पीएम केअर फंड म्हणजे हास्य जत्रेतील प्रभाकर मोरे फंड; उद्धव ठाकरे यांनी उडवली खिल्ली

घराणेशाहीच आहे. तुमच्या घराण्याचा पत्ता काय? आतापत्ता काय? आमच्या सर्व पिढ्या महाराष्ट्रा समोर आहेत. माझ्या आजोबाचं आत्मचरित्र वाचल्यावर आमचं घराणं काय ते कळेल. मिळेल तिथे खा ही आमची पद्धत नाही.

पीएम केअर फंड म्हणजे हास्य जत्रेतील प्रभाकर मोरे फंड; उद्धव ठाकरे यांनी उडवली खिल्ली
uddhav thackeray Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 24, 2023 | 1:54 PM

नंदकिशोर गावडे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई : मुंबई महापालिकेतील कोव्हिड घोटाळ्याची ईडीकडून चौकशी सुरू झाल्याने माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अधिकच आक्रमक झाले आहेत. या घोटाळ्याच्या निषेधार्थ त्यांनी 1 जुलै रोजी महापालिकेवर मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. त्याच बरोबर पीएम केअर फंडाचीही खिल्ली उडवली आहे. हा पीएम केअर फंड आहे की हास्य जत्रेतील प्रभाकर मोरे फंड आहे? अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी पीएम केअर फंडाची खिल्ली उडवली आहे. तसेच टाटाने कोव्हिड काळात पीएम केअर फंडाला दीड हजार कोटी दिले होते, ते कुठे गेले?, असा सवालही उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

पीएम केअर फंड चौकशीच्या फेऱ्यात येत नाही. पीएमचा अर्थ काय? हास्यजत्रेतील प्रभाकर मोरे केअर फंड. अगं शालू… माहीत आहे ना तुम्हाला? प्रभाकर मोरे केअर फंड काढून टाका त्याचं नाव. मी पीएमचा अर्थ काय? कशासाठी लोकांनी या फंडाचत पैसे दिले? भाजपच्या दलालांनी, लोकप्रतिनिधींनी महाराष्ट्रात पैसे न देता प्रभाकर मोरे केअर फंडला पैसे दिले. मग ते पैसे गेले कुठे? करोडो रुपये तिकडे गोळा झाले. व्हेंटेलिटेर बिघडलेले होते. हे कुणाचं पाप होतं? कुणी खरेदी केली होती? तुम्ही आमची चौकशी करता मग तुमच्या या घोटाळ्याची कोण चौकशी करणार? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.

हे सुद्धा वाचा

मग भाजप विरुद्ध मी, त्याचं काय?

छत्रपती शिवाजी महाराजांनी सूरत लुटली होती. हे वर बसलेले दलाल महाराष्ट्राची राजधानी लुटत आहेत. मुंबई मॉडेलचं जगात कौतुक झालं. पण या नालायकांना त्याचं कौतुक नाही. बराक ओबामा त्यांच्याबद्दल बोलले. आता कुठे गेला माय डिअर बराक…? आता बराक बराच बोलतोय. आता बोललो तर बोलतील हा आंतरराष्ट्रीय जागतिक कट आहे. मला खेचायचा. मोदी विरुद्ध जग, असा कट झाला आहे. मग इकडे उद्धव ठाकरेंविरुद्ध भाजप आहे. त्याचं काय? असा सवाल त्यांनी केला.

त्यांचा नड्डा सुटतो

मी कोणीच नाही. माझ्याकडे पक्ष नाही. चिन्ह नाही. जेपी नड्डा ओरिसात गेले. तिथे माझ्याविरोधात बोलले. उद्धव ठाकरे बोलले तर त्यांचा नड्डा सुटतो. बोलायला सुटतो असं मला म्हणायचं आहे. तुम्हाला काय वाटलं? मी नड्डा हा बोललो आहे. नड्डा सुटतो म्हणजे बोलत सुटतो, असं उद्धव ठाकरे यांनी म्हणताच एकच खसखस पिकली.

रेडेसिवीरबाबत विचारायचं का?

पंतप्रधानांनी एक अधिकाऱ्याची समिती नेमली. जीएफआर हा त्याला शब्द आहे. त्यांना टेंडरशिवाय खरेदी करण्याची मुभा दिली. अधिकाऱ्यांना अधिकार दिले. त्या अधिकाऱ्यांनी दक्षिणेतील एक एजन्सी नेमली. त्यातून खरेदी विक्री संघ निवडला. काल मनसुख मांडविय आले होते. त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासमोरच माझं कौतुक केलं. आता मांडविय यांना रेमडेसिवीरची माहिती विचारायची का? महाराष्ट्राला किती दिली? इतर राज्यांना किती दिली? लपून किती दिली? उघड किती दिली? भाजपच्या राज्यांना किती दिली? हे विचारायचं का?, असा सवाल त्यांनी केला.

'तुम्हारे पाँव के नीचे ज़मीन नहीं...', शेरो शायरीतून ठाकरेंवर निशाणा
'तुम्हारे पाँव के नीचे ज़मीन नहीं...', शेरो शायरीतून ठाकरेंवर निशाणा.
पुण्यात चाललंय काय? मद्यधुंद तरूणानं पोलिसांना धुतलं, व्हिडीओ व्हायरल
पुण्यात चाललंय काय? मद्यधुंद तरूणानं पोलिसांना धुतलं, व्हिडीओ व्हायरल.
'सरडे रंग बदलतात पण एवढ्या वेगानं...', एकनाथ शिंदे यांचा ठाकरेंना टोला
'सरडे रंग बदलतात पण एवढ्या वेगानं...', एकनाथ शिंदे यांचा ठाकरेंना टोला.
'संजय राऊत डिप्रेशनमध्ये, त्यांची मानसिकता...'; नारायण राणेंचा घणाघात
'संजय राऊत डिप्रेशनमध्ये, त्यांची मानसिकता...'; नारायण राणेंचा घणाघात.
'देवाभाऊ, सापांना जवळ घेऊ नका...', शिवसेना नेत्याचा CM यांना सल्ला
'देवाभाऊ, सापांना जवळ घेऊ नका...', शिवसेना नेत्याचा CM यांना सल्ला.
'सुरेश धस यांच्यामुळेच बीड बदनाम...', पंकजा मुंडेंचा हल्लाबोल
'सुरेश धस यांच्यामुळेच बीड बदनाम...', पंकजा मुंडेंचा हल्लाबोल.
बीड सरपंच हत्या प्रकरणात 8 आरोपींवर मकोका, पण मकोका म्हणजे नेमकं काय?
बीड सरपंच हत्या प्रकरणात 8 आरोपींवर मकोका, पण मकोका म्हणजे नेमकं काय?.
वायदा अन् सत्ता आल्यानंतर युटर्न, फडणवीसांचा 'तो' वादा दादा विसरले?
वायदा अन् सत्ता आल्यानंतर युटर्न, फडणवीसांचा 'तो' वादा दादा विसरले?.
मंत्री धनंजय मुंडेंवर गुन्हा का नाही? खंडणीप्रकरणात सुरेश धसांचा सवाल
मंत्री धनंजय मुंडेंवर गुन्हा का नाही? खंडणीप्रकरणात सुरेश धसांचा सवाल.
एका गुन्ह्यात अटक अन् कराडचे अनेक गुन्हे उघड, 140 शेतकऱ्यांना चुना?
एका गुन्ह्यात अटक अन् कराडचे अनेक गुन्हे उघड, 140 शेतकऱ्यांना चुना?.