Sanjay Raut : ‘मला अटक करायला निघाले आहेत, मी अटक करुन घेतोय’, ईडी कार्यालयाबाहेर संजय राऊतांचे काय संकेत?
राऊत यांच्या घरी ९ तास झालेल्या चौकशीनंतर त्यांना ईडीने ताब्यात घेतले आहे. त्यानंतर त्यांना ईडीच्या कार्यालयात आणण्यात आले. तिथे त्यांची चौकशी करण्यात येणार आहे. त्यानंतर संध्याकाळी त्यांना अटक होण्याची शक्यता आहे. राऊत यांनी ईडी कार्यालयात पोहचल्यानंतर, अटकेचे संकेत दिले आहेत.
मुंबई – खोट्या कारवाईत आपल्याला अटक (arrest)करायला निघाले आहेत आणि त्यासाठी अटक करुन घ्यायला तयार आहे, अशी प्रतिक्रिया ईडीच्या (ED) कार्यालयाच्या आवारात शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut)यांनी दिली आहे. शिवसेना कमजोर नाही, महाराष्ट्र कमजोर नाही, शिवसैनिक काय असतो, आपलं उदाहरण आहे. असे सांगत त्यांनी भाजपा आणि केंद्र सरकारवर टीका केली आहे. शिवसेना संपवण्याचा आणि संजय राऊत यांना दाबण्याचा प्रयत्न होतो आहे, हे सगळ्यांना माहित आहे असे त्यांनी सांगितले. तसेच संजय राऊत शिवसेना सोडणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. राऊत यांच्या घरी ९ तास झालेल्या चौकशीनंतर त्यांना ईडीने ताब्यात घेतले आहे. त्यानंतर त्यांना ईडीच्या कार्यालयात आणण्यात आले. तिथे त्यांची चौकशी करण्यात येणार आहे. त्यानंतर संध्याकाळी त्यांना अटक होण्याची शक्यता आहे. राऊत यांनी ईडी कार्यालयात पोहचल्यानंतर, अटकेचे संकेत दिले आहेत.
काय म्हणाले संजय राऊत ?
मी बाळासाहेब ठाकरे यांचा एक सच्चा शिवसैनिक आहे मी लढणार आम्ही लढू महाराष्ट्र इतका कमजोर नाहीये आणि शिवसेना इतकी कमजोर नाहीये विरोधकांना दाखवून देऊ शिवसेना काय आहे हे हा महाराष्ट्राला कमजोर करण्यासाठीचा प्रयत्न आहे महाराष्ट्र कमजोर होतोय पेढे वाटा. महाराष्ट्र कमजोर होतोय, पेढे वाटा, बेशरम लोक आहेत तुम्ही, लाज वाटली पाहिजे तुम्हाला
अटक करुन घेणार आहे – राऊत
सगळ्यांना माहिती आहे की हे काय लेव्हलचा राजकारण सुरू आहे हे शिवसेनेला कमजोर करण्याचे प्रयत्न आहे ते सगळ्यांना माहिती आहे सगळ्यांना माहिती आहे की संजय राऊत यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे मात्र संजय राऊत शिवसेना सोडणार नाही आणि महाराष्ट्राची बेईमानी नाही करणार मला अटक करायला निघालेले आहेत आणि मी अटक करून घेतोय.
ईडी कार्यालयात पोहचण्यापूर्वी संजय राऊत यांनी tv9ला फोनवरुन प्रतिक्रिया दिली होती, त्यात त्यांनी बलिदान देण्याची तयारी असल्याचे सांगितले होते.
मरेन पण झुकणार नाही – राऊत
जी काय कारवाई व्हायची ती होऊ द्या मी घाबरत नाही ही राजकीय सोडायला चाललेली कारवाई आहे माझा पक्ष माझ्या पाठीशी आहे उद्धव ठाकरे माझ्या पाठीशी आहेत शिवसैनिकांचा बळ माझ्या पाठीशी आहे आणि एक लक्षात घ्या संजय राऊतला महाराष्ट्र ओळखतो देश ओळखतो तो शिवसेनेमुळे आणि हा संजय राऊत कधी गुडघ्यावर चालत नाही आणि फरपट जात नाही निधड्या छातीने उभा राहतो कुणी काहीही म्हणू द्या त्यामुळे या कारवाईला सुद्धा मी निधड्या छातीने सामोरे जातोय यातूनच महाराष्ट्राला सुद्धा बळ मिळेल राजकीय चुडाच्या कारवायाच्या महाराष्ट्रात सुरुवात भारतीय जनता पार्टीच्या विरोधकांवर फक्त त्यांनाही यातून बळ मिळणार आहे आमच्यासारखी ही काही लोक आहेत जी न झुकता न डरता कारवाईला सामोरे जातात आणि लढाई लढतात आणि या अशा कारवाईंच्या भीतीने अनेक लोक पक्ष सोडून जातात शरणागती पत्करतात संजय राऊत असा नाही मरण पण झुकणार नाही वाकणार नाही शिवसेना सोडणार नाही