Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उद्धवजींनी पत्र द्यावं, लगेच मुंबई लोकल सर्वांसाठी सुरु करतो : रावसाहेब दानवे

कोविड आटोक्यात आल्याचं जर आम्हाला राज्य सरकारने सर्वसामान्यांना रेल्वे सुरू करण्यासाठी पत्र पाठवले तर आम्ही परवानगी देऊ, असं रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे.

उद्धवजींनी पत्र द्यावं, लगेच मुंबई लोकल सर्वांसाठी सुरु करतो : रावसाहेब दानवे
रावसाहेब दानवे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Follow us
| Updated on: Sep 21, 2021 | 3:08 PM

मुंबई : मुंबई लोकल ट्रेन सेवा सर्वसामान्यांसाठी कधी सुरु होणार, असा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे. याच प्रश्नांना उत्तर केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिलं आहे. कोविड आटोक्यात आल्याचं जर आम्हाला राज्य सरकारने सर्वसामान्यांना रेल्वे सुरू करण्यासाठी पत्र पाठवले तर आम्ही परवानगी देऊ, असं रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे.

मुंबई लोकल ट्रेन सुरु करण्यासाठी केंद्र सरकारची कोणतीही अडचण नाही

मुंबई लोकल ट्रेन सुरु करण्यासाठी केंद्र सरकारची कोणतीही अडचण नाही, असं सांगत आम्ही 15 ऑगस्टपासून तशीही परवानगी दिली आहे. आता जरी परवानगी मागितली तरी आमची कोणतीही अडचण नाही, आम्ही परवानगी देऊ, असं रावसाहेब दानवे म्हणाले.

दानवेंचं गीतेंच्या वक्तव्यावरही भाष्य

अनंत गीतेंच्या वक्तव्यावरही दानवेंनी भाष्य केलं. एका विशिष्ट उद्देश्याने सोबत आलेले हे तिन्ही पक्ष आहेत. त्यांचे काही तरी राजकीय प्रॉब्लेम आहेत म्हणून ते सोबत आहेत. आता अनंत गीतेंनंतर एक एक जण प्रेस घेईन आणि अशाच प्रकारची वक्तव्ये करतील, अशी भविष्यवाणीही दानवेंनी केली.

सत्तेसाठी तिन्ही पक्षांची तडजोड, अमर अकबर अॅन्थनीची तीन तोंडं तीन दिशेला

सत्तेसाठी तिन्ही पक्षांनी तडजोड केलीय. अमर अकबर अॅन्थनी यांची तीन तोंडं तीन दिशेला आहे. त्यांच्या समस्या आहेत म्हणून एकत्र आहेत. हे एकमेकांवर आरोप करत राहतील आणि सत्तेसाठी एकत्रही राहतील. ते तिघे काय एकमेकांवर टीका करतात आणि कशा पद्धतीने बोलतात. असो पण मी आणि सुभाष देसाई कोणती भाषा वापरतो, कसं बोलतो, यावरून राजकीय दिशा समजून घ्या, असे सूचक संकेतही त्यांनी दिले.

दोन डोस घेतलेल्यांना सध्या प्रवासाची मुभा

राज्य सरकारकडून 15 ऑगस्टपासून कोव्हिडचे दोन डोस घेतलेल्यांना लोकल प्रवासाची मुभा दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी 8 ऑगस्टला जनतेशी संबोधित करताना याबाबतची माहिती दिली.

मुंबई लोकल प्रवास करण्यासाठी केवळ दोन डोसच नव्हे, आणखी एक अट पूर्ण करावी लागणार!

मुंबई लोकलसाठी दोन डोस घेतलेल्यांना महापालिका किंवा राज्य सरकारकडून फोटो पास देण्यात येईल. हे एकप्रकारचे इम्युनिटी सर्टिफिकेट असेल, या फोटो पासच्या आधारावरच तुम्हाला रेल्वेचा पास मिळेल, अशी माहिती मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल (Iqbal Chahal) यांनी दिली. महत्त्वाचं म्हणजे जरी दुसरा डोस घेतला असला, तरी डोस घेऊन 14 दिवस झाल्यानंतरच ओळखपत्र दिलं जाईल. त्यानंतरच लोकल प्रवासाचा पास मिळणार आहे. म्हणेज 14 दिवसांची अट पूर्ण करावी लागणार आहे.

Uddhav Thackeray gave me a letter as Corona came under control, Mumbai Local starts Says Rail Minister Raosaheb Danve

हे ही वाचा :

त्यांचं विधान सत्य परिस्थितीवर आधारित, मी पहिल्यापासून सांगतोय, फडणवीसांची गीतेंच्या विधानाला हवा

कोण आहेत वैभव खेडेकर ज्यांच्याविरोधात रामदास कदम 100 कोटीचा मानहानीचा दावा करण्याची घोषणा करतायत?

बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट
बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट.
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच.
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले.
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम.
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत.
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर.
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले.
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक.
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?.
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल.