Somaiya on Thackeray : उद्धव ठाकरेंचे स्वप्न चकणाचूर, 57 पैशांचाही घोटाळा नाही; सोमय्यांचा दावा

किरीट सोमय्या म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे स्वप्न चकणाचूर झाले आहे. 57 कोटी सोडा साधा 57 पैशांचाही घोटाळा नाही. 12 आरोप आमच्यावर केले. त्यातल्या 11 प्रकरणात एकही पुरावा त्यांना कोर्टात देता आला नाही. आता महाराष्ट्र सरकारने वेळ मागितली आहे. आमच्या न्यायदेवतेवर विश्वास आहे.

Somaiya on Thackeray : उद्धव ठाकरेंचे स्वप्न चकणाचूर, 57 पैशांचाही घोटाळा नाही; सोमय्यांचा दावा
किरीट सोमय्या.
Follow us
| Updated on: Apr 28, 2022 | 12:57 PM

मुंबईः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे स्वप्न चकणाचूर झाले आहे. 57 कोटी सोडा साधा 57 पैशांचाही घोटाळा नाही. 12 आरोप आमच्यावर केले. त्यातल्या 11 प्रकरणात एकही पुरावा त्यांना कोर्टात देता आला नाही. आता महाराष्ट्र सरकारने वेळ मागितली आहे. आमच्या न्यायदेवतेवर विश्वास आहे. आता आयएनएस विक्रांत (INS Vikrant) प्रकरणी 14 जूनला सुनावणी होणार आहे, अशी माहिती भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी दिली. शिवसेना नेते संजय राऊत यांनी आयएनएस विक्रांत घोटाळ्याप्रकरणी किरीट सोमय्यांवर गंभीर आरोप केले होते. सोमय्या यांनी सेव्ह विक्रांतच्या नावाखाली मुंबईतून निधी गोळा केला. त्याची व्याप्ती राज्यव्यापी असून, काही राज्यांमध्येही हा निधी गोळा केला गेला. एकूण 58 कोटी रुपये जमा केले गेले. सुमारे 600 ते 700 बॉक्स भरेल एवढा निधी होता. हे बॉक्स सोमय्या यांच्या मुलूंड नीलम नगरमधील निवासस्थानी आणि एका बिल्डरच्या कार्यालयात हा निधी ठेवण्यात आला होता. हा पैसा राजभवनला दिला गेला नसल्याचे राजभवनने स्पष्ट केले आहे. त्यामुळे हा पैसा गेला कुठे? असा सवाल राऊत यांनी केला होता. याप्रकरणी दाखल झालेल्या तक्रारीत सध्या न्यायालयात सुनावणी सुरू आहे.

सरकारने वेळ मागून घेतला…

किरीट सोमय्या म्हणाले की, आमचा न्यायालयावर विश्वास आहे. खोदा पहाड चुहा भी नही निकला, अशी अवस्था आता झालीय. महाराष्ट्र सरकारने मला आणि नील सोमय्या यांना जी माहिती मागितली, ती आम्ही दिली. त्यात 57 पैशाचांही घोटाळा झालेला दिसला नाही. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने न्यायालयात वेळ मागून घेतला. आमचा न्यायदेवतेवर विश्वास आहे. मात्र, वास्तविक उद्धव ठाकरे यांचे किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांना अटक करण्याचे स्वप्न चकणाचूर झाल्याचे ते म्हणाले.

त्यांनी अजून पुरावे दिले नाहीत…

सोमय्या पुढे म्हणाले की, सरकारच्या वकिलाने कबूल केले की आम्ही सहकार्य करत आहोत. त्यांना जी माहिती पाहिजे, ती आम्ही देऊ. आमचा न्यायदेवतेवर विश्वास आहे. सध्या न्यायालयाने आमच्यावर कसल्याही अटी आणि शर्थी घातल्या नाहीत. मात्र, ते सांगतील तेव्हा आम्ही चौकशीला सहकार्य करू.महाराष्ट्र सरकारने सांगितले आम्हाला काही सापडले. मात्र, ते खोटे आरोप करून स्टंटबाजी करत होते. हायकोर्टाने स्पष्पपणे विचारले 57 कोटींची माहिती द्या. मात्र, त्यांनी अजूनपर्यंत पुरावे दिले नाहीत.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.