.
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट.
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं.
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?.