एकाच वादळी पावसाने मुंबईची दुर्दशा, रेल्वेने मान टाकली, हवामान खाते म्हणते, अलर्ट दिला होतो…
Mumbai hoarding collapse : हवामान विभागाच्या अलर्टनंतर रेल्वे प्रशासन अलर्ट राहिले नाही. यामुळे एका वादळात मुंबईतील लोकसेवा ठप्प झाली. मध्य रेल्वे वाहतुकीने मान टाकली. वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडाला. दुसऱ्या दिवशी मंगळवारी मध्य रेल्वेवरील लोकल उशीराने धावत आहेत.
मुंबईत सोमवारी वादळी वाऱ्याने चांगलेच झोडपले. या वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे मध्य रेल्वेच्या लोकल सेवेने मान टाकली. संध्याकाळी आलेल्या या वादळी वाऱ्याच्या पावसामुळे घाटकोपरमधील छेडा नगरमध्ये एक मोठे लोखंडी होर्डिंग शेजारच्या पेट्रोल पंपाच्या छतावर कोसळले. त्यात १४ जणांचा मृत्यू झाला. आता नेहमीप्रमाणे चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या वादळी वाऱ्यासंदर्भात मुंबई हवामान विभागाने अलर्ट दिला होता. सोमवारी दुपारी ३.३० वाजता मुंबईत वादळी वाऱ्यासह पावसाचा अलर्ट मुंबईतील सर्व यंत्रणांना देण्यात आला होता. त्यानंतर सर्व यंत्रणा कोलमडली.
हवामान विभागाचा दावा
मुंबई प्रादेशिक हवामान शास्त्र विभागाचे प्रमुख सुनील कांबळे यांनी सांगितले की, गेल्या आठवड्यापासून मुंबईसह राज्यभरातील हवामानाचे अंदाज आवर्जून दिले आहेत. सोमवारी दुपारी साडेतीन वाजता मुंबईतील पावसाचा अलर्ट रेल्वे प्रशासन, मुंबई महानगरपालिका, वाहतूक विभाग, पोलीस विभाग, मुंबई विमानतळ, प्रशासनसह इतर सर्व महत्वाच्या विभागांना देण्यात आला होता.
#DustStorm over Lower Parel. #MumbaiRains pic.twitter.com/eVBz2JUsrP
— Mumbai Weather (@IndiaWeatherMan) May 13, 2024
लोकल सेवा ठप्पा, दुसऱ्या दिवशीही परिणाम
हवामान विभागाच्या अलर्टनंतर रेल्वे प्रशासन अलर्ट राहिले नाही. यामुळे एका वादळात मुंबईतील लोकसेवा ठप्प झाली. मध्य रेल्वे वाहतुकीने मान टाकली. वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडाला. दुसऱ्या दिवशी मंगळवारी मध्य रेल्वेवरील लोकल उशीराने धावत आहेत. त्यामुळे कार्यालयामध्ये जाणाऱ्या चाकरमानी लोकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे.
I lost my brother due to railways mismanagement which again got exposed in first day #MumbaiRains 🌧 with #DustStorm.
Railway unable to handle crowd.
If planned well more 15 coach locals could have been sent from fastline skipping few stn.
#mumbailocal #MumbaiWeather #Thane pic.twitter.com/d7ZqjoHKeO
— Deepak Dubey (@DBADeepakDubey) May 13, 2024
संजय पाटील भाजपच्या नेत्यांवर भडकले
भाजपचे नेते व महाविकास आघाडीचे उमेदवार संजय पाटील आमने सामने आले. संजय पाटील यांनी किरीट सोमय्या यांचा सुपरमॅन म्हणून उल्लेख केला. किरीट सोमय्या, घाटकोपरचे आमदार पराग शहा तसेच उमेदवार मिहीर कोटेचा यांच्या उपस्थितीत ही बाचाबाची झाली. रेस्क्यू टीम आली आहे, त्यांना काम करू द्या, तुम्ही काय करणार आहात? असा सवाल किरीट सोमय्या यांनी संजय पाटील यांनी केला. ”शो शायनिंग छोड दो काम करो”, असे त्यांनी सोमय्या यांना फटकारले.