AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ठाकरे गटाचा ‘शिलेदार’ आपल्या पक्षप्रमुखावरच रुसला? थेट मंत्रालयात शिंदेंच्या भेटीला

उद्धव ठाकरे यांच्या कठीण काळात त्यांना साथ देणारा एक बडा नेता आपल्याच पक्षप्रमुखावर नाराज झालाय. या नेत्याने अनेकदा माध्यमांसमोर आपली नाराजी व्यक्त केली आहे. त्यानंतर हा नेता आज अचानक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला गेलाय. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलंय.

ठाकरे गटाचा 'शिलेदार' आपल्या पक्षप्रमुखावरच रुसला? थेट मंत्रालयात शिंदेंच्या भेटीला
uddhav thackeray and eknath shinde
| Updated on: Jan 01, 2024 | 9:29 PM
Share

अक्षय मंकणी, Tv9 मराठी, मुंबई | 1 जानेवारी 2024 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना धक्क्यावर धक्के दिले जात आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेना पक्षात मोठी फूट पडली. ठाकरेंच्या हातून शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्हं देखील गेलं. तसेच 40 आमदार आणि अनेक खासदारांनी शिंदेंसोबत जाणं पसंत केलं. काही मोजकेच लोकप्रतिनिधी ठाकरेंच्या गटात थांबले. या नेत्यांमध्ये एका माजी मंत्र्याचा देखील समावेश होता. हा बडा नेता उद्धव ठाकरे यांच्या बाजूने होता. पण गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटात शिर्डीत सुरु असलेल्या गृहकलामुळे त्यांनी टोकाचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. कारण हा नेता आज अचानक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी मंत्रालयात पोहोचला. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. हा नेता म्हणजे माजी आमदार बबनराव घोलप.

महाराष्ट्राच्या राजकारणातील ही महत्त्वाची बातमी आहे. ठाकरे गटाचे माजी आमदार बबनराव घोलप यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. मंत्रालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोलप यांच्यात अर्धा तास चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. बबनराव घोलप हे माजी आमदार आणि माजी मंत्री आहेत. ते ठाकरे गटाचे बडे नेते आहेत. पण त्यांनी आज अचानक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मंत्रालयात जावून भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे.

बबनराव घोलप ठाकरे गटात नाराज

बबनराव घोलप हे ठाकरे गटात गेल्या काही दिवसांपासून नाराज आहेत. त्यांनी आपली नाराजी अनेकवेळा माध्यमांसमोरही व्यक्त करुन दाखवली आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघावरुन ठाकरे गटात वाद सुरु होता. त्याबाबत बबनराव घोलप यांनी सातत्याने नाराजी व्यक्त केली होती. याशिवाय त्यांनी या मुद्द्यावरुन पक्षश्रेष्ठींची भेटसुद्धा घेतली होती. त्यानंतर त्यांनी आज अचानक एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. त्यामुळे येत्या काळात राजकारणात काही स्थित्यंतर होणार का? घोलप शिंदे गटात प्रवेश करणार का? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

आमदार अपात्रतेचा निकाल अवघ्या काही दिवसांवर

दरम्यान, शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर येत्या 10 जानेवारीला आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर निकाल जाहीर करणार आहेत. या निकालावर महाराष्ट्राच्या राजकारणातील आगामी काळातील घडामोडी अवलंबून असणार आहेत. हा निकाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाजूने लागला तर फार काही फरक पडणार नाही. पण निकाल उद्धव ठाकरे यांच्या बाजूने निकाल लागला तर महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप घडून येण्याची शक्यता आहेत. त्यामुळे आगामी काळ महाराष्ट्राच्या राजकारणासाठी फार महत्त्वाचा आहे.

BMC साठी महायुतीची पहिली बैठक, पहिल्या फेरीत 142 जागांवर तोडगा
BMC साठी महायुतीची पहिली बैठक, पहिल्या फेरीत 142 जागांवर तोडगा.
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.