राजकारणातल्या 2 मॅचफिनीशरकडून क्रिकेटमधल्या दिग्गजांचा सन्मान, पवार ठाकरेंसोबत गावस्कर वेंगसरकरांची आठवणींची ‘पार्टनरशीप’!

महाराष्ट्रातल्या राजकारणाच्या मॅचमधील दोन उत्तम मॅचफिनीशरची जोडी म्हणजे पवार-ठाकरे... आज त्याच मॅचफिनीशरकडून क्रिकेटमधल्या दिग्गजांचा सन्मान होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आयसीसीचे माजी अध्यक्ष-राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर आणि दिलीप वेंगसरकर यांचा आज गौरव होतोय.

राजकारणातल्या 2 मॅचफिनीशरकडून क्रिकेटमधल्या दिग्गजांचा सन्मान, पवार ठाकरेंसोबत गावस्कर वेंगसरकरांची आठवणींची 'पार्टनरशीप'!
शरद पवार, उद्धव ठाकरे, दिलीप वेंगसरकर आणि सुनील गावस्कर
Follow us
| Updated on: Oct 29, 2021 | 9:05 AM

मुंबई : महाराष्ट्रातल्या राजकारणाच्या मॅचमधील दोन उत्तम मॅचफिनीशरची जोडी म्हणजे पवार-ठाकरे… आज त्याच मॅचफिनीशरकडून क्रिकेटमधल्या दिग्गजांचा सन्मान होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आयसीसीचे माजी अध्यक्ष-राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर आणि दिलीप वेंगसरकर यांचा आज गौरव होतोय. त्यामुळे पवार ठाकरेंसोबत गावस्कर वेंगसरकरांची आठवणींची ‘पार्टनरशीप’ पुन्हा एकदा अनुभवायला मिळणार आहे.

पवार ठाकरेंच्या हस्ते गावस्कर वेंगसरकरांचा सन्मान होणार

सुनील गावस्कर यांच्या कसोटी पदार्पणाला 50 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आजचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे. तसंच माजी कसोटीपटू दिलीप वेंगसरकर यांच्या नावाने वानखेडे स्टेडियममध्ये तयार करम्यात आलेल्या स्टँडचे आज उदघाटन देखील होणार आहे. मुंबईत हा सोहळा होतो आहे. या सोहळ्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर आणि दिलीप वेंगसरकर, याचबरोबर भारतीय संघाचे माजी कर्णधार गुंडाप्पा विश्वनाथ आणि भारतरत्न सचिन तेंडुलकर उपस्थित राहणार आहेत.

मामांच्या स्मृतीप्रित्यार्थ भाचा व्याख्यान देणार

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या वतीने माजी अध्यक्ष माधव मंत्री यांच्या स्मरणार्थ क्रिकेट व्याख्यानाची परंपरा सुरू करण्यात येणार आहे. पहिले व्याख्यान देण्याचा मान सुनील गावस्कर यांना देण्यात आलाय. खरं तर सुनील गावस्करांसाठी हा खूप स्पेशल दिवस असणार आहे. कारण त्यांचे मामा माधव मंत्री यांच्या स्मृतीप्रित्यार्थ हा व्याखानाचा कार्यक्रम होतो आहे आणि पहिल्याच व्याख्यानाचा मान मिळालाय तो सुनील गावस्कर यांना…!

सुनील गावस्कर यांची क्रिकेट कारकीर्द

1971 साली झाले होते सुनील गावस्कर यांचे कसोटी पदार्पण केलं होतं. वेस्टइंडिज दौऱ्यात त्यांनी क्रिकेट विश्वात पाऊल ठेवलं. 16 वर्षाच्या आपल्या कारकिर्दीत सुनील गावस्कर यांनी 125 कसोटी सामन्यात 34 शतके आणि 45 अर्धशतकांसह 10 हजार 122 धावांचा डोंगर रचला तर 108 एकदिवसीय सामन्यांत एक शतक आणि 27 अर्धशतकांसह 3 हजार 92 धावा केल्या.

दिलीप वेंगसरकर यांची क्रिकेट कारकीर्द

दिलीप वेंगसरकर यांनी 116 कसोटी सामन्यांत 17 शतके आणि 35 अर्धशतकांसह 6 हजार 868 धावा फटकवल्या. तसेच 129 एकदिवसीय सामन्यांत त्यांच्या नावावर एक शतक आणि 23 अर्धशतकासह 3 हजार 508 धावा आहेत.

(Sunil Gavaskar and Dilip Vengsarkar honored by Sharad Pawar and Uddhav Thackeray Mumbai)

हे ही वाचा :

T20 World Cup 2021, Points Table: डेव्हिड वॉर्नरचा फॉर्म परतला, श्रीलंकेवर 7 विकेट्सनी विजय

दिल्ली कॅपिटल्सचा दिग्गज खेळाडू संघ सोडण्याच्या तयारीत, अहमदाबाद किंवा लखनौच्या कर्णधार पदावर नजर

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.