AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सत्यजित तांबे यांच्या निमित्ताने मामांची जिरवण्याचा डाव?; ‘सामना’तून काँग्रेसच्या कलहावर बोट

सत्यजित तांबे यांच्या मुद्द्यावरूनही अग्रलेखातून भाजपला कानपिचक्या देण्यात आल्या आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचे सत्यजित तांबे हे भाचे. त्यामुळे मामांची कोंडी झाली.

सत्यजित तांबे यांच्या निमित्ताने मामांची जिरवण्याचा डाव?; 'सामना'तून काँग्रेसच्या कलहावर बोट
uddhav thackerayImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Feb 04, 2023 | 6:59 AM
Share

मुंबई: पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाचे निकाल लागले आहेत. या पाच जागांपैकी तीन जागांवर महाविकास आघाडी (maha vikas aghadi), एका जागेवर काँग्रेसच्या (congress) बंडखोराचा आणि एका जागेवर भाजपचा विजय झाला आहे. या निवडणुकीत सुशिक्षितांनी भाजपला (bjp) पूर्णपणे नाकारले आहे. त्यामुळे भाजपमध्ये खळबळ उडाली आहे. या निकालावरून दैनिक ‘सामना’तून भाजपला घेरण्यात आलं आहे. तर नाशिकच्या निकालावरून काँग्रेसला कानपिचक्या देण्यात आल्या आहेत. विदर्भात भाजपचा पचका झाला असून हे महाराष्ट्राचे ताजे जनमानस असल्याचं ‘सामना’च्या अग्रलेखातून म्हटलं आहे. तसेच अग्रलेखातून काँग्रेसमधील कलहावर बोटही ठेवण्यात आलं आहे.

भाजपचा सर्वात मोठा पचका विदर्भात झाला आहे. नागपूर शिक्षक आणि अमरावती पदवीधर मतदारसंघ हे भाजपचे बालेकिल्ले होते. या दोन्ही मतदारसंघात भाजपचा पराभव झाला. अमरावतीचे भाजपचे उमेदवार रणजीत पाटील तर दोन वेळा निवडून आले होते. ते देवेंद्र फडणवीस यांचे खासमखास होते. त्यांना जिंकण्याची 1000 टक्के खात्री होती. पण त्यांना अमरावतीतील मतदारांनी घाम फोडला आणि घरीच बसवले, असा हल्ला दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखातून करण्यात आला आहे.

मक्तेदारी राहिली नाही

अमरावतीत जे घडले तेच नागपुरात घडले. देवेंद्र फडणवीस यांचा बालेकिल्ला असलेल्या नागपुरात भाजपला पराभव पत्करावा लागला. याचा अर्थ विदर्भातील सुशिक्षित मतदार शहाणा झाला असून त्याने भाजपला पूर्णपणे नाकारले आहे. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ ही भाजपची मक्तेदारी राहिली नाही हे या निकालाने स्पष्ट झालं आहे, असा टोला अग्रलेखातून लगावण्यात आला आहे.

अजून धक्के बसणार

नागपूर हा भाजपचा बालेकिल्ला, फडणवीस यांचे वर्चस्व असलेला जिल्हा. तरीही भाजपचा पराभव झाला. हाती सत्ता, पोलीस, पैशाचं बळ असूनही पदवीधर भाजपला बधले नाहीत. त्यांनी भाजपचा पचकाच केला. पदवीधर आणि शिक्षकांनी दिलेला कौल हे महाराष्ट्राचे ताजे जनमानस आहे, असं सांगतानाच भाजप आणि मिंधे गटाला अजून अनेक धक्के पचवायचे आहेत. ही सुरुवात आहे, असा टोलाही लगावण्यात आला आहे.

झाकली मूठ…

सत्यजित तांबे यांच्या मुद्द्यावरूनही अग्रलेखातून भाजपला कानपिचक्या देण्यात आल्या आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचे सत्यजित तांबे हे भाचे. त्यामुळे मामांची कोंडी झाली. झाकली मूठ तशीच ठेवून तांबे हे काँग्रेसचेच उमेदवार असा पवित्रा काँग्रेसने घ्यायला हवा होता.

पण तांबे यांच्या निमित्ताने मामांची जिरवता येईल काय? असा डाव कदाचित असावा. त्यात किती त्थय ते त्यांनाच माहीत, असा शब्दात काँग्रेसला कानपिचक्या देण्यात आल्या आहेत.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.