AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘राजकारणात उद्या काय होईल ते सांगता येईल का?’; उद्धव ठाकरे यांचं सूचक वक्तव्य? 

राजकारणात कधी काय होईल? याचा भरोसा नाही. याची जाणीव आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनादेखील आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी आजच्या पत्रकार परिषदेत जे वक्तव्य केलं त्याचा अर्थ काय काढायचा? अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

'राजकारणात उद्या काय होईल ते सांगता येईल का?'; उद्धव ठाकरे यांचं सूचक वक्तव्य? 
उद्धव ठाकरे
| Updated on: Jan 10, 2025 | 5:37 PM
Share

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचं कामकाज कुठपर्यंत झालं हे पाहण्यासाठी स्मारकस्थळी भेट दिली. शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकाच्या कामकाजाचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. आता दुसऱ्या टप्प्यात काम सुरु होईल. या दोन्ही टप्प्यांचं कामकाज 23 जानेवारी 2026 च्या आधी पूर्ण होईल, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. यावेळी उद्धव ठाकरे यांना शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकाच्या उद्घाटनावेळी कोण-कोण येईल? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी त्यावेळी जे पंतप्रधान असतील त्यांच्या हस्ते स्मारकाचं उद्घाटन होईल, असं उत्तर दिलं. यानंतर त्यांनी आणखी एक महत्त्वाचं वक्तव्य केलं. ‘राजकारणात उद्या काय होईल ते सांगता येईल का?’, असं वक्तव्य त्यांनी केलं.

“त्यावेळी जे पंतप्रधान असतील ते उद्घाटनाला येतील”, असं उद्धव ठाकरे म्हणाले. यावेळी पत्रकारांनी त्यांना कोण पंतप्रधान असतील? असं विचारलं. त्यावर त्यांनी “उद्या काय होईल हे आज सांगता येत नाही. एनडीएचं सरकार असेल तर ते लोक येऊ शकतात. त्यावेळी जे सरकार असेल ते लोक येतील. भूमिपूजनाच्यावेळी मी मुख्यमंत्री होतो. आता नाही”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

‘या वास्तूसह आम्ही एक भावनात्मक बंधनासह जोडले गेलो’

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकात आपलं स्वागत करताना आनंद होतोय. या स्मारकावर काम सुरु आहे आणि चर्चादेखील सुरु आहेत. मी आर्किटेक्ट आभा लांबा आणि टाटा प्रोजेक्ट यांना धन्यवाद देऊ इच्छितो. हे काम आता फार सोपं वाटतंय. पण करताना फार कठीण होतं. माजी मंत्री सुभाष देसाई आणि आदित्य ठाकरे यांनी या जागेचं महत्त्व सांगितलं. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं स्मारकही बाजूलाच आहे. पण या जागेतला आव्हान म्हणजे, एक महापौर बंगला. या बंगल्याला आम्ही केवळ वास्तू म्हणून बघत नाहीत तर त्या वास्तू बरोबर आम्ही एक भावनात्मक बंधनासह जोडले गेलो आहोत, अशी भावना उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.

‘वास्तूचं वैभव जपून काम करणं हे फार कठीण’

“आताच इथे शिवसेनेचे चार महापौर या वास्तूत राहिले होते. ते आपल्यासोबत इथे उपस्थित आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अनेक बैठका इथे झाल्या आहेत. महायुतीच्या बैठका इथे झालेल्या आहेत. ही वास्तू हेरीटेज वास्तू आहे. या वास्तूला कुठेही धक्का न लावता काम करणं खूप कठीण होतं. त्या वास्तूचं वैभव जपून काम करणं हे फार कठीण होतं. हेरीटेद म्हटल्यावर काही नियम असतात. त्यामुळे सीआरझेडचा कायदा आला”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

‘ही वास्तू उभी करणं हे आव्हानाचं होतं’

“मग आम्ही असं ठरवलं, ही कल्पना आर्किटेक्ट आभा लांबा यांची आहे. स्मारक भूमिगत करुयात. हे बोलायला खूप सोपं आहे. बाजूला समुद्र आहे. त्या समुद्राचा रेटा हा जमिनीखालून ही खूप असतो. काही वर्षांपूर्वी इथे आपण संयुक्त महाराष्ट्राचं दालन केलं. पण ते दालन झाल्यानंतरही तिकडे रिपेअरिंग करायची गरज लागली. कारण समुद्राचं पाणी जमिनीखालून सर्व मर्यादा ओलांडून येत होतं. त्यामुळे ती खबरदारी घेणं, त्यानंतर ती वास्तू उभी करणं हे आव्हानाचं होतं. त्यामुळे मी आर्किटेक्ट आभा लांबा आणि टाटा प्रोजेक्ट्स यांचा आभारी आहे. त्यांनी अत्यंत देखणं काम वेळेमध्ये टप्पा 1 पूर्ण केलेला आहे”, अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली.

शिवसेनाप्रमुखांनी आत्मचरित्र का लिहिलं नाही?

“टप्पा 2 च्या कामाला आता सुरुवात होईल. या कामातून संपूर्ण शिवसेनाप्रमुखांचा जीवनपट बघायला मिळणार आहे. अर्थात तो मुक्त असा जीवनपट नाही. शिवसेनाप्रमुखांनी कधी आत्मचरित्र लिहिलं नाही. त्यांना अनेकदा विचारलं की तुम्ही आत्मचरित्र का लिहित नाहीत, त्यावेळी त्यांनी उत्तर दिलं की, मी कपाटातला माणूस नाही. मी मैदानावरचा माणूस आहे. त्यामुळे त्यांचं आयुष्य उघडं पुस्तक होतं. पण ते नुस्त मांडणं म्हणजे स्मारक नाही. मी असा विचार केला की, शिवसेनाप्रमुखांचं स्मारक असं झालं पाहिजे की, जे शिवसेनाप्रमुखांनी आयुष्यभर महाराष्ट्राला, देशाला आणि देशातील हिंदूंना दिलं, तेच काम त्यांच्या स्मारकाने सुद्धा पुढचे अनेक वर्ष दिलं पाहिजे”, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा.
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट.
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका.
BJP पदाधिकाऱ्याचं अजब कांड, मतदारांना पैशांचे आमिष दाखवलं अन् कोंडून..
BJP पदाधिकाऱ्याचं अजब कांड, मतदारांना पैशांचे आमिष दाखवलं अन् कोंडून...
मोदी ऑन बोर्ड E-Mail चा उल्लेख अन्...पृथ्वीराज चव्हाणांचा सनसनाटी दावा
मोदी ऑन बोर्ड E-Mail चा उल्लेख अन्...पृथ्वीराज चव्हाणांचा सनसनाटी दावा.
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली.
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल.
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश.
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा.
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी.