Special Report : शिंदे-फडणवीस सरकारची डोकेदुखी वाढण्याची शक्यता, रविकांत तुपकर मुंबईच्या दिशेला, अरबी समुद्रात जलसमाधीचा इशारा

शिंदे-फडणवीस सरकारला टोकाचा इशारा देऊन, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर शेतकऱ्यांना घेवून मुंबईकडे निघाले आहेत.

Special Report : शिंदे-फडणवीस सरकारची डोकेदुखी वाढण्याची शक्यता, रविकांत तुपकर मुंबईच्या दिशेला, अरबी समुद्रात जलसमाधीचा इशारा
Follow us
| Updated on: Nov 23, 2022 | 10:16 PM

बुलढाणा : शिंदे-फडणवीस सरकारला टोकाचा इशारा देऊन, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर शेतकऱ्यांना घेवून मुंबईकडे निघाले आहेत. शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करा, नाहीतर मुंबईतल्या अरबी समुद्रात शेतकऱ्यांसह जलसमाधी घेण्याचा इशारा तुपकरांनी दिलाय. रवीकांत तुपकरांच्या 4 प्रमुख मागण्या आहेत. सोयाबीनला प्रति क्विंटल साडे 8 हजारांचा दर द्या. कापसाला प्रति क्विंटल साडे 12 हजारांचा दर द्यावा. अतिवृष्टीमुळं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई मिळावी. आणि पिक विमा कंपन्यांवर कारवाई करुन पिकविम्याचे पैसा द्यावेत, अशा चार मागण्या तुपकरांच्या आहेत.

शेतकऱ्यांसोबत बुलडाण्याहून निघालेला तुपकरांचा ताफा भोकरदन, सिल्लोड, अहमदनगर, चाकण, पनवेल मार्गे मुंबईत नरिमन पॉईंटच्या समुद्र किनारी येणार आहे. शेतकऱ्यांकडून तुपकरांचं ठिकठिकाणी स्वागतही केलं जातंय. तर चर्चा घडवून सरकारनं शेतकऱ्यांच्या मान्य कराव्यात, असं विरोधी पक्षनेते अजित पवारांनी म्हटलंय.

हे सुद्धा वाचा

तुपकरांच्या जलसमाधी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी नोटीसही बजावलीय. मात्र अशा नोटीशींना घाबरत नसून हिंमत असेल तर रोखून दाखवा, असं आव्हान तुपकरांनी दिलंय.

शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतायत. पण तात्काळ शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्याच्या मागणीसाठी तुपकर आपल्या भूमिकेवर ठाम आहेत.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.