Video : देवेंद्रजी, तुमच्या परिवाराचे व्हॉट्सअप… तर तुम्हाला शवासन करावं लागेल; उद्धव ठाकरे यांचा गर्भित इशारा

गेल्या आठवड्यात आपण सलग दोन दिवस भेटलो होतो. तुम्ही ज्या घोषणा देत आहात त्याचं पुस्तक काढलं पाहिजे. 1966 पासून या सर्व घोषणा ऐकत ऐकत मी इथपर्यंत आलोय. घोषणा देण्यात शिवसैनिकांचा कोणी हात धरेल असं वाटत नाही. 

Video : देवेंद्रजी, तुमच्या परिवाराचे व्हॉट्सअप... तर तुम्हाला शवासन करावं लागेल; उद्धव ठाकरे यांचा गर्भित इशारा
uddhav thackerayImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 24, 2023 | 1:08 PM

नंदकिशोर गावडे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे परिवार वाचवा बैठकीसाठी पाटण्याला गेले आहेत, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल केली होती. फडणवीस यांच्या या टीकेला उद्धव ठाकरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. देवेंद्रजी परिवार तुम्हालाही आहे. तुमच्याही परिवाराचे व्हॉट्सअप बाहेर आले आहेत. आम्ही त्यावर अजून बोललो नाही. आम्ही त्यावर बोललो तर तुम्हाला शवासन करावं लागेल. तुम्हाला कोणतीही आसनं झेपणार नाही. फक्त झोपावं लागेल, असा गर्भित इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.

दादरच्या शिवाजी मंदिरात ठाकरे गटाच्या शाखाप्रमुखांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी हा इशारा दिला. मी परिवाराबाबत संवेदशनील आहे. सूरज आमि शिवसैनिक माझं कुटुंब आहे. माझ्या कुटुंबाची मी काळजी घेईल. परिवाराबद्दल बोलू नका. अनेकांचे अनेक गोष्टी आमच्याकडे आहेत, असं सांगतानाच सूरजवर धाड टाकली. तो साधा शिवसैनिक आहे, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

हे सुद्धा वाचा

1 जुलै रोजी महापालिकेवर मोर्चा

यावेळी उद्धव ठाकरे यांनी येत्या 1 जुलै रोजी मुंबई महापालिकेवर मोर्चा काढण्याचं जाहीर केलं. येत्या 1 तारखेला आपण महापालिकेवर मोर्चा काढणार आहोत. शनिवारी निवेदन कोणाला देणार? असं आम्हाला विचारलं जात आहे. अरे आम्हाला निवेदन द्यायचंच नाही. ज्यांना निवेदन द्यायचं आहे तेच सत्ताधाऱ्यांच्या टेबलाखाली बसले आहेत. त्यामुळे निवेदन कोणाला देणार? कोव्हिड काळातील भ्रष्टाचार जरूर काढा. देशभरात जे सर्व्हे झाले तेव्हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं नाव सर्वोत्तम मुख्यमंत्री म्हणून आलं. ही त्यांची पोटदुखी आहे. त्यामुळे निवडणुकीत त्यांना जमाल गोटा द्यायचा आहे. त्यांना घोड्याचंच औषध द्यावे लागेल. तरच त्यांचा कोठा मोकळा होईल, असा हल्लाबोलही उद्धव ठाकरे यांनी केला.

तुम्ही नालायकच

आपला संपूर्ण देश हा देशातील संस्कारामुळे आणि देशवासियांच्या संयमामुळे चालला आहे. भाजपच्या हातून देश कधीच सुटला आहे. उद्धव ठाकरेंना तुम्ही खलनायक ठरवत आहात. मी नायक की खलनायक हे जनता ठरवेल. पण तुम्ही नालायक आहात हे जनतेला माहीत आहे, अशी टीका त्यांनी केली.

आशीर्वाद देणारे अनेक

आजही मी जिथे जातो जिथे लोक मला भेटतात. परदेशातही लोक मला भेटली. नमस्कार केला. म्हणाले, साहेब तुमच्यामुळे आम्ही वाचलो. परदेशातील लोक म्हणाले, हे लोक तुमच्या सोबत जे करत आहेत, ते योग्य नाही. आम्ही तुमच्यासोबत आहे. या जळणाऱ्या पेक्षा आशीर्वाद देणारे अनेक आहेत, असं ते म्हणाले.

'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.