Theaters Reopen | 50 नाही तर 100 टक्के क्षमतेने थिएटर सुरु करा, अमोल कोल्हेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र

चित्रपट आणि नाटक वगळता बंदिस्त सभागृहे/ मोकळ्या जागेत होणारे इतर सांस्कृतिक कार्यक्रम पुन्हा सुरु करण्याची परवानगी देण्याबाबत विविध घटकांकडून सातत्याने मागणी होत आहे. त्यापार्शवभूमीवर राज्यातील बंदिस्त सभागृहे / मोकळ्या जागेत होणारे इतर सांस्कृतिक कार्यक्रम या शासन निर्णयासोबत जोडण्यात आलेल्या परिशिष्ट अ मधील मार्गदर्शक तत्वांच्या अधिन राहून दिनांक 22 ऑक्टोबर 2021 पासून नियंत्रित स्वरुपात सुरु करण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे.

Theaters Reopen | 50 नाही तर 100 टक्के क्षमतेने थिएटर सुरु करा, अमोल कोल्हेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
Amol-Kolhe
Follow us
| Updated on: Oct 13, 2021 | 10:41 AM

मुंबई : चित्रपट आणि नाटक वगळता बंदिस्त सभागृहे/ मोकळ्या जागेत होणारे इतर सांस्कृतिक कार्यक्रम पुन्हा सुरु करण्याची परवानगी देण्याबाबत विविध घटकांकडून सातत्याने मागणी होत आहे. त्यापार्शवभूमीवर राज्यातील बंदिस्त सभागृहे / मोकळ्या जागेत होणारे इतर सांस्कृतिक कार्यक्रम या शासन निर्णयासोबत जोडण्यात आलेल्या परिशिष्ट अ मधील मार्गदर्शक तत्वांच्या अधिन राहून दिनांक 22 ऑक्टोबर 2021 पासून नियंत्रित स्वरुपात सुरु करण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे. मात्र, 22 ऑक्टोबरपासून थिएटर सुरु होणाऱ्या नियमावलीत बदल करा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्राद्वारे केली आहे.

थिएटर 50 टक्के क्षमतेने सुरु करण्याची परवानगी सरकारने दिली आहे. तर ते न करता थिएटर 100 टक्के क्षमतेनं सुरु करण्याची मागणी अमोल कोल्हे यांनी केली आहे. 50 टक्के क्षमतेनं थिएटर सुरु करणे आर्थिकदृष्ट्या कलाकारांना परवडणारं नाही, कलाकारांची आर्थिक स्थिती लक्षात घेता 100 टक्के क्षमतेनं थिएटर सुरु करा, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

नाट्यगृहे पुन्हा उघडणार

कोव्हिड 19 विषाणूंच्या प्रादुर्भावास प्रतिबंध करण्यासाठी शासनाने काढलेल्या आदेशान्वये लागू केलेले विविध निर्बंध आता शिथिल केले जात आहेत. कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर बंद पडलेली सभागृहे आणि मोकळ्या जागेत होणारे इतर कार्यक्रम सुरु करण्यास परवानगी देण्यासंदर्भात या क्षेत्रातील विविध संघटना आणि संस्थांकडून शासनाला विनंत्या प्राप्त झालेल्या आहेत. त्यानुसार नियम पाळून नाट्यगृह पुन्हा सुरु करण्याची परवानगी देण्यात येत आहे.

काय आहेत नियम

बंदिस्त सभागृह

1. सभागृहात प्रवेश देताना थर्मल टेस्टद्वारे प्रेक्षकांच्या शारीरिक तापमानाची चाचणी घेऊनच प्रवेश देणे ही सभागृह व्यवस्थापनाची/आयोजकांची जबाबदारी असेल.

2. बंदिस्त सभागृहाच्या एकूण बैठक क्षमतेच्या 50 टक्के इतक्या मर्यादेपेक्षा प्रेक्षक संख्या जास्त असू नये.

3. बंदिस्त सभागृहातील व्यासपीठ व प्रेक्षकांमध्ये शासनाने वेळोवेळी दिलेल्या निर्देशानुसार सामाजिक अंतर राखणे (किमान 6 फूट) आवश्यक राहिल.

4. बैठक व्यवस्थेत सामाजिक अंतर राखणे आवश्यक राहील.

5. बंदिस्त सभागृहातील सादरकर्त्या कलाकारांनी वेळोवेळी वैद्यकीय तपासणी करणे आवश्यक राहिल.

6. आरोग्य सेतू अॅप इन्स्टॉल करुन ते दिवसभर सुरु ठेवावयाचे आहे. तसेच बालकलाकारां व्यतिरिक्त सर्व कलाकार/ आयोजक व साह्यभूत कर्मचारी वर्गाचे संपूर्ण कोव्हिड प्रतिबंधक लसीकरण (दोन डोस व दुसऱ्या डोसनंतर 14 दिवसांचा कालावधी पूर्ण झालेला असणे आवश्यक असेल.) झालेले असणे आवश्यक असेल. बाल कलाकारांची आरोग्य सेतू अॅपवरील आरोग्य स्थिती सुरक्षित असणे आवश्यक राहील तसेच त्यांची आरोग्यदृष्ट्या वारंवार तपासणी होणे आवश्यक राहील. तसेच प्रेक्षकांचे कोव्हिड प्रतिबंधक लसीकरण झाले असणे अथवा आरोग्य सेतुवरील त्यांची आरोग्य स्थिती “सुरक्षित” अशी दर्शवलेली असणे आवश्यक राहील.

7. सभागृहातील सर्व परिसर / खोल्या / प्रसाधनगृहे वेळोवेळी स्वच्छ करणेबाबत सभागृह व्यवस्थापनाने वेळापत्रक आखणे आणि प्रसाधन गृहांची वेळेवर स्वच्छता केल्याची खातरजमा करावी. तसेच, वेळोवेळी निर्जंतुकीकरण करण्यात यावे. प्रशासन याशित सर्वांनी मास्क लावणे आवश्यक राहील

संबंधित बातम्या :

शाळा, मंदिरांनंतर आता राज्यातील सिनेमागृह, नाट्यगृह सुद्धा सुरु होणार, राज्य सरकारचा निर्णय

पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.