मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा, दोन दिवस पूर्ण पाणीकपात
बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे (BMC) होणाऱ्या पाणीपुरवठ्यात दोन दिवस खंड पडणार आहे. मंगळवार (26 ऑक्टोबर) आणि बुधवारी (27 ऑक्टोबर) मुंबईत पाणीपुरवठा होणार नाही. भांडुप आणि पिसे पंजरापूर कॉम्प्लेक्स येथील जल पंपिंग स्टेशनच्या दुरुस्तीच्या कामांमुळे दोन दिवस मुंबईत पाणी पुरवठा होणार नाही.
मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे (BMC) होणाऱ्या पाणीपुरवठ्यात दोन दिवस खंड पडणार आहे. मंगळवार (26 ऑक्टोबर) आणि बुधवारी (27 ऑक्टोबर) मुंबईत पाणीपुरवठा होणार नाही. भांडुप आणि पिसे पंजरापूर कॉम्प्लेक्स येथील जल पंपिंग स्टेशनच्या दुरुस्तीच्या कामांमुळे दोन दिवस मुंबईत पाणी पुरवठा होणार नाही.
बीएमसी अधिकाऱ्यांरी दिलेल्या माहितीनुसार, भांडुप कॉम्प्लेक्सच्या 1910 एमएलडी पंपिंग स्टेशनवर 1200 मिमी व्यासाच्या दोन स्लाइस व्हॉल्व्हच्या बदलीसाठी देखरेखीचे काम करायचे आहे. पिसे पंजरापूर कॉम्प्लेक्समधील स्टेज 3 पंप सेट बदलण्याचे कामही केले जाईल. याशिवाय, 1,800 मिमी व्यासाच्या पाण्याच्या वाहिन्यांवरील गळती देखील पाहण्याची योजना महापालिका आखत आहे. त्यामुळे मंगळवारी सकाळी 10 ते रात्री 10 या वेळेत शहर आणि उपनगरात 15 टक्के पाणीकपात होणार आहे.
पवई येथे मंगळवार आणि बुधवारी सकाळी 10 ते दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजेपर्यंत गळती रोखण्याची कामेही प्रस्तावित आहेत. याचा परिणाम महापालिकेच्या के/पूर्व, एस, जी/उत्तर आणि एच/पूर्व वॉर्डांतर्गत भागात पाणी पुरवठा पूर्णपणे बंद असेल.
पाणीकपातीमुळे कुठल्या भागात परिणाम होणार?
1) एस विभाग – फिल्टरपाडा एस एक्स – 6 – (24 तास) – जयभिम नगर, बेस्ट नगर, आरे मार्ग आणि परिसर, फिल्टरपाडा
2) के/पूर्व विभाग – मरोळ बस बार क्षेत्र, केई 1- (दुपारी 2 ते सायंकाळी 5.30 वाजता) – चकाला, प्रकाश वाडी, गोविंद वाडी, मालपा डोंगरी क्रमांक 1 व हनुमान नगर, मोटा नगर, शिवाजी नगर, शहीद भगतसिंग वसाहत (भाग), चरत सिंग वसाहत (भाग), मुकुंद रुग्णालय, तांत्रिक विभाग, लेलेवाडी, इंदिरा नगर, मापखान नगर, टाकपाडा, नवपाडा, विमानतळ मार्ग क्षेत्र, चिमटपाडा, सागबाग, मरोळ औद्योगिक क्षेत्र, रामकृष्ण मंदीर मार्ग, जे. बी. नगर, बगरखा मार्ग, कांती नगर
3) के/पूर्व विभाग – सहार रोड क्षेत्र, केई 1 – (दुपारी 2 ते सायंकाळी 5.30 वाजता) – कबीर नगर, बामणवाडा, पारसीवाडा, विमानतळ क्षेत्र, तरुण भारत वसाहत, इस्लामपुरा, देऊळवाडी, पी ऍण्ड टी वसाहत
4) के/पूर्व विभाग – ओम नगर क्षेत्र, केई 2 – (पहाटे 4 ते सकाळी 8 वाजता) – ओम नगर, कांती नगर, राजस्थान सोसायटी, साईनगर (तांत्रिक क्षेत्र), सहार गाव, सुतार पाखडी (पाईपलाईन क्षेत्र)
5) के/पूर्व विभाग – एम. आय. डी. सी. व भवानी नगर केई 10 – (सकाळी 11ते दुपारी 2 वाजता) – मुलगाव डोंगरी, सुभाष नगर, एम. आय. डी. सी. मार्ग क्रमांक 1 ते 23, भंगारवाडी, ट्रान्स अपार्टमेंट, कोंडीविटा, महेश्वरी नगर, उपाध्याय नगर, ठाकूर चाळ, साळवे नगर, भवानी नगर, दुर्गा पाडा, मामा गॅरेज
6) के/पूर्व विभाग – विजय नगर मरोळ क्षेत्र, केई – 10ए – (सायंकाळी 6 ते रात्री 10 वाजता) – विजय नगर मरोळ, मिलीट्री मार्ग, वसंत ओआसिस, गांवदेवी, मरोळ गांव, चर्च रोड, हिल व्ह्यू सोसायटी, कदमवाडी, भंडारवाडा, उत्तम ढाबा
7) के/पूर्व विभाग – सिप्झ तसेच आंतरराष्ट्रीय विमानतळ (24 तास)
8) एच/पूर्व विभाग – बांद्रा टर्मिनल पुरवठा क्षेत्र
9) जी / उत्तर विभाग – धारावी सायंकाळचे पाणीपुरवठा क्षेत्र – (दुपारी 4 ते रात्री 9 वाजेपर्यंत) – धारावी मुख्य मार्ग, गणेश मंदीर मार्ग, ए. के. जी. नगर, दिलीप कदम मार्ग, कुंभारवाडा, संत गोराकुंभार मार्ग
10) जी / उत्तर विभाग – धारावी सकाळचे पाणीपुरवठा क्षेत्र – (पहाटे 4 ते दुपारी 12वाजेपर्यंत) – प्रेम नगर, नाईक नगर, जास्मिन मील मार्ग, माटुंगा लेबर कॅम्प, 90 फीट रोड, एम. जी. मार्ग, धारावी लूप मार्ग, संत रोहिदास मार्ग
पीटीआय या वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, “सर्व नागरिकांना विनंती करण्यात येते की त्यांनी पाणी साठवून ठेवावे आणि बीएमसीला सहकार्य करावे,” असे नागरी अधिकाऱ्यांनी सांगितले. यापूर्वी बीएमसीने शहरातील काही भागांतील पाणीपुरवठ्यात 5 ते 7 ऑक्टोबरपर्यंत कपात करण्याची घोषणा केली होती. बीएमसीच्या नियमित देखभालीच्या कामामुळे पाणीपुरवठा कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शहराला पुरेशा प्रमाणात चांगल्या दर्जाचे पाणी मिळावे यासाठी महापालिका नियमित देखभालीचे काम करत आहे.
Mumbai Water Cut | मुंबईमध्ये 26-27 ऑक्टोबरला पाणीकपात, दुरुस्तीच्या कामामुळे निर्णयhttps://t.co/eUifSJdTtS#mumbai | #WaterCut | #MumbaiWater | #bmc | @mybmc
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 21, 2021
संबंधित बातम्या :
खारघर, द्रोणागिरी, उलवे परिसरात पाणीकपात; आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद राहणार
Mumbai Water Cut | मुंबईकरांनो पाणी जपून वापरा, पाच दिवसांसाठी पाणीकपात जाहीर