मुंबई महापालिकेसाठी भाजप-मनसे युती होणार? जाणून घ्या भाजपच्या बैठकीत नेमक्या कोणत्या मुद्द्यांवर चर्चा?

भाजपच्या आजच्या बैठकीत मनसेला (Bjp-Mns Alliance) सोबत घेऊन मुंबई महापालिका निवडणूक लढण्यावरही चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मनसे आणि भाजपच्या युतीच्या चर्चा आहेत.

मुंबई महापालिकेसाठी भाजप-मनसे युती होणार? जाणून घ्या भाजपच्या बैठकीत नेमक्या कोणत्या मुद्द्यांवर चर्चा?
Raj Thackeray
Follow us
| Updated on: Jan 25, 2022 | 8:01 PM

मुंबई : मुंबई महापालिका (Bmc Elections 2022) काबीज करण्यासाठी भाजपने (Bjp) जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे, त्यासाठी भाजपची आज एक महत्वपूर्ण बैठक पार पडलीय. त्यानंतर मुंबई महापालिका आमचीच असा नारा भाजप नेत्यांकडून देण्यात आलाय. मुंबई महापालिका निवडणूक जिंकण्यासाठी आणि शिवसेनेला शह देण्यासाठी भाजपकडून सर्व पर्यायांची चाचपणी सुरू आहे. भाजपच्या आजच्या बैठकीत मनसेला (Bjp-Mns Alliance) सोबत घेऊन मुंबई महापालिका निवडणूक लढण्यावरही चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मनसे आणि भाजपच्या युतीच्या चर्चा आहेत. मात्र मनसेच्या उत्तरभरतीय विरोधी भूमिकेमुळे भाजपला नुकसान होणार असेही मत काही नेत्यांनी बैठकीत व्यक्त केले आहे. मनसेला सोबत घेऊन निवडणूक लढण्याचा विचार करताना भाजप सावध पवित्रा घेताना दिसून येत आहे.

मनसेला सोबत घेण्यावरून भाजपमध्ये मतमतांतर

मनसेने उत्तर भारतीयांविरोधात नेहमी खळखट्याकची भूमिका घेतली आहे. आणि मुंबई महापालिकेत उत्तर भारतीय मतदारांचा प्रभावही मोठा आहे, त्यामुळे मनसेला सोबत घेतल्यास उलट त्याचे नुकसान भाजपला होण्याची शक्यता जास्त आहेत. त्यामुळे मनसेला सोबत घेण्याबाबत काही नेतेमंडळी अनुकूल नाही. सध्या भाजपची स्थिती मजबूत आहे, त्यामुळे स्वबळावर लढावे असे मत बहुतांश नेत्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. आरपीआय आणि रासप सारख्या पक्षांना भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवण्यास सांगणार असल्याचीही माहिती समोर आली आहे.

यापूर्वीही भाजपाच्या काही बैठकीत मनसेचा मुद्दा चर्चिला गेला आहे. काही दिवसांपूर्वीच नाशकात चंद्रकांत पाटील आणि राज ठाकरे यांची भेटही चर्चेत राहिली होती. तसेच राज ठाकरेंच्या नव्या शिवतीर्थलाही फडणवीसांनी भेट दिली होती, त्या भेटीचीही चर्चा होती. फक्त फडणवीसच नाही तर भाजपा नेते आशिष शेलार, प्रसाद लाड यांच्याही सतत राज ठाकरे यांच्यासोबत भेटीगाठी होत असतात, त्यामुळे आगामी पालिकेत या भेटीगाठींचा उपयोग कुणाला होणार? आणि मनसे भाजप पालिका एकत्र लढणार का? हे काही दिवसात स्पष्ट होईलच, मात्र आजच्या बैठकीनंतर पुन्हा मनसे-भाजप युतीच्या चर्चांनी जोर धरला आहे, एवढं मात्र नक्की.

मुंबई महापालिकेत शिवसेनेला चारी मुंड्या चीत करु, भाजपचा संकल्प; फडणवीसांच्या निवासस्थानी महत्वाची बैठक

‘…महाराष्ट्राला आपला सार्थ अभिमान’, मुख्यमंत्र्यांनी केले राष्ट्रीय पदक विजेत्यांचे अभिनंदन

सोमय्यांना फाईल दाखवणाऱ्या अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस! एखाद्या कार्यालयात जाऊन कागदपत्रे पाहता येतात का? तज्ज्ञ काय सांगतात?

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.