Mumbai Air Pollution | मुंबईतील हवेतील प्रदूषण या पाच कारणांमुळे वाढले
Mumbai Air Pollution | मुंबईतील हवा प्रदूषीत झाली आहे. मुंबईतील हवेतील या प्रदूषणाची दखल उच्च न्यायालयाने सोमवारी घेतली. चार दिवसांत प्रदूषण कमी झाले नाही तर मुंबईत सुरु असलेली विकास कामे थांबवले जातील, असे उच्च न्यायालयाने बजावले. अचानक कोणत्या कारणांमुळे मुंबई शहरातील प्रदूषण वाढले.

मुंबई | 8 नोव्हेंबर 2023 : दिवाळी काही दिवसांवर आली असताना मुंबईत वेगळेच संकट निर्माण झाले आहे. मुंबईत हवेचे प्रदूषण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. प्रदूषणाचा एक्यआय 300 पेक्षा जास्त झाला आहे. मुंबईतील प्रदूषणाची ही सर्वोच्च पातळी आहे. मुंबईतील वाढलेल्या प्रदूषणामुळे दिवाळीत फटाके फोडण्यावर निर्बंध आणले आहे. तसेच आता मॉर्निंग वॉकला जाण्यास बंदी केली गेली आहे. मास्कचा वापर करण्याचा सल्ला आरोग्य विभागाने दिला आहे. मुंबईतील प्रदूषण वाढल्यामुळे मुंबईची तुलना दिल्लीशी होऊ लागली आहे. मुंबईतील वाढत्या प्रदूषणामुळे श्वसन विकाराचे रुग्ण वाढले असल्याचे डॉक्टरांनी म्हटले आहे. मुंबईत दृश्यमानता सकाळी ११ पर्यंत चांगली होत नाही. यामुळे सकाळी जास्त अंतरावरील वस्तू, वाहन दिसत नाही.
या पाच कारणांमुळे वाढले प्रदूषण
- 1 मोठ्या प्रमाणे पायाभूत सुविधांची काम
मुंबईत मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधांची निर्मितीची कामे सुरु आहे. एकाच वेळी अनेक काम सुरु आहे. त्यात मेट्रोच्या कामाचाही समावेश आहे. परंतु मेट्रोमुळे रस्त्यावरील वाहने कमी झाल्याचे मागील पाच वर्षांत दिसत आहे.
- 2 वाहनांचे प्रदूषण
मुंबईत 12 लाखांपेक्षा जास्त खासगी कार आहेत. त्यामुळे रस्त्यांवर वाहतूक नेहमी ठप्प झालेली दिसून येते. इच्छित स्थळी जाण्यासाठी दुप्पट वेळ लागत आहे. रस्त्यावर चालणाऱ्या या वाहनांमुळे प्रदूषणाची पातळी वाढत आहे.
- 3 क्लायमेट चेंज
समुद्रावरील तापमानात घट झाली आहे. त्यामुळे समुद्र किनाऱ्यावरुन वाहणाऱ्या वाऱ्यांवर त्याचा परिणाम झाला आहे. या सर्वांचा परिणाम वायू प्रदूषणावर झाला आहे. ऑक्टोंबर हिट आणि मॉन्सून परतण्यास लागलेला उशीर हे एक कारण आहे.
- 4 ओजोन प्रदूषण
ग्लोबल वार्निंगमुळे ओझेनचा थर वाढला आहे. मागील तीन वर्षांपासून फोटोकेमिकल रिएक्शन मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे. नाइट्रोजन ऑक्साइड असताना फोटोकेमिकल रियक्सन होते आणि ऑक्सिजनची निर्मिती होते. या कणांमुळे ऑक्सिजन ओझेनचा स्थर वाढवत आहे.
- 5 हे ही एक कारण
आयआयटी मुंबईतील असोसिएट प्रोफेसर हरीश फुलेरिया यांनी मुंबईतील काही भागांत वायू प्रदूषण वाढल्याकडे लक्ष वेधले. उंच इमारतींमुळे हवेचा पॅटन बदल आहे का? याची विचार करायला हवा. या इमारती पूर्वीप्रमाणे समुद्रातील वाऱ्यांना काम करु देत नाही.