Cow Hug Day : गोमांस खाण्यावरून लोकांच्या हत्या का घडवल्या?; दैनिक ‘सामना’तून भाजपला सवाल

गायीला मिठी मारल्याने अदानींसह सर्व महाघोटाळ्यांचे पाप धुवून निघणार आहे काय? गाय हा उपयुक्त पशू आहे. असं वीर सावरकर म्हणायचे. सावरकरांचे हे विचार भाजप आणि संघ परिवाला मान्य आहे काय?

Cow Hug Day : गोमांस खाण्यावरून लोकांच्या हत्या का घडवल्या?; दैनिक 'सामना'तून भाजपला सवाल
स्वप्नात गाय दिसण्याचा अर्थImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Feb 10, 2023 | 7:03 AM

मुंबई: केंद्र सरकारने काऊ हग डे साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावरून दैनिक ‘सामना’तून जोरदार टीका करण्यात आली आहे. गाईला मिठी मारायला सांगता. मग उधळलेल्या बिग बूलच्या गुन्ह्यांच्या चौकशीचे काय? असा सवाल करतानाच गोमांस खाण्यावरून लोकांच्या हत्या का घडवल्या? त्याचं उत्तर देशवासियांना दिलं पाहिजे, असा सवाल सामनातून करण्यात आला आहे. दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखातून हा सवाल करण्यात आला आहे.

अदानीविरोधात संसदेत घोषणा सुरू असतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अदानीच्या घोटाळ्यावर लोकसभा आणि राज्यसभेत एक शब्दही उच्चारला नाही. पण अदानी घोटाळ्यावर उतारा म्हणून 14 फेब्रुवारी रोजी गाय अलिंगन दिन साजरा करण्याचे फर्मान सोडलं आहे.

हे सुद्धा वाचा

गाय ही भारताच्या संस्कृती आणि अर्थव्यवस्थेचा कणा आहे. गाय कामधेनू आहे. तिला मिठी मारल्याने उन्नती मारा, असे आदेश केंद्राने दिल्याचं दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखातून म्हटलं आहे.

मिठी सैल करायला तयारच नाही

अदानी घोटाळ्यावर पंतप्रधानांकडून स्पष्टीकरण हवे होते. पण मोदी सरकारने पुन्हा एकदा धर्माच्या गुंगीचे औषध देऊन गप्प केले आहे. मोदी संसदेत अदानीवर बोलले नाही. पण त्यांचे सरकार गायीवर बोलले. अदानी शेअर बाजारातील बिग बुल आहेत. मोदी त्या बिग बुलला मिठी मारून बसले आहेत. ते मिठी जराही सैल करायला तयार नाहीत, असा टोला अग्रलेखातून लगावण्यात आला आहे.

देशाला उत्तर द्या

संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांनी गोमांस खाणाऱ्यांनाही संघाचे दरवाजे उघडे असल्याचं म्हटलं आहे. गोमांस खाऱ्यांना संघाचे दरवाजे उघडे असतील तर मग गोमांस खाण्यावरून हत्या का घडवल्या? याचे उत्तर देशाला मिळायला हवे, असंही म्हटलं आहे.

गायीलाही मान्य असावं ना

गायीला मिठी मारल्याने अदानींसह सर्व महाघोटाळ्यांचे पाप धुवून निघणार आहे काय? गाय हा उपयुक्त पशू आहे. असं वीर सावरकर म्हणायचे. सावरकरांचे हे विचार भाजप आणि संघ परिवाला मान्य आहे काय? गायीला मिठी मारल्याने भावनिक उन्नती होते, असं मानलं तर हा प्रकार गायीलाही मान्य व्हायला हवा ना? असे टोलेही अग्रलेखातून लगावण्यात आले आहेत.

चौकशी करणार आहात काय?

व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी चारा-पाण्याशिवाय हंबरणाऱ्या गाईला मिठी मारल्याने उधळलेल्या बिग बुलच्या गुन्ह्यांची चौकशी मोदी सरकार करणार आहे काय? असा सवालही यावेळी करण्यात आला आहे. त्यामुळे आता भाजप त्यावर काय उत्तर देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.