श्रीमंत छत्रपती शाहू आता मराठा मोर्चाचं नेतृत्त्व करणार

विजय, केसरकर, टीव्ही 9 मराठी, कोल्हापूर : येत्या 26 नोव्हेंबरला मुंबईत विधानभवनावर मराठा क्रांती मोर्चातर्फे गाडी मोर्चा काढण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, या मोर्चाचं नेतृत्त्व श्रीमंत शाहू छत्रपती करणार आहेत. त्यामुळे या मोर्चाची उत्सुकता वाढली असून, मोर्चांचा प्रभाव सुद्धा आधीपेक्षा वाढण्याची शक्यता आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी विधानभवनावर गोडी मोर्चा काढण्याचा निर्णय कोल्हापुरात घेण्यात आला. कोण […]

श्रीमंत छत्रपती शाहू आता मराठा मोर्चाचं नेतृत्त्व करणार
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 5:02 PM

विजय, केसरकर, टीव्ही 9 मराठी, कोल्हापूर : येत्या 26 नोव्हेंबरला मुंबईत विधानभवनावर मराठा क्रांती मोर्चातर्फे गाडी मोर्चा काढण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, या मोर्चाचं नेतृत्त्व श्रीमंत शाहू छत्रपती करणार आहेत. त्यामुळे या मोर्चाची उत्सुकता वाढली असून, मोर्चांचा प्रभाव सुद्धा आधीपेक्षा वाढण्याची शक्यता आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी विधानभवनावर गोडी मोर्चा काढण्याचा निर्णय कोल्हापुरात घेण्यात आला.

कोण कोण करणार आंदोलनाचं नेतृत्त्व?

  • श्रीमंत शाहू छत्रपती
  • डॉ. जयसिंगराव पवार
  • नाबार्डचे माजी अध्यक्ष यशवंतराव थोरात

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी 15 नोव्हेंबरपर्यंत वेळ मागितला आहे. मागासवर्ग आयोगाची मुख्यमंत्री वाट पाहत होते. तो अहवालही सकारात्मक आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मराठा समाजाला वेगळ्या आरक्षणाची शिफारस अहवालात असल्याचं बोललं जातं आहे. इतरांच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण मिळणार असल्याचं सूत्रांकडून समजतं आहे. तर मराठा आणि कुणबी यांना वेगळं गणलं जाण्याची शक्यता आहे.

EXCLUSIVE : मराठा समाजाचे मागासलेपण सिद्ध : सूत्र

मराठा आरक्षणावरुन आता सवालही अनेक निर्माण झालेत :

  • फडणवीसांकडे आरक्षणाचा नेमका फॉर्म्युला कोणता आहे ?
  • OBC मध्ये आरक्षण न देता वेगळा गट कसा निर्माण करणार ?
  • स्वतंत्र आरक्षण दिल्यानंतर 52% पार करणारं आरक्षण कसं टिकणार ?
  • मागावर्गीय आयोगाच्या अहवालालाच कोर्टात आव्हान दिल्यास काय करणार ?

मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी दिवसागणिक आक्रमक होताना दिसतो आहे. आझाद मैदानातही मराठा समाजातील बांधवांनी उपोषण सुरु केले आहे. विविध ठिकाणी रोज निदर्शनं होत आहे. त्यामुळे आरक्षणासाठी राज्य सरकारवरही दबाव वाढत आहे. त्यात आता श्रीमंत शाहू छत्रपती यांच्याच नेतृत्त्वात गाडी मोर्चा मुंबईत विधानभवनावर धडकणार असल्याने सरकारच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.