‘या’ महापालिकांचेही घोटाळा काढा, यादीच दिली; उद्धव ठाकरे यांचे सत्ताधाऱ्यांना थेट आव्हान

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोव्हिड काळातील घोटाळ्यावरून राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. घोटाळेच काढायचे असतील तर ठाणे, नागपूर, पुणे, पिंपरी चिंचवड महापालिकेतील घोटाळेही बाहेर काढा, असं आव्हान त्यांनी दिलं आहे.

'या' महापालिकांचेही घोटाळा काढा, यादीच दिली; उद्धव ठाकरे यांचे सत्ताधाऱ्यांना थेट आव्हान
uddhav thackerayImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 24, 2023 | 1:24 PM

नंदकिशोर गावडे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई : कोरोना काळात मुंबई महापालिकेत झालेल्या कोव्हिड घोटाळ्याची ईडीकडून चौकशी करण्यात येत आहे. या घोटाळ्याबाबत ईडीने महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या घरावर छापे मारले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच ठाकरे गटाला बदनाम करण्यासाठी ही छापेमारी सुरू असल्याची चर्चा आहे. ही चर्चा सुरू असतानाच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या छापेमारीवरून थेट राज्य सरकारलाच आव्हान दिलं आहे. घोटाळ्याचीच चौकशी करायची असेल तर राज्यातील इतर महापालिकांचीही चौकशी करा, असं आव्हान देतानाच त्यांनी थेट या महापालिकांची नावेच जाहीर केली आहेत. त्यामुळे राज्य सरकार त्यावर काय प्रतिक्रिया देते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

उद्धव ठाकरे हे शिवाजी मंदिर येथे आयोजित करण्यात आलेल्या शाखाप्रमुखांच्या मेळाव्यात बोलत होते. कोरोना काळात एपिडेमिक अॅक्ट होता. पंतप्रधानांनी हा अॅक्ट आणला होता. अशा परिस्थितीत नियमांच्या पलिकडे जाऊन काम करावे असा हा कायदा म्हणतो. त्यामुळे केंद्र सरकारनेही या कायद्याचा आधार घेऊन खरेदी केली. अनेक महापालिकांनीही कोरोना नियंत्रणासाठी खरेदी केली होती. चौकशीच करायची असेल तर ठाणे पालिकेची करा. पिंपरी चिंचवडची करा. भाजपचे आमदार संजय केळकर यांनीच ठाणे महापालिकेतील भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी केली होती. त्याचं काय झालं?, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केला.

हे सुद्धा वाचा

पीएम केअर फंडाची चौकशी करा

चौकशी करायची असेल तर पुणे महापालिकेची करा. नागपूर महापालिकेची करा. तुमच्यात हिंमत असेल तर देशातील सर्वच राज्यांच्या राज्यकारभाराची चौकशी करा. पीएम केअर फंडची चौकशी करा. टाटाने दीड हजार कोटी दिले ते गेलेच ना. ज्या सरकारचा जन्मच खोक्यातून झालाय ते आमची काय चौकशी करणार? असा सवाल त्यांनी केला.

आम्हाला ईडीचा अधिकार द्या

समान नागरी कायदा म्हणता मग ईडी सीबीआयचा अधिकार आम्हाला द्या. आम्ही सांगतो धाडी टाकायला. तुमच्या घोटाळ्यावर राहुल गांधी यांनी सवाल केला. अरविंद केजरीवाल यांनी सवाल केला. त्याचं उत्तर दिलं जातन नाही. प्रश्न विचारला तर कारवाई होते. पण उत्तर देत नाही, असंही ते म्हणाले.

विखेंवर धाडी टाकण्याची हिंमत आहे काय?

यावेळी त्यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या घोटाळ्यावरही भाष्य केलं. राधाकृष्ण विखे पाटील यांनी देशद्रोह्याकडून अडीच कोटी घेतले. झाकीर नाईकडून हा पैसा घेतला. राधाकृष्णवर धाडी टाकायची हिंमत आहे काय? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला. संजय राऊत यांनी अनेक घोटाळ्याची माहिती दिली आहे. अनेकांची नावे घेऊन कागदपत्रेही दिली आहेत. त्यांची का चौकशी होत नाही? असा सवालही त्यांनी केला.

'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.