उद्धव ठाकरे, प्रकाश आंबेडकर आणि औरंगजेबाचे फोटो असलेले बॅनर्स लागले, मुंबईत खळबळ; पोलीस सतर्क

औरंगजेबाच्या मुद्द्यावरून राजकीय पक्षांमध्ये तू तू मै मै सुरू असतानाच माहीममध्ये लागलेल्या एका बॅनर्सने खळबळ उडाली आहे. हे बॅनर्स शिवसैनिकांनी तात्काळ हटवले आहेत.

उद्धव ठाकरे, प्रकाश आंबेडकर आणि औरंगजेबाचे फोटो असलेले बॅनर्स लागले, मुंबईत खळबळ; पोलीस सतर्क
aurangzeb bannersImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 22, 2023 | 11:09 AM

मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी औरंगाबादच्या खुलताबाद येथे जाऊन औरंजेबाच्या कबरीवर माथा टेकला होता. त्यावरून वादंग निर्माण झालं आहे. आंबेडकरांच्या या कृतीवरून भाजपने आंबेडकरांवर टीका केली आहे. तसेच आंबेडकरांची ही कृती मान्य आहे काय? याचे उत्तर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी द्यावं, असं आव्हानच भाजपने उद्धव ठाकरे यांना दिलं आहे. औरंगजेबाच्या मुद्द्यावरून भाजपने आंबेडकर आणि ठाकरे यांना घेरलेलं असतानाच मुंबईत लागलेल्या एका बॅनर्सने खळबळ उडाली आहे. हे बॅनर्स कुणी लावले? असा सवाल या निमित्ताने केला जात आहे.

माहीम परिसरात उद्धव ठाकरे, प्रकाश आंबेडकर आणि औरंगजेबाचा फोटो असलेले बॅनर्स लागले आहेत. मध्यरात्री अज्ञात इसमाने हे बॅनर्स लावले आहेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. सकाळी हे बॅनर्स पाहिल्यानंतर त्याची एकच चर्चा सुरू झाली. स्थानिक शिवसैनिकांनी तात्काळ हे बॅनर्स हटवले. याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. कुणी तरी हा खोडसाळपणा केल्याचं सांगितलं जात आहे. तसेच अशा प्रकारामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्नही निर्माण होऊ शकतो असं सांगितलं जात आहे.

हे सुद्धा वाचा

पोलीस एफआयआर दाखल करणार

या बॅनर्सची शिवसैनिकांनी किंवा इतर कुणची पोलिसात तक्रार दाखल केली नसली तरी पोलीस स्वत:हून अज्ञात व्यक्ती विरोधात एफआयआर दाखल करणार आहेत. तशी माहिती डीसीपींनी दिली आहे. या बॅनर्समुळे पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न केल्यास कठोर कारवाई करण्याचा इशाराही डीसीपीने दिला आहे.

बॅनर्सवर काय?

या बॅनर्सवरील भाषा अत्यंत आक्षेपहार्य आहे. औरंग्याच्या थडग्यावर प्रकाश घालतोय मुजरे, मुघली उदात्तीकरणासाठी सोबतीला उद्धवचे हुजरे… शिवरायांची जनता, असं या बॅनर्सवर लिहिलं आहे. तसेच #uddhavthackerayforaurangazeb असा हॅशटॅग या बॅनर्सवर वापरण्यात आला आहे. तसेच या बॅनर्सवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, प्रकाश आंबेडकर आणि औरंगजेबाचा फोटो लावण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण?

मागच्या आठवड्यात प्रकाश आंबेडकर हे औरंगाबादच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी खुलताबादला भेट दिली. या भेटीवेळी त्यांनी औरंगजेबाच्या थडग्यावर फुलं वाहून माथा टेकला. त्यानंतर भद्रा मारूती मंदिरात जाऊन दर्शनही घेतलं. मात्र, आंबेडकर यांनी औरंगजेबाच्या कबरीवर फुलं वाहिल्याने त्यावरून भाजप आणि शिंदे गटाकडून तीव्र प्रतिक्रिया देण्यात आल्या. प्रकाश आंबेडकरांची कृती उद्धव ठाकरे यांना मान्य आहे काय? असा सवालही या निमित्ताने करण्यात आला.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.