AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video | “आले रे आले मुंबई पोलीस”…गाणे तुफान व्हायरल, गाण्यात काय आहे नेमके

mumbai police | मुंबई पोलिसांच्या कामगिरीवर एक गाणे आले आहे. हे गाणे पोलीस दलातील एका कर्मचाऱ्यानेच तयार केले आहे. सोशल मीडियावर या गाण्याने धूम केली आहे. गाण्याचे बोल आहेत, 'आले रे आले मुंबई पोलीस...'

Video | आले रे आले मुंबई पोलीस...गाणे तुफान व्हायरल, गाण्यात काय आहे नेमके
mumbai police
| Updated on: Mar 06, 2024 | 8:48 AM
Share

मुंबई | दि. 6 मार्च 2024 : मुंबई पोलिसांची ओळख जगभरात आहे. कधीकाळी मुंबई पोलिसांची तुलना स्काटलंड यार्ड पोलिसांसोबत केली जात होती. मुंबईतील गुन्हेगारी टोळ्या संपवण्यात मुंबई पोलिसांना यश मिळाले आहे. तसेच मुंबई हल्लाच्या वेळी मुंबई पोलिसांनी केलेल्या कामगिरीचे देशभर कौतूक झाले होते. मुंबई पोलिसांमुळे शहरात रात्रीसुद्धा महिला न घाबरता बाहेर पडतात. मुंबई पोलिसांच्या कामगिरीवर एक गाणे आले आहे. हे गाणे पोलीस दलातील एका कर्मचाऱ्यानेच तयार केले आहे. सोशल मीडियावर या गाण्याने धूम केली आहे. गाण्याचे बोल आहेत, “आले रे आले मुंबई पोलीस”…

कोणी केले गाणे

गाण्याचा व्हिडिओ सोशल मीडिया इंस्टाग्रामवर mumbaipolice and cpmumbaipolice या कोलॅबोरेटेड पेजवर शेअर केले आहे. व्हिडिओमध्ये कॅप्शनमध्ये लिहिले की, “आले रे आले मुंबई पोलीस! ” पोलीस कॉन्सटेबल मयूर राणे यांनी हा गीत तयार केले आहे. मुंबई पोलिसांची वीरत या गाण्यामधून दाखवली गेली आहे. हे गाणे ऐकल्यानंतर मुंबई पोलिसांसंदर्भात अभिमानाची भावना तयार होणार आहे. #AaleReAaleMumbaiPolice असे कॅप्शन या व्हिडिओसोबत दिले आहे.

व्हिडिओतून दिसतात सतर्क मुंबई पोलीस

व्हिडिओमध्ये मुंबई शहराचे संरक्षण करताना मुंबई पोलिसांना दाखवले गेले आहे. मुंबई पोलिसांसोबत दुसऱ्या सुरक्षा संस्था कशा सतर्क असतात, हे यामधून दिसत आहे. मुंबई पोलिसांमध्ये कार्यरत असलेल्या विविध रँकचे अधिकारी गाण्याच्या व्हिडिओमधून समोर येत आहेत. हा व्हिडिओ चांगलाचा व्हायरल झाला आहे. लाखो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे.

युजर्स काय म्हणतात

गाण्यावर युजर्सच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्या आहेत. एक युजर्स म्हणतो, मुंबईकर असल्याचा आम्हाला अभिमान आहे. मुंबई पोलिसांमुळे आम्ही निश्चिंत असतो, असे आणखी एक युजर्स म्हणतो. गाणे ऐकल्यानंतर अंगावर शहारे येतात. खूपच छान गाणं आहे आणि मुंबई पोलिसांचे काम पण, असे आणखी एक युजर्स म्हणतो.

निकालादरम्यान जामखेडमध्ये अचानक मतमोजणी थांबवली, कारण काय?
निकालादरम्यान जामखेडमध्ये अचानक मतमोजणी थांबवली, कारण काय?.
बीडमध्ये दादांना धक्का तर भाजपचं वर्चस्व, 2 नगरसेवकपदाचे उमेदवार विजयी
बीडमध्ये दादांना धक्का तर भाजपचं वर्चस्व, 2 नगरसेवकपदाचे उमेदवार विजयी.
संजय गायकवाड यांची पत्नी आघाडीवर, नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत आघाडीवर
संजय गायकवाड यांची पत्नी आघाडीवर, नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत आघाडीवर.
भाजपला मोठा धक्का, फुलंब्रीमध्ये उद्धव ठाकरे यांची सेना आघाडीवर
भाजपला मोठा धक्का, फुलंब्रीमध्ये उद्धव ठाकरे यांची सेना आघाडीवर.
साताऱ्यातील मतमोजणीत दोन्ही राजेंना धक्का तर 3 अपक्ष आघाडीवर
साताऱ्यातील मतमोजणीत दोन्ही राजेंना धक्का तर 3 अपक्ष आघाडीवर.
मतमोजणीत महायुती आघाडीवर, भाजप नंबर 1, 100 चा आकडा पार
मतमोजणीत महायुती आघाडीवर, भाजप नंबर 1, 100 चा आकडा पार.
बारामतीत अजित पवार vs शरद पवार संघर्ष, दोन्ही गटांची प्रतिष्ठा पणाला
बारामतीत अजित पवार vs शरद पवार संघर्ष, दोन्ही गटांची प्रतिष्ठा पणाला.
राजगुरुनगरमध्ये वळसे-पाटील अन् अमोल कोल्हेंची प्रतिष्ठा पणाला
राजगुरुनगरमध्ये वळसे-पाटील अन् अमोल कोल्हेंची प्रतिष्ठा पणाला.
कणकवलीत राणे बंधूंमध्ये चुरस, कोण मारणार बाजी? निकालाची प्रतीक्षा
कणकवलीत राणे बंधूंमध्ये चुरस, कोण मारणार बाजी? निकालाची प्रतीक्षा.
नादच खुळा...निकालाआधी कोल्हापुरात विजयाचे बॅनर, कागलमध्ये कुणाची चर्चा
नादच खुळा...निकालाआधी कोल्हापुरात विजयाचे बॅनर, कागलमध्ये कुणाची चर्चा.