मनोहर जोशी यांनी वाढदिवशी आपली भूमिका स्पष्ट करताच उद्धव ठाकरे जोशी सरांच्या भेटीला
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांनी मनोहर जोशी यांची भेट घेतली. मनोहर जोशी यांनी कालच आपली भूमिका स्पष्ट केली होती.
मुंबई : उद्धव ठाकरे हे मनोहर जोशी ( Uddhav Thackeray Meet Manohar Joshi ) यांच्या भेटीसाठी मातोश्रीवरुन निघाले आहेत. मनोहर जोशी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना शुभेच्छा देण्यासाठी उद्धव ठाकरे हे त्यांच्या निवासस्थानी जावून त्यांची भेट घेणार आहेत. कालच मनोहर जोशी यांनी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली होती. ते म्हणाले होते की, मी आधीपासूनच शिवसेनेत आहे. मी उद्धव ठाकरे यांच्यासोबत नेहमीच उभा आहे. त्यामुळे ते ठाकरे गटातच राहणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. ( Uddhav Thackeray going to Meet Manohar Joshi )
मनोहर जोशी (Manohar Joshi) यांनी आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर आता उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) हे त्यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी जात आहेत. बाळासाहेब ठाकरे ( Balasaheb Thackeray ) यांच्या सोबत नेहमी खंबीरमपणे उभे राहलेले मनोहर जोशी हे आजही ठाकरे कुटुंबाच्या सोबत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
मनोहर जोशी म्हणाले होते की, माझं रक्त हे शिवसेनेचं आहे. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा सहवास, उद्धवजींचा सहवास, मी महाराष्ट्र, शिवसेनेसाठी आहे. बाळासाहेबांच्या अपेक्षा मी पूर्ण करु शकलो याचं समाधान असल्याचं मनोहर जोशी यांनी ‘टीव्ही9 मराठी’शी बोलताना म्हटलं होतं.
काही दिवसांपूर्वी मनोहर जोशी हे एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या गटात जाणार असल्याची चर्चा होती. पण आता या चर्चेला पूर्णविराम लागला आहे. काही महिन्यांपूर्वीच एकनाथ शिंदे यांनी मनोहर जोशी यांची भेट घेतली होती.
उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेची सूत्रे हाती घेतल्यानंतर मनोहर जोशी यांना बाजुला केलं गेल्याचं चित्र होतं. एका कार्यक्रमात तर उद्धव ठाकरे यांच्या समोर त्यांना सभा सोडून जावं लागलं होतं. त्यामुळे मनोहर जोशी हे नाव शिवसेनेतून (Shivsena) कुठे तरी बाजुला झालं होतं.
शिवसेनेत फूट पडल्यानंतर दोन्ही गट आपली ताकद वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोहर जोशी यांची भेट (Eknath Shinde meet Manohar Joshi) घेतल्यानंतर मनोहर जोशींच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. पण भूमिका स्पष्ट होताच उद्धव ठाकरे मनोहर जोशी यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत.