Tipu Sultan: मग सर्वात आधी राष्ट्रपती कोविंद यांचा राजीनामा घ्यावा लागेल; टिपू सुलतान वादावरून राऊतांनी भाजपला घेरलं
Tipu Sultan: मालाडमधील उद्यानाला टिपू सुलतान (tipu sultan) यांचे नाव देण्यात आले आहे. त्यावरून वाद सुरू आहेत. भाजपने या नामकरणाला विरोध केला आहे.
मुंबई: मालाडमधील उद्यानाला टिपू सुलतान (tipu sultan) यांचे नाव देण्यात आले आहे. त्यावरून वाद सुरू आहेत. भाजपने या नामकरणाला विरोध केला आहे. भाजप नेते राज पुरोहित (raj purohit) यांनी तर या प्रकरणी पालकमंत्री अस्लम शेख यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे. भाजपच्या या मागणीचा शिवसेना नेते संजय राऊत यांनी जोरदार समाचार घेतला आहे. टिपू सुलतानचं नाव दिलं म्हणून अस्लम शेख यांचा राजीनामा घेण्याची मागणी भाजप करत असेल तर भाजपने सर्वात आधी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा राजीनामा घेतला पाहिजे. राष्ट्रपती कोविंद यांनी कर्नाटकाच्या विधानसभेत जाऊन टिपू सुलतानचा गौरव केला होता. त्यामुळे सर्वात आधी भाजपने त्यांचा राजीनामा घ्यावा. मुंबईत काय करायचं हे मुंबई महापालिका आणि राज्य सरकार पाहून घेईल. तुम्ही काळजी करू नका, असा सणसणीत हल्लाबोल शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी केला आहे.
शिवसेना नेते संजय राऊत यांनी मीडियाशी बोलताना ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. टिपू सुलतान नामकरण प्रकरणी भाजप नेते राज पुरोहित यांनी अस्लम शेख यांचा राजीनामा मागितला आहे. त्याबाबत राऊतांना विचारलं असता राऊतांनी ही प्रतिक्रिया दिली. भाजप नेत्यांची अशी भाषा असेल तर पहिला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा राजीनामा घ्यावा लागेल. राजीनाम्याची गोष्ट आहे ना मग तुम्ही राष्ट्रपती कोविंद यांचा राजीनामा मागणार आहात का? कर्नाटकाच्या विधानसभेत जाऊन या टिपू सुलतानचं सर्वात जास्त गुणगान राष्ट्रपती कोविंद यांनी गायलं होतं. महान योद्धा, ऐतिहासिक योद्धा, स्वातंत्र्य सैनिक वगैरे वगैरे या उपाध्या राष्ट्रपतींनीच लावल्या आहेत. लावल्या ना? मग त्यांचा राजीनामा आधी मागावा आणि इथे काय करायचं मुंबईत त्यासाठी महापालिका आणि सरकार समर्थ आहे. तुम्ही काळजी करू नका. उगाच इतिहासाची ठेकेदारी घेऊन इथे गडबड करू नका, असा दमच राऊत यांनी भरला.
तुम्ही इतिहासाचे ठेकेदार नाही
टिपू सुलतानचं काय करायचं ते आम्ही पाहू. आम्हाला इतिहास कळतो. तुम्ही इतिहासाचे ठेकेदार नाहीत. तुम्ही कशा पद्धतीने इतिहास बदलता, लिहिता, दिल्लीत स्वत:चा इतिहास कसा लिहायला घेतला हे आम्हाला माहीत आहे. टिपू सुलतान, हैदर अली, श्रीरंगपट्टणम, मैसूर राज्य सर्व आम्हाला माहीत आहे. टिपू सुलतानने काय अत्याचार, अन्याय केला, ब्रिटिशांसोबत कसा लढा दिला हे सर्व आम्हाला माहीत आहे. आम्हाला सांगायची गरज नाही. आंदोलन करू, महाराष्ट्र पेटवू ही भाषा तुमच्या तोंडी असेल तर या पेटवापेटवीतील महाराष्ट्रातील एक्सपर्ट कोण आहेत हे सर्वांना माहीत आहे. पण आम्ही हे करत नाही, असं ते म्हणाले.
100 Super Fast News | सुपरफास्ट 100 न्यूज | 27 January 2022https://t.co/6bM40Wyct1#NewsUpdates | #BreakingNews
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 27, 2022
संबंधित बातम्या:
Anil Awachat : ज्येष्ठ साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल अवचट यांचं निधन