Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुलायमसिंह यादव यांना पुरस्कार हे आक्रितच, मोदी सरकार वीर सावरकर, बाळासाहेब ठाकरे यांना विसरले; ‘सामना’तून हल्ला

बाबरी मशिद पाडली त्यानंतर मुलासमय सिंह यादव यांनी गोळीबार केला नसता तर संतापाचा भडका उडून हिंदू रस्त्यावर उतरला नसता. त्याचा राजकीय फायदा उत्तरेत भाजपला झाला नसता.

मुलायमसिंह यादव यांना पुरस्कार हे आक्रितच, मोदी सरकार वीर सावरकर, बाळासाहेब ठाकरे यांना विसरले; 'सामना'तून हल्ला
veer savarkarImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jan 28, 2023 | 7:34 AM

मुंबई: केंद्र सरकारने समाजवादी पार्टीचे दिवंगत नेते मुलायम सिंह यादव यांना पद्मविभूषण पुरस्कार दिला आहे. त्यावरून दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखातून केंद्र सरकारवर जोरदार टीका करण्यात आली आहे. ज्या मुलायमसिंह यादव यांनी कारसेवकांना गोळया घालून ठार केलं, ज्या मुलायमसिंह यांना भाजपने ‘मौलाना मुलायम’ म्हणून हिणवलं त्याच मुलायमसिंह यादव यांना पद्मविभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. मात्र, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे या दोन हिंदुहृदय सम्राटांना पुरस्कार देण्यात आला नाही. त्यांना मोदी सरकार विसरले. सावरकरांना पुरस्कार देण्यापासून मोदी सरकारला कोणी रोखले होते? असा संतप्त सवाल दैनिक सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आला आहे.

प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी अनेकांना पद्म पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे. यातील अनेक नावे संघ परिवाराशी संबंधित आहेत. अर्थात त्याबद्दल आक्षेप घेण्याचे कारण नाही. सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या रमेश पतंगे, भिकुजी इदाते यांचा सन्मान योग्यच आहे, असं सामना अग्रलेखातून म्हटलं आहे.

हे सुद्धा वाचा

हे आक्रितच म्हणावे लागेल

मुलायमसिंह यादव यांना पद्मविभूषण पुरस्कार देण्यात आला. हे आक्रितच म्हणावे लागेल. जिवंतपणी कारसेवकांचे हत्यारे म्हणून त्यांची अवहेलना भाजपने केली. त्यांना मौलाना मुलायम म्हणून हिणवलं. त्याच मुलायमसिंह यादव यांना भाजपने सर्वोच्च नागरी पुरस्कार दिला. प्रखर हिंदुत्ववादी मोदी सरकारने दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार मुलायमसिंह यादव यांना दिला, अशी टीका अग्रलेखातून करणअयात आली आहे.

ते ऋण फेडण्यासाठी

बाबरी मशिद पाडली त्यानंतर मुलासमय सिंह यादव यांनी गोळीबार केला नसता तर संतापाचा भडका उडून हिंदू रस्त्यावर उतरला नसता. त्याचा राजकीय फायदा उत्तरेत भाजपला झाला नसता. ते ऋण फेडण्यासाठीच मुलायम सिंग यादव यांना सन्मानित करण्यात आले काय? असा सवाल अग्रलेखातून करण्यात आला आहे.

कोणी रोखले?

बाळासाहेब ठाकरे आणि सावरकर यांना भारतरत्नाने सन्मानित केले जाईल असे वाटत होते. मात्र तसे घडले नाही. सावरकरांच्या अपमानाचे राजकारण करणाऱ्या भाजपाला वीर सावरकरांचा सन्मान करण्यापासून कोणी रोखले आहे? असा सवालही करण्यात आला आहे.

तर ढोंग लपले असते

बाळासाहेबांच्या नावाने दुकान चालविणारे सरकार राज्यात आहे. त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचं तैलचित्र लावण्याचा मोठा गाजावाजा केला. पण याच सरकारने शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि वीर सावरकर यांच्या नावाची भारतरत्नासाठी शिफारस केली असती तर त्यांचे हे ढोंग लपले गेले असते, असा टोलाही लगावण्यात आला आहे.

वकील ओझा यांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, काय म्हणाले आदित्य ठाकरे?
वकील ओझा यांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, काय म्हणाले आदित्य ठाकरे?.
देवेंद्रजी, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी; अंधारेंचं फडणवीसांना पत्र
देवेंद्रजी, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी; अंधारेंचं फडणवीसांना पत्र.
मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र
मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र.
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले.
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले.
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी.
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका.
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व.
माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर
माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर.
माझ्यावर कोणाचाही दबाव नाही; दिशाच्या वडिलांचं मोठं विधान
माझ्यावर कोणाचाही दबाव नाही; दिशाच्या वडिलांचं मोठं विधान.