AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

केमिकलचे 414 ड्रम शेतात पुरले, मुंबईजवळील घटना

अंबरनाथ(ठाणे) : अंबरनाथ तालुक्यातील करवले गावातील शेतात केमिकलचे 414 ड्रम पुरण्यात आले होते. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी घटनास्थळी धाव घेत, सर्व केमिकलचे ड्रम आणि जेसीबी ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी अद्याप पोलीस आणि एमपीसीबीकडून कुणावरही कारवाई केलेली नाही. गेल्या काही दिवसांपासून अंबरनाथ तालुक्यातील करवले गावात मुंबई महापालिकेचे डपिंग होणार असल्याच्या […]

केमिकलचे 414 ड्रम शेतात पुरले, मुंबईजवळील घटना
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:57 PM
Share

अंबरनाथ(ठाणे) : अंबरनाथ तालुक्यातील करवले गावातील शेतात केमिकलचे 414 ड्रम पुरण्यात आले होते. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी घटनास्थळी धाव घेत, सर्व केमिकलचे ड्रम आणि जेसीबी ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी अद्याप पोलीस आणि एमपीसीबीकडून कुणावरही कारवाई केलेली नाही.

गेल्या काही दिवसांपासून अंबरनाथ तालुक्यातील करवले गावात मुंबई महापालिकेचे डपिंग होणार असल्याच्या मुद्यावरून चर्चेत आहे. त्याच करवले गावातील काही शेतामध्ये 22 नोव्हेंबर रोजी जेसीबीच्या सहाय्याने मोठा खड्डा खोदत खड्ड्यात केमिकलचे ड्रम पुरण्यात आले होते. ही माहिती हिललाईन पोलिसांना मिळताच पोलिसांनी धडक कारवाई केली.

यावेळी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी ही घटनास्थळी उपस्थित होते. घटनास्थळी हे केमिकलचे ड्रम दोन शेतात पुरण्यात आले होते. पहिल्या शेतातून 100 तर दुसऱ्या शेतात तब्बल 314 केमिकलचे ड्रम पुरण्यात आले होते.

एवढ्या मोठ्या प्रमाणात केमिकलचे ड्रम शेतात पुरण्यात येत असल्याने या भागात केमिकल कंपन्या आणि केमिकलची विल्हेवाट लावणारी मोठी टोळी सक्रीय असल्याची शक्यता वरिष्ठ पोलीस निरीक्षक घनश्याम पलंगे यांनी वर्तवली आहे.

भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश.
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा.
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी.
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार.
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं..
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं...
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?.
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!.
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ.
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम.