अतिमुसळधार पाऊस! मुंबईत मेट्रो स्टेशनजवळचा काही भाग पाहतापाहता खचला, धक्कादायक VIDEO समोर

मुंबई, ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडतोय. मुंबईत मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे. असं असताना या पावसाची भीषणता सांगणारा एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे.

अतिमुसळधार पाऊस! मुंबईत मेट्रो स्टेशनजवळचा काही भाग पाहतापाहता खचला, धक्कादायक VIDEO समोर
Follow us
| Updated on: Jun 28, 2023 | 4:32 PM

मुंबई : मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, टिटवाळा, पालघर, वसई-विरार शहरांमध्ये प्रचंड पाऊस पडतोय. कल्याण-डोंबिवलीत आज सकाळपास धुवाँधार पाऊस पडतोय. मुसळधार पावसामुळे सखल भागांमध्ये पाणी साचलं आहे. अनेक ठिकाणी पाणी साचल्यामुळे वाहतुकीवर त्याचा मोठा परिणाम पडला आहे. मुंबईची लाईफलाईन असलेली मुंबई लोकल उशिराने धावत आहे. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी संरक्षण भिंत कोसळल्याची माहिती समोर आली आहे. असं असताना मुंबईतला एका मेट्रो स्टेशनचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. संबंधित मेट्रो स्टेशनजवळली काही भाग मुसळधार पावसामुळे अक्षरश: खचला आहे. संबंधित घटनेचा व्हिडीओ धडकी भरवणारा आहे. पाऊस अजूनही सुरुच आहे. तसेच तो आज दिवसभर सुरु राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना अनावश्यक कारणासाठी घराबाहेर न पडण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

बोरिवलीतील मागाठाणे मेट्रो स्टेशनजवळ भूस्खलनाचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ आज सकाळचा आहे. पाऊस पडत असताना त्याचवेळी मेट्रो स्टेशनजवळ खोदलेल्या खड्ड्यात मेट्रो स्टेशनच्या पायऱ्यांजवळचा काही भाग अक्षरश: खचला आहे. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झालेलं नाही, अशी माहिती समोर आली आहे. पण संबंधित घटनेवर चिंता व्यक्त केली जात आहे. अजून संपूर्ण पावसाळा बाकी आहे. पावसाला आताच सुरुवात झाली आहे. त्यामुळे या घटनेला गांभीर्याने बघण्याची जास्त आवश्यकता आहे.

हे सुद्धा वाचा

कल्याण डोंबिवलीत पावसाचा हाहाकार

कल्याण डोंबिवलीत आज सकाळपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. कल्याणमध्ये काल दिवसभर पाऊस पडला. त्यानंतर आजही पाऊस मुसळधारपणे कोसळतोय. या पावसाचा जोर आज दुपारनंतर जास्त वाढला. त्यामुळे कल्याणच्या आडीवली ढोकळी परिसरात रस्त्यावर गुडघाभर पाणी बघायला मिळतंय. त्यामुळे वाहनचालक, शाळकरी विद्यार्थ्यांचे हाल होताना दिसत आहे. विशेष म्हणजे पावसामुळे महापालिकेच्या नालेसफाईची पोलखोल झालीय. बाजूच्या इमारतीमध्ये पाणी शिरल्याने नागरिक हैराण झाले आहेत.

नवी मुंबईत भिंत कोसळली

मुसळधार पावसामुळे नवी मुंबईतील सीवूडमध्ये भिंत कोसळल्याची घटना समोर आली आहे. नवी मुंबईतील NRI कॉम्प्लेक्समध्ये भिंत कोसळली आहे. यामुळे महागड्या गाड्यांचे नुकसान झालं आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

अंबरनाथमध्ये तालुका क्रीडा संकुलातील इंडोर गेम्सचे छत कोसळलं

सतत पडणाऱ्या पावसामुळे अंबरनाथ तालुक्याचे क्रीडा संकुलाचे छत पूर्णपणे कोसळले आहे. पावसामुळे हा अपघात झाल्याची घटना अंबरनाथच्या चिखलोली परिसरातील कार्मेल शाळेजवळील घडली आहे. क्रीडा संकुलाचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्यामुळेच हा अपघात घडल्याची माहिती क्रिडा प्रेमींनी दिली आहे.

अंबरनाथमध्ये एका नाल्याची संरक्षक भिंत कोसळली

अंबरनाथ पूर्वेतील बी केंबिंग भागात पालिकेची संरक्षक भिंत बांधण्यात आली आहे मात्र सकाळपासून पडणाऱ्या पावसामुळे ही भिंत कोसळली असून या भागातील रस्ता देखील खचला आहे. या भागात वाहनांची आणि नागरिकांची, शाळकरी विद्यार्थीची मोठी वर्दळ सुरु असते मात्र दुपारच्या सुमारास अचानक जमीन खचून नाल्याची भिंत कोसळली आणि त्या भागातील रस्त्यामध्ये दरी निर्माण होऊन रस्ता देखील खचला आहे. दुपारच्या सुमारास या भागात कोणी नसल्याने कोणतीही प्रकारची जीवित हानी झाली नसून नगरपालिकेच्या कामकाजावर नागरिकांनी नाराजी व्यक्त केले आहे.

सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.